बाळासाहेबांनी दिलेल्या सल्ल्यामुळेच सामाजिक उपक्रमांची यशस्वी घोडदौड, सुभाष देसाई यांनी व्यक्त केली कृतज्ञता
प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनाला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उपस्थित राहिले होते. त्यावेळी त्यांनी समाजातील दुर्लक्षित कप्पे ओळखा आणि काम करा, असा मूलमंत्र आम्हाला दिला होता. त्याच सल्ल्यामुळे संस्थेची सामाजिक पातळीवर यशस्वी वाटचाल सुरू आहे, अशी कृतज्ञता प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी शनिवारी व्यक्त केली. संस्थेच्या ५१ व्या वर्धापन दिन सोहळय़ात ते बोलत होते.
गोरेगाव पश्चिमेकडील प्रबोधन क्रीडा भवनच्या प्रांगणात प्रबोधन गोरेगाव संस्थेचा ५१ वा वर्धापन दिन सोहळा पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रबोधन गोरेगाव संस्थेला वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांना मानपत्र अर्पण करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या असाधारण कार्याबद्दल सोहळय़ात गौरवोद्गार काढण्यात आले. तसेच गोरेगाव शिवसेनेतर्फेदेखील कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रबोधन गोरेगाव संस्थेचे अध्यक्ष नितीन शिंदे, कार्याध्यक्ष कैलास शिंदे, प्रमुख कार्यवाह गोविंद गावडे, खजिनदार रमेश ईस्वलकर, सहकार्यवाह देविदास पवार, शरदचंद्र साळवी हे मान्यवर उपस्थित होते. प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या स्थापनेवेळी जे लोक होते तेच लोक आजही संस्थेच्या सोबत आहेत ही चमत्कारिक गोष्ट आहे. संस्थेने यशस्वीपणे सुवर्णमहोत्सवी वाटचाल केली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनामुळेच संस्थेला विधायक उपक्रम राबवताना मोठे बळ मिळाले आहे, असे मत सुभाष देसाई यांनी व्यक्त केले. आजचे शिक्षण पदव्या देते, रोजगार देत नाही. रोजगाराची हीच पोकळी भरून काढण्यासाठी संस्थेने कौशल्य शिक्षणावर भर दिला आहे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी ‘मराठी बाणा’चे प्रमुख अशोक हांडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृदुला सावंत यांनी केले. ‘मराठी बाणा’ कार्यक्रमाने सोहळय़ाची रंगत वाढवली. कार्यक्रमाला प्रबोधन संस्थेचे हितचिंतक तसेच गोरेगावकरांनी बहुसंख्येने हजेरी लावली होती.
प्रबोधनकार ठाकरे वाचनालयामध्ये जागतिक महिला दिनाचे शानदार आयोजन
दिनांक ८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाद्वारे ‘मुलांची कथा पालकांची व्यथा’ या विषयावर डॉ. सुनिता चव्हाण यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. मुलाखतकार होत्या सौ. मृदुला सावंत.
मुलाखतीत आजच्या काळात पालकांना मुलांचे संगोपन करताना अनेक समस्या भेडसावत असतात. त्याची कारणे काय आहेत, सुजाण पालकत्व कसे असावे, प्रामुख्याने आज समाजात एकत्र कुटुंब पध्दती अस्तित्वात नाही त्यामुळे लहानपणापासूनच मुलांच्यावर जे संस्कार आपोआप घडत होते ते कमी झाले. संवादाचा अभाव, मुला-मुलींची वाढ होताना प्रत्येक टप्प्यावर पालकांची भूमिका कशी असावी, ई-गॅझेटचा वापर मर्यादित स्वरूपाचा असावा. मुलांचा मानसिक, भावनिक बुध्द्यांक पालकांनी समजून घ्यायला हवा, समाजामध्ये वावरताना समाजभान जपणं कसं गरजेच आहे, आईवडिलांच्या स्पर्शाचं महत्त्व, मुलांची तुलना इतर मुलांशी न करणं, पालकांनी मुलांसमोर कसं वागावं, घरातील महिलेचा आईचा मान राखणं, त्याच महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशा घ्यावी इ. गोष्टींवर मुख्यत्वाने प्रकाश टाकण्यात आला.
इथं एक गोष्ट अधोरेखित करावी वाटते जी मुलाखतीमध्ये वारंवार येत होती ती म्हणजे आज माणसां-माणसातला संवाद कमी होत आहे आणि त्यामुळे आत्महत्या, एकलकोंडेपणा, मुलांच्या मानसिक समस्या वाढत आहेत.
दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात मुलं वाढवताना येणा-या शारिरीक, मानसिक, लैंगिक समस्यांना सामोरे जाणा-या पालकांना येणा-या अनेक समस्यांची उत्तरे निश्चितच मिळाली. शेवटी श्रोत्यांच्या शंकांचे निरसनही केले. मृदुला सावंत यांनी श्रोत्यांच्या मनातले प्रश्न विचारून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रमुख पाहुण्यांच्या व प्रबोधन गोरेगावचे कार्याध्यक्ष श्री. कैलास शिंदे व इतर सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. श्री. कैलास शिंदे यांनी संस्थेच्या वतीने मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सल्लागार सदस्य श्री. विजय नाडकर्णी यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे यावेळी संस्थेचे कार्यकारणी सदस्य श्री. पद्माकर सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाला रसिकांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. अशात-हेने वाचनालयाचे प्रकल्प प्रमुख श्री. गोविंद येतयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचा-यांनी कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन रेखिव केले.
धन्यवाद.
कथा लेखन स्पर्धा २०२३ पारितोषिक वितरण समारंभ
प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातर्फे आयोजित कथा लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी पार पडला. सौ. स्मिता आपटे यांनी कथांचे परिक्षण केले होते. त्याविषयी त्यांनी थोडक्यात कथांची मांडणी व विषय सांगितले. अशा एकूण ३२ कथा यावर्षी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून तसेच यू.एस अटलांटा मधूनही आली होती. विजेत्यांना सुंदर असे मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुणे श्री. मिलिंद जोशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर उत्तेजनार्थ विजेत्यांना पुस्तक व प्रमाणपत्र देऊन टाळ्यांच्या गडगडाटात गौरविण्यात आले. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. नितीन शिंदे, कार्यवाह श्री. गोविंद गावडे, सहकार्यवाहक श्री. शरदचंद्र साळवी, श्री. संतोष परब, संस्थेचे सल्लागार सदस्य श्री. विजय नाडकर्णी, अॅड. श्री. विकास रेळे , श्री. पांडुरंग पोखरकर , श्री. चंद्रकांत देऊलकर इ. सदस्य व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये अनुक्रमे-
१) डॉ. स्वरूपा निखिल भागवत
२) श्री. योगेश विष्णू शिंदे
३) श्री. ईशान संगमनेरकर
उत्तेजनार्थ
१) श्री. सुधाकर विठ्ठल दीक्षित
२) सौ. सुनेत्रा सुधाकर टिल्लू
मराठी भाषा गौरव दिन
दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून प्रबोधन गोरेगाव संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातर्फे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकरीता सुप्रसिध्द कवी, गीतकार, संगीतकार, चित्रकार श्री. मिलिंद जोशी यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्याशी संवाद साधला तो सौ. स्मिता आपटे यांनी.
सुरवातीला कविता कशी सुचते त्यांच्या स्वत:च्या हस्ताक्षरातील ‘असच होतं का तुलाही’ या काव्यसंग्रहाबद्दल आजच्या पिढीची भाषा आपण त्यांच्याशी कसा संवाद वाढवू शकतो, काव्य आणि चित्र यांचा संबंध, रंगानाही गंध असतो, चित्रपटासाठी गीत लिहीताना आलेले काही अनुभव मग ती गाणी कशी सुचतात इ. त्यांचा आतापर्यंतचा प्रवास स्मिताताईंनी अतिशय चपलखपणे प्रश्न विचारत संवाद साधला. मध्ये मध्ये त्यांच्या सुंदर रसपूर्ण काव्यपंक्ती ऐकताना श्रोते मनापासून दाद देत होते.
सुरवातीला दीपप्रज्वलन, सरस्वतीपूजन व कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. नितीन शिंदे यांच्या हस्ते पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. नितीन शिंदे व संस्थेचे नवीन कार्यवाह श्री. गोविंद गावडे यांना प्रमुख पाहुणे श्री. मिलिंद जोशी यांच्या हस्ते पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
श्री. मिलिंद जोशी यांच्याशी संवाद साधल्यानंतर प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातर्फे आयोजित कथा लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या स्पर्धेविषयी सौ. स्मिता आपटे यांनी आपले मनोगत मांडले. एकूण ३२ कथा यावर्षी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आल्या होत्या. विजेत्यांना सुंदर असे मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुणे श्री. मिलिंद जोशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर उत्तेजनार्थ विजेत्यांना पुस्तक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेमध्ये अनुक्रमे-
१) डॉ. स्वरूपा निखिल भागवत
२) श्री. योगेश विष्णू शिंदे
३) श्री. ईशान संगमनेरकर
उत्तेजनार्थ
१) श्री. सुधाकर विठ्ठल दीक्षित
२) सौ. सुनेत्रा सुधाकर टिल्लू
त्याचप्रमाणे यावेळी संस्थेचे सहकार्यवाहक श्री. शरदचंद्र साळवी, श्री. संतोष परब, संस्थेचे सल्लागार सदस्य श्री. विजय नाडकर्णी, अॅड. श्री. विकास रेळे , श्री. पांडुरंग पोखरकर , श्री. चंद्रकांत देऊलकर इ. सदस्य व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकल्प प्रमुख श्री. गोविंद येतयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल सुधा पाटील व संपूर्ण टीमने कार्यक्रमाचे नीटनेटके आयोजन करून कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला.
प्रबोधन गोरेगाव संस्थेचा ४३ वा आंतरशालेय क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा
पश्चिम उपनगरातील बहुचर्चित असा ४३ वा “प्रबोधन गोरेगाव” आंतरशालेय क्रीडा महोत्सव दिनांक ४ जानेवारी ते ७ जानेवारी २०२३ या कालावधीत उत्साहात साजरा करण्यात आला. या स्पर्धा प्रबोधन क्रीडासंकुल, ओझोन जलतरण तलाव आणि जॉगर्स पार्क अशा तीन क्रीडा सुविधा उपलब्ध असणा-या ठिकाणी नियोजनबध्द पध्दतीने पार पडल्या. दोन वर्षाच्या कालावधीनंतर या स्पर्धा होत असल्याने स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. वांद्रे ते दहीसर या पश्चिम उपनगरातील २०० पेक्षा अधिक शाळा व ६ हजारपेक्षा अधिक खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. स्पर्धा प्रकारांमध्ये ॲथेलेटिक्स, जलतरण, टेनिस, तिरंदाजी, कब्बड्डी, खो-खो, बुध्दिबळ, मल्लखांब, कराटे आणि संचलन, लोकनृत्य इ. प्रकारांचा समावेश होता. शालेय क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य प्रबोधन संस्थेच्या माध्यमातून गेली ४३ वर्षे सतत केले जाते.
क्रीडा महोत्सव उद्घाटन सोहळा अतिशय उत्साहात पार पडला. यावर्षी उद्घाटन प्रसंगी युवानेते श्री. आदित्य ठाकरे उपस्थित होते. शालेय खेळाडूंनी मोठया संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी शिवसेना नेते व प्रबोधन गोरेगावचे संस्थापक श्री. सुभाष देसाई उपस्थित होते. प्रबोधनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला पाहुण्यांचे स्वागत सारीका मेस्त्री यांनी केले. प्रबोधनचे माजी अध्यक्ष श्री. मनोहर अद्वानकर यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेबद्दल ॲड. विकास रेळे यांनी माहिती दिली. लता गुढे यांनीही आपल्या मनोगतात कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. कार्यक्रम एका धाग्यात गुंफण्याचे काम सुत्रसंचालक संतोष खाड्ये यांनी सुंदररित्या पार पाडले. याप्रसंगी प्रबोधनचे श्री. अविनाश शिरोडकर हे ही उपस्थित होते. या प्रकारे प्रकल्प प्रमुख श्री. गोविंद येतयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल सुधा पाटील व संपूर्ण टीमने कार्यक्रमाचे नीटनेटके आयोजन करून कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला.
या महोत्सवाचा समारोप आणि पारितोषिक सोहळा सुप्रिया चव्हाण, प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यांच्या हस्ते विजेत्या संघाना तसेच खेळाडूंना गौरविण्यात आले. या स्पर्धेत प्रत्येक क्रीडा प्रकारात विजेता, उपविजेता खेळाडूंना मानचिन्ह, पदक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. महोत्सवाचा समारोप नेहमीप्रमाणे लोकनृत्य स्पर्धेने करण्यात आला. विशेष आकर्षण पोलिस बॅण्ड पथकाचे दिमाखदार संचलन होते. याप्रसंगी शिवसेना नेते व प्रबोधन गोरेगावचे संस्थापक श्री. सुभाष देसाई स्वतः हजर होते. तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, हितचिंतक, मान्यवरही उपस्थित होते. या प्रकारे प्रबोधनचे सर्व पदाधिकारी आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याने हा ४ दिवसाचा उत्सव अतिशय आनंदाने पार पडला.
मराठी भाषा पंधरवडा उत्साहात साजरा
प्रबोधनकार ठाकरे वाचनालय गोरेगाव व कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या आवारात दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी मराठी भाषा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. वाचनालयाच्या वतीने मान्यवरांचे सत्कार संस्थेचे माजी अध्यक्ष श्री. मनोहर अद्वानकर यांच्या हस्ते करण्यात आले. कोमसाप च्या जिल्हा अध्यक्ष सौ. लता गुढे यांच्या हस्ते कोमसापच्या वतीने पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोमसाप चे केंद्रिय कार्याध्यक्ष मा. प्रा. डॉ. प्रदीप ढवळ उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिध्द कथाकार श्री. एकनाथ आव्हाड, श्रीमती मंजिरी देवरस, श्री. डॉ. कृष्णा नाईक हे उपस्थित होते.
डॉ. प्रदीप ढवळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मंजिरी देवरस यांनी ‘धनश्री ने कुत्रा पाळला’ ही मंगला गोडबोले यांची विनोदी कथा सादर केली तर एकनाथ आव्हाड यांनीही एक सुंदर विनोदी कथा सादर केली. कथा ऐकताना सर्व श्रोत्यांना हसता हसता पुरेवाट झाली इतके सुंदर कथाकथन आव्हाड यांनी केले. कथाकथन कसे असावे यावर मार्गदर्शनही त्यांनी केले. कृष्णा नाईक यांनी कथालेखन कसे करावे यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला पाहुण्यांचे स्वागत सारीका मेस्त्री यांनी केले. प्रबोधनचे माजी अध्यक्ष श्री. मनोहर अद्वानकर यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेबद्दल ॲड. विकास रेळे यांनी माहिती दिली. लता गुढे यांनीही आपल्या मनोगतात कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. कार्यक्रम एका धाग्यात गुंफण्याचे काम सुत्रसंचालक संतोष खाड्ये यांनी सुंदररित्या पार पाडले. याप्रसंगी प्रबोधनचे श्री. अविनाश शिरोडकर हे ही उपस्थित होते. या प्रकारे प्रकल्प प्रमुख श्री. गोविंद येतयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल सुधा पाटील व संपूर्ण टीमने कार्यक्रमाचे नीटनेटके आयोजन करून कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला.
माणगांवमध्ये प्रबोधन कौशल्य केंद्राचा दिमाखदार भूमिपूजन सोहळा संपन्न
माणगांवमध्ये बामणोली रोडवर असणाऱ्या प्रबोधन कौशल्य निकेतनच्या म्हणजेच ग्रामीण युवकांना रोजगारक्षम बनविणाऱ्या प्रबोधन कौशल्य केंद्राच्या
प्रस्तावित इमारतीचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार दि. १० फेब्रुवारी रोजी पार पडला. ग्रामीण युवकांना रोजगारक्षम बनविणे हा या कौशल्य केंद्राचा प्रमुख
उद्देश आहे. भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रबोधन गोरेगावचे संस्थापक माजी उद्योगमंत्री आ. सुभाष देसाई, अध्यक्ष नितीन शिंदे यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमाची प्रस्तावना निवेदिका स्मिता आपटे यांनी केली यानंतर माणुसकी जीवनावर आधारित "माणसाने माणसाशी माणसा सम वागणे!" ही प्रार्थना
म्हणजे स्वागतगीत प्रबोधन कौशल्य निकेतन पहल नर्चरिंग लाईव्हज च्या विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर प्रबोधन कौशल्य व पहलमध्ये शिक्षण घेत
असलेल्या विद्यार्थ्यांची मनोगते झाली. विशेष करून या मनोगतामधील सोनल आणि कविता वाघमारे यांची मनोगते भावूक ठरली. सोनलला तर कौटुंबिक
विरोधी परिस्थिती मांडताना अश्रू अनावर झाले.
या कार्यक्रमप्रसंगी मनोगत व्यक्त करताना बोलताना माजी उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांनी विद्यार्थ्यांच्या मनोगताचे दाखले देत बोलताना श्री. देसाई
म्हणाले की, दिव्याने दिवा प्रज्वलित करावा अशा मताची मनोगते "पहल" च्या विद्यार्थ्यांची आहेत. त्यामुळे शासनाने प्रत्येक तालुक्यात कौशल्य विकास
केंद्रे स्थापन करावीत जेणेकरून बेरोजगारी कमी होईल आणि युवक व युवती आपला स्वतःचा व्यवसाय करतील यावेळी पहिले प्रबोधन कौशल्य केंद्र चालू
करण्यासाठी साथ देणाऱ्या रायगड सह रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या दुर्गम तालुक्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोंहचविणारे जे सावंत एज्युकेशन सोसायटीचे
सचिव जयवंत (नानासाहेब) सावंत यांचे विशेष आभार मानले.
या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सुभाष देसाई यांच्यासह शेठ दा. जैन धर्म स्थानकचे विश्वस्त भरतभाई शहा, नानासाहेब सावंत,
महानगर गॅसचे उपाध्यक्ष एच आर आणि सी एस आर एम जी एल, त्याचप्रमाणे योगेश लोधिया, उमेश सावंत आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात माणगांव तालुक्यातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ आबासाहेब पाटणकर, डॉ. मदन निकम, डॉ. संताजी यादव आणि माणगांव उपजिल्हा
रुग्णालयात "सदैव सेवेसी तत्पर"असे व्रत बाळगलेले डॉ संतोष कामेरकर तसेच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख अनिलजी
नवगणे आदी उपस्थित होते. पहलचे विद्यार्थी जिथे ojt ऑन जॉब ट्रेनिंग साठी शिफ्ट झाले त्या हवेल्स कंपनीचे प्रतिनिधी भारत उतेकर यांनी देखील
आपले मनोगत व्यक्त करत "पहल" आणि प्रबोधनचे तोंडभरून कौतुक केले. या प्रसंगी प्रबोधन गोरेगावचे कार्याध्यक्ष कैलास शिंदे, कोषाध्यक्ष रमेश
ईस्वलकर, शरद साळवी, देविदास पवार, पद्माकर सावंत, समीर त्रैलोक्य, अजय नाईक, अरविंद सावंत, जेष्ठ सल्लागार सदस्य विलास देवरूखकर
आदि मान्यवर उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
पुस्तक प्रदर्शन व विक्री नोव्हेंबर २०२२
प्रबोधनकार ठाकरे वाचनालय व क्षेमकल्याणी बुक्स यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक प्रदर्शन आणि सवलतीच्या दरात विक्री. दि.१४ नोव्हेंबर २०२२ ते २१ नोव्हेंबर २०२२ सकाळी १० ते रात्री ८ वा. स्थळ - जॉगर्स पार्क, सिद्धार्थ नगर, रोड क्र.१७, गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४००१०४.
संपर्क ७७००९२८२८४
प्रबोधन टेनिस अकॅडमी आणि साई टेनिस अकॅडमीतर्फे आयोजित विंटर टुर्नामेंट २०२२
प्रबोधन टेनिस अकॅडमी साई टेनिस अकॅडमी यांच्या सहकार्याने विंटर टुर्नामेंट २०२२ आयोजित करण्यात आली होती. यावेळी साई टेनिस प्रमुख विकास ठाकूर, कोच अमोल गायकवाड, सिद्धेश झुवले आणि स्पर्धक उपस्थित होते. ही स्पर्धा ६ नोव्हेंबर २०२२ ला पार पडली. या स्पर्धेतील स्पर्धकांना प्रथम ३ विजेत्यांना ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि मेडल असे बक्षिस होते.
या टेनिस टुर्नामेंटला मोठया संख्येने खेळाडुंचा सहभाग होता. या अटीतटीच्या सामन्यांमध्ये सर्वांनी आपले कौशल्य दाखवले. तसेच या स्पर्धेसाठी प्रबोधन टेनिस अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला होता. नियमित सराव करणाऱ्या प्रशिक्षणार्थींसाठी हि स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे:
विजेत्यांची नावे
1 मिहीर तांडेल
2 शुभ शेट्ये
उपविजेत्यांची नावे
1 विवेक सुब्रमण्यम
2 श्रेयस परब
तिसरे स्थान
1 रोहित कांगोकर
२ केदार महाडिक
'ग्रेटर मुंबई हौशी जलतरण संघटना स्पर्धा'
प्रबोधन गोरेगाव संचलित ओझोन जलतरण तलावामध्ये ग्रेटर मुंबई हौशी जलतरण संघटना मुंबई यांच्या स्पर्धा पार पडल्या. पुरुष आणि महिला वयोगट व लहान वयोगट यांचा या स्पर्धेमध्ये सहभाग होता. या स्पर्धा ५ नोव्हेंबर आणि ६ नोव्हेंबरला आयोजित केल्या होत्या. तसेच उभा स्पर्धेमध्ये ओझोन जलतरण तलाव तसेच मुंबईमधील अनेक उच्च दर्जाच्या जलतरण तलावातील प्रशिक्षणार्थींचा सहभाग होता. यामध्ये अनेकांनी यश संपादन केले. विजेत्यांसाठी ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि धनादेश देण्यात आले. तसेच असोसिएशन तर्फे बेस्ट दोन स्वीमर्सना प्रत्येकी २०,००० रुपयांचा धनादेश देण्यात आला.
नमस्कार,
सगळ्यांना कळविण्यात आनंद होत आहे की गेले ५ आणि ६ नोव्हेंबरला आपल्या ओझोन स्विमिंग पूलमध्ये ग्रेटर मुंबई जलतरण संघटने तर्फे आयोजित केलेल्या पुरुष आणि महिला वयोगट व लहान वयोगटामधे आपल्या ओझोन स्विमिंग पूल मधून माझ्या प्रशिक्षणाच्या खाली सराव करणारा आपला लहान खेळाडू ७ वर्षीय कु.दक्ष शाह याने चारही क्रीडा प्रकारांमध्ये ४ सुवर्ण पदके मिळवून सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मान मिळवला आहे. आपल्या संपूर्ण प्रबोधन परिवारा कडून त्याचे खूप खूप अभिनंदन.
१ कु. दक्ष शाह
50 m free style (गोल्ड) ️
50 m Breast stroke ️ (गोल्ड) ️
50 m back stroke. ️ (गोल्ड) ️
50 m Butter fly. (गोल्ड) ️
Best swimmer. (ट्रॉफी) ️
धन्यवाद
श्री. देव पवार
प्रबोधन गोरेगाव.
Tennis Academy student won singles runner-up trophy for U-14 girls category in MSSA 2022-23
Heartly Congratulations!!
Hrisha Shaha our Tennis Academy student won singles runner-up trophy for U-14 girls category in MSSA 2022-23 (Mumbai Schools Sports Association). The competition was held at Bombay gymkhana on Friday 14th ocober, and price distribution was done on 17 October Monday.
All the best for your bright future from prabodhan goregaon
"वाचन प्रेरणा दिन" २०२२
"वाचन प्रेरणा दिन" २०२२
प्रबोधन गोरेगाव संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालय यांच्या वतीने भारतरत्न- माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त "वाचन प्रेरणा दिन" हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रबोधन व्यासपीठावर साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्कार विजेत्या डॉ.संगीता बर्वे यांचे "मी आणि माझी सामाजिक कविता" या विषयावर व्याख्यान झाले.
या कार्यक्रमामध्ये कथा स्पर्धा आणि निंबध स्पर्धा यांचा बक्षीस वितरण समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धांमध्ये विजयी असलेल्या सर्वांना सन्मानचिन्ह, पुस्तक आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रबोधन गोरेगाव संस्थेचे अध्यक्ष श्री. नितीन शिंदे यांनी भूषवले. तसेच विशेष अतिथी म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी श्री. भूषण देशपांडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. संजय बनसोडे उपस्थित होते. याप्रसंगी भूषण देशपांडे आणि संजय बनसोडे यांचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच जिल्हा नियोजन अधिकारी श्री. भूषण देशपांडे यांनी "वाचन प्रेरणा दिनाबद्दल" माहिती दिली. तसेच मार्गदर्शन केले. मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री संजय बनसोडे यांनी वाचन क्षेत्रातील आवड निर्माण करण्यासाठी काही मोलाचे संदेश दिले आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रबोधनकर ठाकरे वाचनालय प्रकल्पप्रमुख श्री. गोविंद येतयेकर यांनी प्रबोधन गोरेगाव या संस्थेबद्दल आणि विविध उपक्रमाबाबत माहिती दिली.
कार्यक्रमातील व्याख्यानामध्ये डॉ. संगीत बर्वे यांनी डॉक्टरी पेशा निभावत असताना आलेले वेगवेगळे अनुभव आणि त्या अनुभवातून कळलेली माणसं यांच्यावर सुंदर तयार केलेल्या कवितांचे वाचन केले. वेगवेगळ्या प्रकारच्या कविता त्यांनी सादर केल्या. त्यांनी त्या कवितांचे अर्थ समजावून सांगितले. त्या करण्यामागील कारण सांगितले. त्यांच्या जीवनात आलेले वेगवेगळे अनुभव आणि त्यांचे चा बालसाहित्यावर लिखाण याबाबत माहिती दिली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्मिता आपटे यांनी केले. प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातील कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाचे योग्य नियोजन करून उत्तमरित्या यशस्वी कार्यक्रम पार पाडला. हा कार्यक्रम प्रबोधन जॉगर्स पार्क येथे पार पडला. यासाठी प्रेक्षकांनी विशेष उपस्थिती दाखवली.
प्रबोधन धर्मादाय डायलिसीस सेंटरला ७ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने
प्रबोधन धर्मादाय डायलिसिस सेटरला १ ऑक्टोबर २०२२ रोजी ७ वर्ष पूर्ण झाल्याने व ७ वर्षात ५०,००० रुग्णांना डायलिसिस सेवा दिल्याचे औचित्य साधून मा. सुभाष देसाई यांच्या हस्ते सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रबोधन गोरेगावचे संपादक आणि शिवसेना नेते मा. श्री सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प ७ वर्षांपूर्वी आकारास आला. सध्या सेंटरमध्ये १५ मशीन असून त्यावर ५०,००० रुग्णांना अल्प शुल्क आकारून तर काहींना विनामूल्य डायलिसिस सेवा देण्यात येते.
५०,००० डायलिसिस टप्पा पूर्ण केल्याच्या व कोरोना विषाणूच्या साथीच्या काळातही अविरत उत्कृष्ट सेवा दिली गेल्यामुळे मा. सुभाष देसाई यांच्या हस्ते सेंटरचे प्रकल्प प्रमुख व प्रबोधन संस्थेचे कार्यवाह सुनील वेलणकर आणि डॉ. राजेंद्र कुमार यांचे कौतुक केले. याप्रसंगी रुग्णांनी सेंटरमध्ये चांगल्या प्रकारे सेवा मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सध्या या ठिकाणी ६० रुग्ण डायलिसिसची सेवा घेत आहेत. यावेळी लाभार्थी रुग्ण, डॉक्टर्स आणि प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे, कार्याध्यक्ष गोविंद गावडे, सदस्य महेश करमरकर व देणगीदारही उपस्थित होते.
'ओझोन'च्या दोन मुलींची नोव्हेंबर २०२२ मधील राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड
नमस्कार,
आपणास कळविण्यात आनंद होत आहे की नुकत्याच पार पडलेल्या (State) ISSO National Game 4th Edition- pune 2022-23 मध्ये आपल्या
ओझोन जलतरण तलावामध्ये Competitive/ Advance Level मध्ये सराव करणाऱ्या मुलींनी यश संपादन करून त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
ही स्पर्धा नोव्हेंबरमध्ये पार पडेल. या दोन्ही मुलींचा सत्कार प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक व राज्याचे माजी उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांच्याकडून
करण्यात आला. यावेळी प्रबोधन गोरेगाव संस्थेचे खजिनदार श्री. रमेश इस्वलकर आणि कार्याध्यक्ष गोविंद गावडे उपस्थित होते. तसेच मुलींचे पालक देखील
उपस्थित होते. या दोन्ही प्रशिक्षणार्थी ओझोन जलतरण तलावामध्ये प्रमुख प्रशिक्षक श्री. निलेश परब यांच्यासोबत नियमित सराव करतात.
१) कु. खुशी मारू
१०० मीटर फ्री स्टाईल (१ मिनिटे, २६ सेकंद, २३ मिलीसेकंद)
ब्रॉंझ
२) कु. वामक्षि अधिकारी
५० मीटर फ्री स्टाईल (३४ सेकंद,२१ मिलीसेकंद)
गोल्ड
५० मीटर बटरफ्लाय (३६ सेकंद, ४३ मिलीसेकंद)
सिल्वर
२०० मीटर फ्री स्टाईल (२ मिनिटे, ४७ सेकंद, ४३ मिलीसेकंद)
सिल्वर
ओझोन जलतरण तलाव आणि प्रबोधन गोरेगाव तर्फे दोन्ही प्रशिक्षणार्थी आणि प्रशिक्षक यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
Project Coordinator
Padmakar Sawant
'प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आयोजित प्रबोधन व्यासपीठावर आयुर्वेद, अध्यात्म आणि भारतीय संस्कृती या विषयावर व्याख्यान
प्रबोधन गोरेगाव संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आयोजित प्रबोधन व्यासपीठावर आयुर्वेद, अध्यात्म आणि भारतीय संस्कृती
या विषयाला अनुसरून सादरीकरणासाठी व्याख्यात्या डॉ. उज्जवल कामत (आयुर्वेदाचार्य) यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची सुरवात प्रबोधन गोरेगावचे सल्लागार ॲड. विकास रेळे यांनी पाहुण्यांच्या परिचयाने केली.
तसेच प्रबोधनकार गोरेगाव सल्लागार सदस्य श्री. पांडुरंग पोखरकर यांनी पुस्तक देऊन स्वागत केले.
या कार्यक्रमात डॉ. उज्वला कामत यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संस्कृती याबाबत व्याख्या सांगून त्याचे महत्त्व सांगितले.
तसेच त्यांनी पंचमहाभुते आणि त्रिदोष याचा शरीरावर होणारा परिणाम याबद्दल माहिती सांगितली. तसेच विषयाचा सार सांगताना
त्यांनी जीवन ही एक तपश्चर्या आहे आणि आयुर्वेद, अध्यात्म आणि संस्कृती आपल्याकडून ती करून घेते असे सांगितले. स्वास्थ
ही खूप मोठी संकल्पना आहे. आरोग्य पैशाने विकत घेऊ शकतो पण स्वास्थ्य आपल्याला मिळवावे लागते. बाह्य परिस्थिती कशीही
असली तरी आपली मनाची प्रसन्नता कायम ठेवणे ही महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी विशेष उपस्थिती दाखवली.
ओझोन स्विमिंग पूलच्या मुलांची सप्टेंबर २०२२ मधील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
नमस्कार,
आपणास कळविण्यात आनंद होत आहे की नुकत्याच पार पडलेल्या 17th AISM REGIONAL ZONE ICSC SCHOOL state level competition मध्ये
आपल्या ओझोन स्विमिंग पूल मध्ये माझ्या under advanced level madhe सराव करणाऱ्या मुलांनी यश संपादन करून सप्टेंबर 2022 मध्ये बँगलोर
येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे
1) Shlok Mane
17 वर्षा खालील मुलां मध्ये
800 m free style silver medal
100 m Breast stroke Gold medal
2) Abhik Shrivastev
14 वर्षा खालील मुलां मध्ये
50 m Breast stroke Silver medal
3) Sarannya sing
800m free style Silver medal
4) Maghvan Ajgaonkar
50 m free style Bronze medal
100 m free style Bronze medal
5) Daksh Shah
50 m free style Gold medal ️
50 m Breast stroke Gold medal ️
50 m Butter fly stroke Gold medal ️
Total :-
4 Gold medal ️
3 silver medal
2 Bronze medal
मी सर्व प्रबोधन गोरेगाव पदाधिकाऱ्यांचे आणि कार्याकरिणी सभासदांचे खूप खूप आभार मानतो ज्यांनी मला प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली
धन्यवाद
देव पवार
प्रबोधन गोरेगाव.
'प्रबोधनकार ठाकरे वाचनालय' आयोजित प्रबोधन व्यासपीठावर 'सुश्राव्य कीर्तनाचा' कार्यक्रम
प्रबोधन गोरेगाव संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आयोजित प्रबोधन व्यासपीठावर सुश्राव्य कीर्तन या विषयाला अनुसरून सादरीकरणासाठी
ह.भ.प.सौ. युगंधरा वीरकर (कीर्तन अलंकार, कीर्तन रत्नावली यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची सुरवात
प्रबोधन गोरेगावचे सल्लागार श्री. विकास रेळे यांनी पाहुण्यांच्या परिचयाने केली. तसेच प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. सुधा पाटील
यांनी हार घालून स्वागत केले.
या कार्यक्रमात युगंधरा वीरकर यांनी आनंद तनय यांनी काव्यरचना केलेले 'देव करील दया, तयावरी देव करील दया' या अभंगाचे निरुपन केले.
त्यांनी या अभंगाचा आशय सांगताना, परमेश्वर दया करतात, परंतु कोणावर? जे सातत्याने भगवंताची आठवण काढतात, नामस्मरण करतात,
सुख, दुःखात भगवंताचे स्मरण करतात अशा लोकांवर भगवंत विशेष दया करतात असे सांगितले आहे. या कीर्तन कार्यक्रमाला प्रेक्षकांनी विशेष
उपस्थिती दाखवली.
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपन्न
मा. शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय कामगार सेना लार्सन अँड टुब्रो पवई युनिट तर्फे
रक्तदान शिबीरचे भव्य आयोजन केले होते. यासाठी एकूण 400 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.मिनाताई ठाकरे रक्तपेढी , गोरेगाव येथील 150 डोनर्स
तर के ई एम हॉस्पिटलमधून 250 डोनर्सने रक्तदान केले आहे.
शिवसेना नेते मा. श्री सुभाष देसाई आणि अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष श्री ज.मो.अभ्यंकर, यांनी शिबिरास भेट दिली. याप्रसंगी मा. श्री. सुभाष देसाई
यांनी मार्गदर्शनही केले. यावेळी मिनाताई ठाकरे रक्तपेढीचे टेक्निकल डायरेक्ट श्रीयुत.अविनाश शिरोडकर उपस्थित होते.
यावेळी लार्सन टुब्रो पवई युनिटचे इंडस्ट्रियल रिलेशन प्रमुख सुहास घटवाई, उपाध्यक्ष बी एस सलुजा, तसेच भारतीय कामगार सेना युनियनचे सचिव
श्री अजित साळवी, पवई युनिटचे अध्यक्ष सुधा आंगणे, यशवंत सावंत आणि विनायक नलावडे हे उपस्थित होते. अनेक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदानचा
अनुभवही सांगितला.
कवितेतल्या शांताबाई
प्रबोधन गोरेगाव संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आयोजित प्रबोधन व्यासपीठावर कवियित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दीवर्षानिमित्त "कवितेतल्या शांताबाई" हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या विषयावर व्याख्यान देण्यासाठी कवी प्रवीण दवणे यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची सुरवात प्रबोधन गोरेगावचे सल्लागार श्री. विकास रेळे यांनी पाहुण्यांच्या
परिचयाने केले. प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. सुधा पाटील यांच्या हस्ते श्री. प्रवीण दवणे यांना पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात कवी प्रवीण दवणे यांनी शांतबाईंचे बालपण, कवीतेची आवड, कवितेची सुरवात सांगितली. शांतबाईंनी गीतलेखन करत असताना
कवितालेखनही केले याबाबत माहिती सांगितली. तसेच शांता शेळके यांच्या शताब्दीवर्षात "कवितेतल्या शांताबाई" हे पुस्तकाचे कवी प्रवीण दवणे यांनी
लेखन केले आहे. शांतबाईंच्या प्रसिद्ध कविता त्यांनी गायल्या. त्यांच्या कवितांचे अर्थ सांगितले. या कार्यक्रमास प्रेक्षकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कवियित्री शांता शेळके यांच्या सुंदर कवितांचा आस्वाद घेतला.
ओझोन जलतरण तलावाचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर संपन्न
मा. श्री. सुभाषजी देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार, प्रबोधन गोरेगाव संचलित ओझोन जलतरण तलाव उपक्रमाद्वारे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उन्हाळी प्रशिक्षण शिबीर २०२२ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उन्हाळी शिबिराचा समारोह २१ जून २०२२ ला सायंकाळी ५ वाजता पार पडला. हे १४ वे उन्हाळी जलतरण प्रशिक्षण शिबिर असून दिनांक २४ मार्च ते २१ जून २०२२ पर्यंत हे शिबिर सुरू होते.
या उन्हाळी शिबिरास यावर्षी १२०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यामध्ये सर्व वयोगटांचा सहभाग झाला. तसेच स्पेशल बॅचेसही सुरू करण्यात आल्या. ओझोन वायूचा वापर केल्यामुळे जलतरण तलावातील स्वच्छ व शुद्ध पाणी आहे. विद्यार्थ्यांना कपडे बद्दलण्यासाठी प्रशस्त रूमची सुविधा उत्तम आहे. तसेच उत्तम प्रशिक्षक वर्ग या सर्व सुविधांमुळे या जलतरण तलावाकडे विद्यार्थ्यांची प्रशिक्षण घेण्यासाठी संख्या वाढत आहे.
१५ दिवसांचे हे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर ४ गटांमध्ये चालवण्यात आले. प्रशिक्षण सुरू असताना पाहण्यासाठी पालकांची आणि विद्यार्थ्यांची खूप प्रमाणात गर्दी झाली. यामधील भरपूर विद्यार्थ्यांनी रेग्लुअर बॅचेसमध्ये देखील प्रवेश घेतला आहे. या कार्यक्रमास ओझोन जलतरण तलावाचे प्रकल्पप्रमुख श्री. पद्माकर सावंत आणि व्यवस्थापक श्री. राजेश सावंत उपस्थित होते.
सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सर्व विद्यार्थी, पालक, प्रशिक्षक, सर्व स्टाफ यावेळी उपस्थित होता.
प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आयोजित प्रबोधन व्यासपीठ व्याख्यान 'आनंदाने जगा, आयुष्याची दुसरी इनिंग...'
प्रबोधन गोरेगाव संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आयोजित प्रबोधन व्यासपीठावर 'आनंदाने जगा, आयुष्याची दुसरी इनिंग...' या विषयाला अनुसरून व्याख्यान देण्यासाठी श्री. प्रकाश बोरगांवकर ( हेल्प ऐज इंडिया मुंबई-गोवा प्रमुख )
यांना आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची सुरवात प्रबोधन गोरेगावचे सल्लागार श्री. विकास रेळे यांनी पाहुण्यांच्या परिचयाने केले. प्रबोधन गोरेगावचे श्री. चंद्रकांत देऊलकर यांच्या हस्ते श्री. प्रकाश बोरगांवकर यांना पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात श्री. प्रकाश बोरगांवकर यांनी अत्यंत सोप्या शब्दात जन्म घेतल्यापासून वृद्ध होईपर्यंत आपण केलेले काम, जबाबदाऱ्या कशा पद्धतीने पूर्ण करतो ते सांगितले. मुलांप्रती, नातवंडांप्रती आपली वागणूक कशी असावी हे त्यांनी समजावून सांगितले. रिटायरमेंटनंतर आपण आपले आयुष्य कसे आनंदाने जगावे याबाबत सकारात्मक माहिती दिली. साठी नंतर आपल्या शरीरात आणि मानसिकतेमध्ये होणारे बदल त्यांनी सांगितले. आनंदी कसे राहावे, व्यायाम कसा करावा, आहार कोणत्या पद्धतीचा घ्यावा याविषयी त्यांनी व्याख्यानात सांगितले. या कार्यक्रमास प्रेक्षकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
निवेदक प्रदिप भिडे यांच्या आठवणींना उजाळा
प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातर्फे निवेदक प्रदिप भिडे यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन
कोकण मराठी साहित्य परिषद मुंबई जिल्हा आणि प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, गोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार १३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता प्रबोधन ठाकरे वाचनालयाच्या सभागृहात स्वर्गीय प्रदीप भिडे यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेत अनेक मान्यवरांनी सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच्या आठवणींचा जागर केला. यावेळी कोमसाप मुंबई जिल्हाध्यक्ष लता गुठे, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, रविराज गंधे, बांद्रा शाखेचे कार्याध्यक्ष पत्रकार पंकज दळवी, बोरिवली शाखेचे अध्यक्ष जगदीश भोवड, विलेपार्ले शाखाध्यक्ष संतोष खाडे आदी मान्यवरांनी प्रदीप भिडे यांच्या आठवणी जागवल्या.
या सभेत ॲड. व्ही. व्ही. गुठे, कोमसाप मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. कृष्णा नाईक, प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या ग्रंथपाल सुधा पाटील तसेच प्रदीप भिडे यांचे अनेक चाहते उपस्थित होते. या सभेचे निवेदन स्मिता आपटे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रबोधन ठाकरे वाचनालय, गोरेगाव यांनी केले होते.
प्रबोधन व्यासपीठ कार्यक्रमात 'हिरव्या गमती' सादर
लहान लहान किटक, प्राणी यांच्या प्रजनन संस्थेबाबत, तसेच त्यांच्या उदरनिर्वाहाबाबत तसेच हत्ती, उंट यांचा गरोदर काळ, कळपातील राहणीमान, खाणे, जीवन. त्याचप्रमाणे रानटी कुत्री, निलगाय, घोडे, झेब्रे, चिंपांझी, घोरपड, वानर, बेडूक, साप यांच्यासंदर्भातील माहितीचा उलगडा व्याख्यात्या शोभा नाखरे यांनी आपल्या हिरव्या गमची या कार्यक्रमात करुन दाखविला.
प्रबोधन गोरेगाव संचलित प्रबोधनकार ठाकरे आयोजित प्रबोधन व्यासपीठ या कार्यक्रमात ' हिरव्या गमती' या विषयावर सौ. शोभा नाखरे यांनी व्याख्यान सादरे केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रबोधन गोरेगावच्या सल्लागार समितीचे सदस्य अॅड. विकास रेळे यांनी केले. प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. सुधा पाटील यांच्या हस्ते सौ. शोभा नाखरे यांना पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
'हिरव्या गमती' निसर्गातील गमतीजमती या विषयावर शोभा नाखरे यांनी त्यांनी वाचलेल्या निसर्गातील गमतीजमतींचे सोप्या भाषेत वर्णन केले. शोभा नाखरे यांनी आत्तापर्यंत केलेल्या दिव्यांग लोकांच्या कामाबद्दल सांगितले.
प्राण्यांचे खाद्यपदार्थ, दैनंदिनी, त्यांच्या संरक्षणासाठी निसर्गाने तयार केलेली त्यांची शरीररचना, प्राण्यांमधील प्रजनन संस्था, समलैंगिक संबंध, त्यांचा मृत्यू, त्यांचे आजार या बाबतीत प्रथमच वेगळी माहिती त्यांनी दिली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
माणगांवमध्ये 'प्रबोधन कौशल्य निकेतन' पहिल्या टप्प्याचे उदघाटन संपन्न
माणगांवमध्ये ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रबोधन गोरेगाव संचलित 'प्रबोधन कौशल्य निकेतन' पहिल्या टप्प्याचे उदघाटन संपन्न
माणगांवकरांच्या विश्वास व आशीर्वादामुळेच हे शक्य ; सुभाष देसाई
महाराष्ट्र राज्य उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांच्या हस्ते दि. ७ मे रोजी सायंकाळी ५ वा. जे. बी. सावंत एज्युकेशन सोसायटी बामणोली रोड येथे प्रबोधन कौशल्य निकेतन पहिला टप्याचा उदघाटन सोहळा पार पडला.
या सोहळ्याला ना. सुभाष देसाई यांच्या समवेत जे. बी. सावंत एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष अण्णासाहेब सावंत, शेठ दामजी लक्ष्मीचंद जैन धर्म स्थानक अध्यक्ष भरत शाह, न. पं. माणगांव नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, रायगड शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. संतोष कामेरकर, प्रबोधन अध्यक्ष नितीन शिंदे, अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष अभ्यंकर, विलास देवरुखकर, प्रबोधन गोरेगावचे कार्याध्यक्ष गोविंद गावडे , कोषाध्यक्ष रमेश इस्वलकर , सहकार्यवाह कैलास शिंदे , शरद साळवी , शशांक कामत ,द. रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसीलदार प्रियांका आयरे, पहल संस्था पदाधिकारी, महिला बचत गट सदस्य, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व प्रबोधन कौशल्य निकेतनला शुभेच्छा दिल्या. यावेळी ना. सुभाष देसाई म्हणाले की, माणगांव तालुक्यात एक चांगला उपक्रम सुरू होत आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व आशीर्वादामुळे गेली ५० वर्ष प्रबोधन काम करीत आहे. माणगांवचे आ. भाईसाहेब सावंत हे प्रबोधनचे पहिले अध्यक्ष होते. अत्यंत कमी कालावधीत मुंबई बाहेर हा उपक्रम चालू होतं असताना याचा पहिला टप्पा सुरू होत आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्यातच सर्व कोर्समधील प्रवेश पूर्ण झाले आहेत. पहल संस्थेचे खालापूरमधील काम उल्लेखनीय आहे. तसेच माणगांव तालुक्यातील खेडोपाड्यातील तरुणांना सक्षम करण्याचे काम पहल करणार आहे.
माणगांवकरांनी दाखविलेला विश्वास, आशीर्वाद व पाठींब्यामुळे हा उपक्रम सुरू करू शकलो. माणगांव तालुक्यात स्वतंत्र कौशल्य विकास संस्थांची इमारत उभारून किमान ५०० विध्यार्थ्यांना शिक्षण घेता येईल याचा पुढील कालावधीत प्रयत्न करू. तालुक्यातील बचत गटांना आथिर्क पाठबळ देऊन त्यांचे कौशल्य विकसित करून बचत गटातील महिलांचे सक्षमीकरण करण्यावर भर देणार आहोत. माणगांव तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हे ध्येय समोर ठेवून आम्ही पुढे काम करीत आहोत.
भारत देश हा सर्वात जास्त तरुण असलेला देश आहे. देशातील तरुणांना योग्य मार्गदर्शन करून स्वतःच्या पायावर उभे करणे हे प्रबोधन गोरेगाव व पहलचे ध्येय आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये लाखो अशी मुलं असतील ज्यांना स्कुल ड्रॉपआऊट म्हणतात शाळेतून बाहेर पडलेली शिकलीच नाही.आणि मग लटकली आहेत. आयुष्यामध्ये काय करावं कळत नाही दिसत नाही.ह्या एवढ्या सगळ्या एका जिल्ह्यामध्ये जर काही लाख असतील तर कोण काय करणार?दरिया मे खसखस एवढा प्रयत्न आहे. असे प्रयत्न प्रत्येक गावामध्ये छोटे छोटे सुरु झाले तर अख्खी पिढी बदलू शकते. असे ना.देसाई म्हणाले.
यावेळी जे.बी.सावंत एज्युकेशन सोसायटीचे सचिव नानासाहेब सावंत, रुबि मिल चे मालक भरत शहा तसेच माणगाव नगरीचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार आदींनी आपल्या मनोगतात प्रबोधन कौशल्य निकेतनच्या सामाजिक उपक्रमांस शुभेच्छा दिल्या तर श्री अंकुश भारद्वाज,आणि वैशाली मेनन यांनी प्रबोधन कौशल्य निकेतन या संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. या संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमणाची माहिती या कार्यक्रम उपस्थितांना पडद्यावर चित्रफिताद्वारे दाखविण्यात आले. प्रबोधनाचे हे चित्रफीत पाहून उपस्थित मान्यवर व नागरिक बंधू-भगिनी यांनी टाळ्यांच्या गजरात प्रबोधनच्या कार्याला दाद दिली.
या कार्यक्रमात प्रबोधन कौशल्य निकेतन संस्थेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त करून या संस्थेमुळे आम्हाला हुरूप मिळाल्याचे सांगितले. या कार्यक्रमात जे.बी.सावंत एज्युकेशन सोसायटीतर्फे सोसायटीचे सचिव नानासाहेब सावंत यांनी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे संस्थेतर्फे स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता आपटे यांनी उत्कृष्ट्पणे केले. तर रायगड शिक्षण संस्था माणगाव अध्यक्ष डॉ.संतोष कामेरकर यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
प्रबोधन टेनिस अकादमी उन्हाळी स्पर्धा २०२२ संपन्न
प्रबोधन टेनिस अकॅदमीतर्फे आयोजित केलेली समर टुर्नामेंट २०२२ उत्साहात संपन्न, सिद्ध जोशी, वेदांशी केशुरवाला, केदार महाडिक यांनी पटकावले विजेतेपद
प्रबोधन टेनिस अकॅडमी आयोजित व साई टेनिस अकॅडमी यांच्या सहकार्याने समर टुर्नामेंट २०२२ आयोजित करण्यात आली होती. प्रबोधन गोरेगावचे ज्येष्ठ सल्लागार सदस्य दिनकर मालवणकर यांच्या हस्ते या टुर्नामेंटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी साई टेनिस प्रमुख विकास ठाकूर, कोच अमोल गायकवाड, सुशील मेहरा आणि स्पर्धक उपस्थित होते.
या स्पर्धा मेन्स, वुमेन्स ओपन आणि १६ वर्षाखालील मुले या ३ गटांमध्ये पार पडल्या. प्रत्येक गटातील प्रथम ३ विजेत्यांना ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि मेडल असे बक्षिस होते. या स्पर्धेमध्ये १०० हुन अधिक स्पर्धकानी सहभाग घेतला होता. या टेनिस टुर्नामेंटला मोठया संख्येने खेळाडुंचा सहभाग होता. ७ आणि ८ मे ला या स्पर्धा पार पडल्या. या अटीतटीच्या सामन्यांमध्ये सर्वांनी आपले कौशल्य दाखवले. या स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे:
मेन्स ओपन
१ सिद्ध जोशी
विजेता ( ट्रॉफी, गोल्ड मेडल, सर्टिफिकेट)
२ भव नांगीया
उपविजेता ( ट्रॉफी, सिल्वर मेडल, सर्टिफिकेट)
३ केदार महाडिक
थर्ड प्लेस ( ट्रॉफी, ब्रॉंझ मेडल, सर्टिफिकेट)
वुमेन्स ओपन
१ वेदांशी केशुरवाला
विजेती ( ट्रोफी, गोल्ड मेडल, सर्टिफिकेट)
२ रिशा शहा
उपविजेती ( ट्रॉफी, सिल्व्हर मेडल, सर्टिफिकेट)
३ अक्षिता पोनांमगी
थर्ड प्लेस ( ट्रॉफी, ब्रॉंझ मेडल, सर्टिफिकेट)
अंडर 16 बॉईज
१ केदार महाडिक
विजेता ( ट्रॉफी, गोल्ड मेडल, सर्टिफिकेट)
२ सार्थक शहा
उपविजेता ( ट्रॉफी, सिल्व्हर मेडल, सर्टिफिकेट)
३ केतन गौरांग
थर्ड प्लेस ( ट्रॉफी, ब्रॉंझ मेडल, सर्टिफिकेट)
प्रबोधनकार ठाकरे वाचनालयात चित्रकला वर्गाचा शुभारंभ
प्रबोधन गोरेगाव संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आणि उदगीरकर आर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने नव्याने चित्रकला वर्ग सुरु करण्यात आले आहे. प्रबोधन ठाकरे वाचनालयाचे प्रकल्पप्रमुख श्री. गोविंद येतयेकर यांनी चित्रकला वर्गाचे उदघाटन केले. लहान मुलांच्या वैयक्तिक विकासासाठी आणि त्यांच्यातील कलागुण जोपासण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातर्फे हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
यावेळी चित्रकला शिक्षिका रुपाली उदगीरकर, ग्रंथपाल सुधा पाटील आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये के.जी ते इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ड्रॉईंग ग्रेड, एलिमेंटरी व इंटरमिजीएट या परीक्षांसाठीची पूर्वतयारी करून घेण्यात येणार आहे. एलिमेंटरी आणि इंटरमिजीएट परीक्षांसाठी सर्व वयोगटातील लोकांसाठी हे वर्ग घेण्यात येणार आहेत. हे वर्ग शनिवारी सायंकाळी ५ ते ६.६० व रविवारी सकाळी १० ते ११.३० या वेळेत प्रबोधनकार ठाकरे वाचलनालयात चालणार आहेत.
संपर्क- रुपाली उदगिरकर
९९८७१७३४२० / ९१३७६२७१३६
प्रबोधन ठाकरे वाचनालय
७७००९२८२८४
Congratulations Ved Thakur for won DOUBLES WINNER TROPHY
Ved Thakur is won DOUBLES WINNER TROPHY along with his partner Anmol Nagpure, Maharashtra, in AITA CHAMPIONSHIP Series. in U-18 boys category. he won doubles winner trophy as well as certificate. the matches held at SMS Stadium, Jaipur on 28.3.22.They beat Gujarat boys Krish Porwal & Om Parikh.
All the best for your bright future from prabodhan goregaon👍💐🏆
प्रबोधन गोरेगावचा सुवर्णमहोत्सव 2022
५० वर्षांपूर्वीच्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालाय: शरद पवार
५० वर्षांपूर्वी छोटेसे रोपटे लावलेल्या प्रबोधन गोरेगाव या संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे. असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रबोधन गोरेगावच्या सुवर्णमहोत्सवावेळी काढले.
प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच, या सांगता सोहळ्यात कॉफीबुक टेबलचे आणि संस्थेच्या गेल्या ५० वर्षाच्या वाटचालीच्या चित्रफितीचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
१९९० साली पहिल्यांदा गोरेगावचा आमदार झालो तेव्हा, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मागितले होते. त्यांनी मात्र ५ लाख रुपयांचे अनुदान दिले आणि संस्था उभी राहिली, अशी आठवण सुभाष देसाईंनी आपल्या प्रास्ताविकात सांगितली.
मराठी माणसाला जोडून ठेवण्याचे काम प्रबोधन गोरेगाव संस्था करत आहे: उद्धव ठाकरे
प्रबोधनच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. फक्त नेतेगिरी करून कुणीही मोठा नेता होत नाही, तर कार्यकर्त्यांना मोठे करणारे, त्यांच्यासमोर आपला आदर्श ठेवणारे खरे नेते असतात, हेच सुभाष देसाईंनी प्रबोधनसाठी केलेल्या कार्यातून दाखवले आहे, असे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले.
मराठी माणसाला एकत्र ठेवणे आजच्या काळात गरजेचे आहे आणि तेच काम प्रबोधन गोरेगाव ही संस्था समर्थपणे करत आहे. याचे संपूर्ण श्रेय मराठी भाषा मंत्री आणि प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक सुभाष देसाई यांना जाते, अशा शब्दात उद्धव यांनी प्रबोधनचे कौतुक केले आणि संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी, सुभाष देसाई यांनी सांगितले की, शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आणि आपल्याला सहकार्य करणारे संस्थेचे सहकारी यामुळे संस्थेचे काम इतरत्र पोहोचले असून या संस्थेची वाटचाल अजूनही सुरू आहे.
प्रबोधन गोरेगावच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त संगीत दिग्दर्शक अजय-अतुल यांचा लाइव्ह-इन कॉन्सर्ट
प्रबोधन गोरेगावच्या ५०व्या सुवर्णमहोत्सवानिमित्त प्रसिध्द संगीत दिग्दर्शक अजय-अतुल यांचा लाइव्ह-इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. अजय- अतुल यांच्या गाण्यांचा आनंद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत गोरेगावकरांनी घेतला.
या कार्यक्रमाला संस्थेचे संस्थापक आणि उदयोगमंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, खासदार गजानन कीर्तिकर, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे आणि इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या निमित्ताने अजय-अतुल यांच्या गाजलेल्या सर्व गाण्यांचा लाइव्ह आनंद प्रेक्षकांना लुटता आला.
तसेच, अजय-अतुल यांच्यासोबत प्रसिद्ध गायक दिव्यकुमार, अभय जोधपूरकर, नागेश मोरवेकर, गायिका योगिता गोडबोले, प्रियांका बर्वे यांनी देखील प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
अजय- अतुल यांच्या संगीत मैफिलीला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कथा स्पर्धा निकाल - २०२१-२२
प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, गोरेगाव यांच्यातर्फे "कथा स्पर्धा" आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे.
कथा लेखन स्पर्धेचे विजेते
१ प्रथम क्रमांक- सौ. सुनेत्रा सुधाकर टिल्लू. (मुंबई)
कथा- "गाठ"
२ द्वितीय क्रमांक- डॉ. श्री. सचिन जम्मा. (सोलापूर)
कथा- "महात्मा भिकारी"
३ तृतीय क्रमांक- सौ. गौरी गाडेकर. (मुंबई)
कथा- "पातक"
४ उत्तेजनार्थ- श्री. गिरीष देसाई (मुंबई)
कथा- "शुभंकरोती"
५ उत्तेजनार्थ- श्री. अनिल खेडेकर (मुंबई)
कथा- "धोंडी"
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन व सहभागी स्पर्धकांचे मनापासून आभार. पुढील लेखन वाटचालीस वाङ्मयीन शुभेच्छा!
'जागतिक महिला दिनानिमित्त' प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातर्फे जागतिक महिला दिन हा कार्यक्रम ८ मार्च रोजी संपन्न झाला. 'स्त्री आरोग्य - तुझी कहाणी' या विषयावर जनरल फिजिशियन, सौंदर्य तज्ञ, लेखिका डॉ. स्मिता दातार यांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती.
सौ. मृदुला सावंत यांनी ही मुलाखत घेतली. 'स्त्री आरोग्य-तुझी कहाणी' या विषयावर बोलत असताना डॉ. स्मिता दातार यांनी स्त्रियांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर भाष्य केले. बालवयीन, किशोरवयीन, मध्यमवयीन आणि प्रौढअवस्थेत असताना कोणती काळजी घ्यायची याबाबत सांगितले.
स्त्रियांच्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी कोणता आहार घेतला पाहिजे याबद्दल माहिती दिली. मुलींमधील मानसिक आणि शारीरिक बदल कसे घडतात याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. मृदुला सावंत यांनी केले. हा कार्यक्रम प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, सिद्धार्थ नगर, गोरेगाव येथे पार पडला.
प्रबोधनकार ठाकरे वाचनालय गोरेगाव आणि कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने 'मराठी भाषा' दिनानिमित्त "मराठी भाषा गौरव दिन" हा कार्यक्रम २६ फेब्रुवारीला संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा श्रीमती नमिता किर होत्या. तसेच प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, गोरेगावचे प्रकल्पप्रमुख गोविंद येतयेकर हे प्रमुख पाहुणे होते.
तसेच कोमसापचे कार्याध्यक्ष कृष्णा नाईक, तसेच लेखिका, संपादिका, प्रकाशिका लता गुठे कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या होत्या. रेखा नार्वेकर कोमसापच्या विश्वस्त देखील कार्यक्रमास उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका पाटील आणि मनोज धुरंधर यांनी केले.
कृष्णा नाईक यांनी वि.वा. शिरवाडकर यांचे साहित्यावलोकन केले. त्यांच्या साहित्याबाबत माहिती दिली. श्रीमती. लता गुठे यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचा रसास्वाद केला. त्यांच्या प्रसिद्ध कविता ऐकवल्या त्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती देखील सांगितली. रेखा नार्वेकर यांनी कुसुमाग्रजांच्या आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षा नमिता किर यांनी मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा कधी मिळेल याची वाट पाहत असल्याचे आपल्या भाषणात सांगितले आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात रेखा नार्वेकर आणि सतिशचंद्र चिंदरकर यांनी कोमसापच्या सर्व शाखा अध्यक्षांचे सत्कार केले. तसेच कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त कवी, कवयित्री काव्यासंमेलन देखील या कार्यक्रमात आयोजित करण्यात आले होते. या काव्यसंमेलनाच्या अध्यक्षा गौरी कुलकर्णी होत्या. याप्रसंगी प्रबोधन गोरेगावचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ सल्लागार सदस्य डॉ.मनोहर अदवानकर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात कवी विनायक सुतार, राजेंद्र वाणी, प्रशांत राऊत, समीर बने, शांतीलाल ननावरे आणि कवयित्री मृदुला वाघमारे, वंदना पाटील यांनी कविता सादर केल्या. कुसुमाग्रजांच्या कवितांसोबत वसंत बापट आणि शांता शेळके यांच्या देखील कविता सादर करण्यात आल्या. श्रीमती. जयश्री संगीतराव यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. यावेळी सुवर्णा मयेकर लिखित स्मृतीगंध दरवळताना या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
मीनाताई ठाकरे रक्तपेढीच्या सहकार्याने रविवार १३ फेब्रुवारी रोजी समीर देसाई फाऊंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबीर
'प्रबोधन गोरेगाव' संचलित मीनाताई ठाकरे रक्तपेढीच्या सहकार्याने रविवार १३ फेब्रुवारी रोजी समीर देसाई फाऊंडेशन तर्फे जवाहर नगर हॉल मध्ये भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये ६६६ जणांनी रक्तदान केले आहे. त्या रक्तदान शिबिराला राज्याचे उद्येगमंत्री श्री. सुभाष देसाई , खासदार श्री गजानन कीर्तिकर , आमदार श्री सुनील प्रभू तसेच प्रबोधन गोरेगाव संस्थेचे अध्यक्ष श्री नितीन शिंदे यांनी भेट देऊन रक्तदात्यांना प्रोत्साहित केले. श्री समीर देसाई आणि त्यांच्या संपूर्ण टिमने तसेच आणि मीनाताई रक्तपेढी यांच्या टिमने रक्तदान शिबिर यशस्वी करण्याच्या दृष्टीने कामगिरी केली.
प्रबोधन टेनिस अकॅडमी येथील ऍक्रेलिक सिन्थेटिक लॉन टेनिस कोर्टचा दिमाखदार लोकार्पण सोहळा संपन्न
'प्रबोधन गोरेगाव' संचलित प्रबोधन टेनिस अॅकॅडमी आयोजित अॅक्रेलिक सिन्थेटिक लॉन टेनिस कोर्टचा लोकार्पण सोहळा २३ जानेवारी, रविवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रबोधन गोरेगाव संस्थापक, उद्योगमंत्री मा. श्री. सुभाष देसाई होते.
प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. श्री अजय नाईक, म्हाडाचे श्री. केतन पडते, श्री. कैलास तावडे, सनफ्लेक्स स्पोर्टस, इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. चे प्रमुख श्री.सुधीरन हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. श्री. सुभाष देसाई यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि पुस्तक देऊन सत्कार झाले.
प्रबोधन ठाकरे वाचनालय प्रकल्प प्रमुख श्री. गोविंद येतयेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अजय नाईक यांनी या कोर्टच्या नूतनीकरणाबाबत माहिती दिली. आधुनिक पद्धतीचा अॅक्रेलिक सिन्थेटिक लॉन टेनिस कोर्ट कशाप्रकारे बनवण्यात आला याबाबद्दल सांगितले. या अॅक्रेलिक सिन्थेटिक लॉन टेनिस कोर्टचा लोकार्पण सोहळा मा. श्री सुभाष देसाई यांच्या हस्ते फित कापून पार पडला.
मा. श्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, म्हाडाच्या सहकार्यामुळे हे काम शक्य झाले. तसेच कोरोनाच्या कालावधीत लोकांचे व्यायाम थांबले गेले होते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना या उपक्रमाचा वापर व्हावा यासाठी हे बनवण्यात आले आहे. हे सर्व उपक्रम फक्त जनतेसाठी आहेत आणि लवकरचं प्रबोधनची नवीन व्यायामशाळा स्थापन करण्याचा देखील त्यांचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रबोधन गोरेगावचे कार्याध्यक्ष गोविंद गावडे यांनी केले. याप्रसंगी प्रबोधन गोरेगावचे कार्यकारिणी समिती सदस्य व सल्लागार सदस्य व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या नवीन कोर्टमध्ये नवीन आधुनिक क्षमतेचे फ्लड लाईट्स आहेत आणि आधुनिक पद्घतीचा टेनिस कोर्ट नेट देखील आहे.
-गंधाली दिवाळी वार्षिक आयोजित 'गिरीजा कीर कथास्पर्धेचा' पुरस्कार वितरण समारंभ संपन्न
प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचा पुरस्कार वितरणात सहयोग
'गंधाली दिवाळी वार्षिक' आयोजित सुप्रसिद्ध साहित्यिका 'गिरिजा किर कथास्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. हा कार्यक्रम प्रबोधनकार ठाकरे वाचनालय यांच्या संयुक्त विदयमाने प्रबोधनाकर ठाकरे वाचनालय गोरेगाव येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रा. उषा तांबे प्रमुख पाहुण्या उपस्थित होत्या. तसेच किर कुटुंबातर्फे डॉ. संजय उमाकांत किर उपस्थित होते. तसेच 'गंधाली दिवाळी वार्षिक' चे संपादक डॉ. मधुकर वर्तक, ग्रंथपाल सौ.सुधा पाटील उपस्थित होत्या.
प्रा. उषा तांबे यांनी 'गंधाली दिवाळी वार्षिक' अंकाबद्दल माहिती सांगितली. तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले. कथालेखन, साहित्यलेखन याबाबत त्यांच्या जीवनातील उत्तम किस्से सांगितले. गिरीजा किर यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. स्वातंत्र्यानंतर कथेचं स्वरूप बदलतं गेलं आणि सत्य घटनांपेक्षा मनोव्यापाराला जास्त महत्त्व येत गेलं आणि तेव्हापासून आतापर्यंत काल्पनिक कथांना जास्त वाव मिळत गेला. असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमादरम्यान सर्व प्रमुख अतिथिंचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले. डॉ. संजय किर यांनी त्यांच्या आईचा म्हणजेच गिरीजा किर यांचा जीवनप्रवास उलगडला. 'गंधाली दिवाळी वार्षिक' अंकाबाबत माहिती सांगितली. तसेच नवीन लेखकांना संधी मिळावी यासाठी कथा स्पर्धा घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गिरीजा किर यांच्या साहित्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी मधुकर वर्तक यांचा खूप मोठा पुढाकार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ. मधुकर वर्तक यांनी या स्पर्धेबाबत मनोगत व्यक्त केले. 'गंधाली वार्षिक दिवाळी' अंकाबद्दल माहिती दिली. सन२०१९,२०२० आणि २०२१ तिन्ही वर्षातील स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस रक्कम देण्यात आली. या कार्यक्रमात कोरोनासंबंधी सर्व नियम व अटींचे पालन करण्यात आले होते.
२०१९ वर्षातील पारितोषिक विजेते
प्रथम क्रमांक
प्रमोद नामदेवराव बोरसरे, गडचिरोली (कथा-न उच्चारलेलं)
(सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व दिवाळी अंक)
द्वितीय क्रमांक
विजय शंकर खाडिलकर, माझगाव (कथा-शमा)
(सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व दिवाळी अंक)
तृतीय क्रमांक
चित्रा आनंद मेहंदळे, अंधेरी (कथा-गुंता)
(सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व दिवाळी अंक)
उत्तेजनार्थ
क्षमा गोसावी, विलेपार्ले (कथा- एकटीचं घर)
(प्रमाणपत्र व दिवाळी अंक)
उत्तेजनार्थ
सविता अशोक प्रभुणे, बारामती (कथा-वीस मिनीटातली वीस वर्षे)
( प्रमाणपत्र व दिवाळी अंक)
२०२० वर्षातील पारितोषिक विजेते
प्रथम क्रमांक
प्रा. रेखा विनायक बाबर, मुंबई (कथा- जगावेगळं नातं)
( सन्मानचिन्ह, प्रमाणापत्र, दिवाळी अंक आणि रोख रक्कम २००० रु)
द्वितीय क्रमांक
वासंती सुधाकर जोगळेकर, मुंबई (कथा-पुन्हा एकदा)
( सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, दिवाळी अंक आणि रोख रक्कम १५०० रु)
तृतीय क्रमांक
अलका कोठावदे, नाशिक (कथा-अश्रू)
( सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, दिवाळी अंक आणि रोख रक्कम १०००रु)
उत्तेजनार्थ
प्रमोद नामदेवराव बोरसरे, गडचिरोली (कथा-कचबावरा)
( सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, दिवाळी अंक आणि रोख रक्कम ५०० रु)
उत्तेजनार्थ
सुधाकर विठ्ठल दिक्षित, मुंबई (कथा- निरागस)
(सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, दिवाळी अंक आणि रोख रक्कम ५०० रु)
२०२१ वर्षातील पारितोषिक विजेते
प्रथम विजेते
हेमंत कोठीकर, मुंबई (कथा-मुसफिर)
( सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र , दिवाळी अंक आणि रोख रक्कम २००० रु)
द्वितीय क्रमांक
प्रमोद नामदेवराव बोरसरे, गडचिरोली (कथा-दोन ऑक्टोबर)
( सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, दिवाळी अंक आणि रोख रक्कम १५०० रु)
तृतीय क्रमांक
ज्योत्स्ना अरुण सावरकर, मुंबई (कथा-हे बंध रेशमाचे)
( सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, दिवाळी अंक आणि रोख रक्कम १०००रु)
उत्तेजनार्थ
क्षमा गोसावी, मुंबई (कथा-फक्त एका पत्रामुळे)
( सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, दिवाळी अंक आणि रोख रक्कम ५००रु)
उत्तेजनार्थ
मृदुला मोहन गोखले, ठाणे (कथा- देवदूत)
( सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, दिवाळी अंक आणि रोख रक्कम ५००रु)
प्रबोधन गोरेगाव संस्थेचे माजी कर्मचारी श्री .सुरज शिंदे यांच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया होऊन त्यांना त्यांचा पाय गमवावा लागला होता. परंतु सूरज शिंदे यांना पूर्ववत त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी प्रबोधन गोरेगाव संस्थेने पुढाकार घेत त्यांना आर्थिक मदतीचे सहकार्य केले, त्यामुळे श्री. शिंदे यांना जयपूर पाय बसविण्यात आला.
प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक आणि उद्योगमंत्री मा .श्री.सुभाष देसाई यांच्या हस्ते आर्थिक मदत म्हणून रुपये ४०,०००/- चा धनादेश श्री.सूरज शिंदे यांना सूपर्द करण्यात आला. यावेळी शिवसेना विभाग संघटक श्री. समीर देसाई, संस्थेचे सल्लागार सदस्य श्री .महादेव खानोलकर, श्री. श्रीनिवास शिर्सेकर, कार्यकारिणी सदस्य शशांक कामत उपस्थित होते.
पहिल्या ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’त ‘खिसा’ सर्वोत्कृष्ट!
‘साईड मिरर’, ‘लगाम’ यांचाही गौरव!
कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या नावाने सर्व पुरस्कार वितरीत!
'प्रबोधन गोरेगाव' संस्थेतर्फे आयोजित 'प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात' ‘खिसा’ या लघुपटाने सर्वेत्कृष्ट लघुपटाचा मान मिळवला आहे. याच लघुपटासाठी राज मोरे सर्वेत्कृष्ट दिग्दर्शक तर वेदांत क्षीरसागर सर्वेत्कृष्ट बालकलाकार ठरला आहे. मदन काळे दिग्दर्शित ‘लगाम’ या लघुपटाला दुसऱ्या क्रमांकाचे तर विराज झुंजारराव दिग्दर्शित ‘साईड मिरर’ला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे अभिनेते संदीप कुलकर्णी, प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, अशोक राणे, दिग्दर्शक निखील महाजन, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितिन शिंदे आदी उपस्थित होते.
राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबोधन गोरेगावच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने पहिला प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रभादेवी येथी ल पु.ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाटय़मंदिर येथे शुक्रवारी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि प्रसिध्द अभिनेते संदीप कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रवीण खाडे दिग्दर्शित ‘ताजमहाल’ हा सामाजिक महाराष्ट्र या विषयावरील सर्वेत्कृष्ट लघुपट ठरला. तर ‘वन्स ही डिड अटीनएज पेंटिंग’ या लघुपटासाठी दीक्षा सोनावणे सर्वेत्कृष्ट अभिनेत्री ठरली. या महोत्सवात ७७ मराठी लघुपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या. त्यामधून १५ लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. यातून सर्वोत्कृष्ट लघुपटाची निवड करण्यात आली आहे. यावेळी इफ्फी महोत्सवात जागतिक स्पर्धा वि भागात पुरस्कार पटकावणाऱ्या ‘गोदावरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन यांचा विशेष गौरव करण्यात आला.
या समारंभाचे प्रमुख पाहुणे अभिनेते संदीप कुलकर्णी म्हणाले “टेक्नॉलॉजी येते, फॉरमॅट्स बदलतात, सगळं काही बदलतं, मात्र कलाकार तोच राहतो, थियटर मधून, टेलिव्हिजन, चित्रपटातून सतत वेगळ वेगळ पहात रहा. मी सर जे.जे.मध्ये फाईन आर्टसला असताना आम्हाला तेव्हा पाचही वर्षे प्रख्यात पेंटर प्रोफेसर प्रभाकर कोलते हे शिक्षक होते, त्यांनी आम्हाला आर्टिस्ट म्हणजे काय हे डिस्कवर करायला लावलं. खरंतर मला पेंटर व्हायचं आणि पॅरिसमध्ये स्वतःचा स्टुडीओ सुरु करायचा, असं सर्वकाही ठरलं होत. मात्र हे करत असताना आंतरराष्ट्रीय चित्रपटांच एक्सपोजर पाहिलं आणि मी चित्रपटांकडे, त्यातील अभिनयाकडे आकर्षित झालो. कलाकार हा एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतो. हा फेस्टिव्हल सुद्धा तुमच्या जीवनात असाच असंच काहीतरी वेगळ घडवणार आहे. ‘प्रबोधन’.. सोबत जोडली गेलेली माणसे मुळात वेगळी आणि दिग्गज आहेत.”
या फेस्टिवलची रचना अत्यंत वेगळी आणि अभ्यासपूर्ण केली असून आपल्या मराठी कलावंतांनी निर्माण केलेल्या कलाकृती जगभरात नावाजल्या जाव्यात या उद्देशाने ‘कान्स’, ‘ओबरहौसेन’(जर्मनी), कार्लोवी वेरी(झेक रिपब्लिक) या तीन सर्वोत्कृष्ट जागतिक आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये पाठविण्यासाठी पाच लघुपटांची निवड करण्यात आली. यासाठीचा सर्व खर्च व प्रक्रिया “प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा”च्या वतीने केला जाणार आहे. या महोत्सवाचे परीक्षण मोनालिसा मुखर्जी, मंदार कमलापूरकर, समीक्षक पत्रकार लेखक गणेश मतकरी, मनोज कदम व विजय कलमकर यांनी केले.
करोनाचे सर्व नियम पाळून मोजक्याच कलावंत तंत्रज्ञांच्या उपस्थित पहिल्या ‘प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या’ अंतिम फेरीचे आयोजन पु. ल. देशपांडे कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले होते. या प्रसंगी ’५२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार मिळविणार्याग ‘गोदावरी’ या मराठी चित्रपटातील प्रमुख अभिनेते जितेंद्र जोशी यांचा विशेष सन्मान होणार होता मात्र जितेंद्र जोशी करोनाग्रस्त असल्याने त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्वांशी संवाद साधला.
महोत्सवातील पुरस्कार विजेते लघुपट
‘खिसा’ सर्वोत्कृष्ट लघुपट - प्रथम पुरस्कार
रु. ७५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)
‘लगाम’ सर्वोत्कृष्ट लघुपट - द्वितीय पुरस्कार
रु. ५०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)
‘साईड मिरर’ सर्वोत्कृष्ट लघुपट - तृतीय पुरस्कार
रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)
‘ताजमहाल’ सर्वोत्कृष्ट लघुपट सामाजिक लघुपट
रु. ७५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र
(रोख रक्कम दिग्दर्शक व निर्माते यांच्यात समान विभागून देण्यात येईल)
कान्स, ओबरहौसेन जर्मनी, कार्लोवी वेरी (झेक रिपब्लिक) या तीन सर्वोत्कृष्ट जागतिक महोत्सवांमध्ये
पाठविण्यासाठी निवड झालेले लघुपट
१. अर्जुन / दिग्दर्शक: शिवराज वाईचळ
२. बटर चिकन / दिग्दर्शक: मयुरेश वेंगुर्लेकर
३. साईड मिरर / दिग्दर्शक: विराज झुंजारराव
४. लगाम / दिग्दर्शक: मदन काळे
५. ताजमहाल / दिग्दर्शक: प्रविण खाडे
वैयक्तिक पुरस्कार
सर्वोत्कृष्ट अभिनेता - हरीश बारस्कर – (ताजमहाल)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री -दीक्षा सोनावणे – (वन्स ही डिड अ टीनएज पेंटिंग)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार - वेदांत क्षीरसागर – (खिसा)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - राज मोरे – (खिसा)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट पटकथालेखक - कैलास वाघमारे – (खिसा)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार -किरण जाधव – (लगाम)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट संकलक मयुरेश वेंगुर्लेकर - (बटर चिकन)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
सर्वोत्कृष्ट ध्वनि - अनमोल भावे – (अर्जुन)
(रु. १०,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र)
प्रबोधन गोरेगाव संस्थेअंतर्गत प्रबोधन टेनिस अकादमी मधील खेळाडूंनी एकत्र येत रविवारी दि. ५ डिसेंबर २०२१ रोजी टेनिस स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये चैतन्य मल्होत्रा आणि सिद्ध दोशी यांनी लॉन टेनिस (डबल) स्पर्धेत अटीतटीचा सामना जिंकला.
या स्पर्धेत टेनिसचे प्रशिक्षण वर्गातील सर्व वयोगटातील खेळाडू या खेळात सहभागी झाले होते. स्पर्धेचा विजेता चैतन्य मल्होत्रा याने सिद्ध दोशी याच्या मदतीने रिशा शहा आणि राजेंद्र कांगोकर विरुद्ध 6-5(13-11) हा सामना जिंकत विजेते पद पटकावले. तसेच रिशा शहा आणि राजेंद्र कांगोकर त्याचप्रमाणे कौस्तुभ नंबीडी यांना उपविजेता म्हणून घोषित करण्यात आले.
Ved Thakur is the double runner-up at the Sania Mirza Tennis Academy National level
Ved Vikas Thakur student of Prabhodhan & Sai Tennis academy won double Runner up trophy as well as certificate for National Level Series.... at Sania Mirza
Tennis Academy in Boys/U - 16 Category.
All the best for your bright future from prabodhan goregaon
प्रबोधन टेनिस अकॅडमी चा विद्यार्थी वेद ठाकुर याने सानिया मिर्झा टेनिस अकॅडमी राष्ट्रीय स्तरावरील दुहेरी स्पर्धेत उपविजेता हे पद पटकावले आहे. त्यामुळे प्रबोधन गोरेगाव संस्थेतर्फे वेद ठाकुर याचे अभिनंदन
वेंगुर्ले येथील बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील लघुपट मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सवा निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील बॅ. खर्डेकर कॉलेज मध्ये शनिवार दि. 20/11/2021 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजे पर्यंत नवोदित लघुपट निर्मात्यांसाठी कार्यशाळा (Workshop)आयोजित करण्यात आली होती.
धन्यवाद
विजू गावडे
वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, गोरेगाव यांच्यातर्फे कोरोना नियमांचे पालन करत " निंबध स्पर्धा" आयोजित करण्यात आली. या निबंध स्पर्धेच्या बक्षिस वितरणाच्या कार्यक्रमात
प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचे प्रकल्प प्रमुख श्री. गोविंद येतयेकर आणि प्रबोधन गोरेगाव संस्थेचे सह कार्यवाह श्री. पदमाकर सावंत यांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी उपस्थित सर्व विजेत्यांचे आणि वाचकांचे
मनापासून आभार..
विजेत्या स्पर्धकांची नावे खालीलप्रमाणे
1) प्रथम क्रमांक - श्री. जयराम नारायण देवजी
2) व्दितीय क्रमांक - सौ. सुनेत्रा सुधाकर टिल्लू
प्रबोधन गोरेगाव संस्थेचे सुवर्ण
महोत्सवी वर्ष
3) तृतीय क्रमांक - श्री. दिलीप प्रभाकर गडकरी
पुस्तक माणसाला रददी होण्यापासून
वाचवतात
4) उत्तेजनार्थ - श्री. अविराज यशवंत गोखले
पुस्तक माणसाला रददी होण्यापासून
वाचवतात
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक मा. श्री. सुभाष देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मीनाताई ठाकरे रक्तपेढी केंद्रात कोविड 19 लसीकरण मोहीम
सुरू आहे.
या मोहिमेला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.आतापर्यंत ११,००० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. प्रबोधन गोरेगाव या संस्थेचे खजिनदार श्री रमेश इस्वलकर हे या सेंटर चे उपक्रम प्रमुख म्हणून काम
पाहतात.
प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या दिवाळी अंक
आणि काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहिर
गंधाली, अधोरेखित व मौज दिवाळी अंक ठरले अंतिम विजेते
मुंबई ,दि. २८ ऑगस्ट- प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, गोरेगाव यांच्यावतीने उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धा २०१९ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. या दिवाळी अंक स्पर्धेत ‘गंधाली’ या दिवाळी अंकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. दुसरा क्रमांक ‘अधोरेखित’ तर तिसरा क्रमांक ‘मौज’ दिवाळी अंकाला प्रदान करण्यात आला आहे. आज झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात दिवाळी अंक स्पर्धा विजेते व काव्य लेखन स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या काव्यलेखन स्पर्धेत शरद यशवंत सबनिस यांनी प्रथम क्रमांक पटकवला आहे. तर व्दितीय क्रमांक सौ. कांचन कमलेश सरोळकर आणि तृतीय क्रमांक विजेते देवदत्त जोशी या विजेत्यांना पारितोषिक देण्यात प्रदान करण्यात आले. कोरोनोच्या कालावधीत सर्वच कार्यक्रमांना निर्बंध असल्यामुळे आज हा कार्यक्रम प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, गोरेगाव येथे संपन्न झाला.
प्रबोधन गोरेगावचे पदाधिकारी खजिनदार रमेश इस्वलकर, कार्याध्यक्ष गोविंद गावडे, सह कार्यवाह शरदचंद्र साळवी आणि कैलाश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान कार्यक्रम पार पडला. प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचे प्रकल्प प्रमुख गोविंद येतयेकर यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केलं. गेल्यावर्षी कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे व लॉकडाऊनमुळे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संस्थेला करता आला नाही. आता लॉकडाऊन काहीप्रमाणात शिथिल झाल्यामुळे जास्त प्रमाणात गर्दी न करता अगदी छोट्या प्रमाणात आजच पार पडला.
काळानुरुप सोशल मीडियाचा वापर अधिक व्यापक स्वरुपात वाढत आहे. वेळ काढून आपलं आवडतं पुस्तक वाचावे किंवा एखाद्या ग्रंथालयात जाऊन पुस्तक घ्यावं याबद्दल वाचकांना अभिरुची राहिली नाही. पुस्तकातला किडा हे फक्त म्हणण्यापुरताच राहिलं आहे. आपल्याला अशी फार कमी पुस्तकवेडी तरुणमंडळी दिसतील की ज्यांना वाचनाची फार आवड आहे. दिवाळी अंकांमुळे अनेक साहित्यिक प्रकाशात आले. अनेकांना जीवन जगण्या.ची उमेद प्राप्ता झाली असे मनोगत पुरस्कार विजेत्यांच्यावतीने व्यक्त करण्यात आले. प्रथम क्रमांक दिवाळी अंक विजेते गंधालीचे संपादक डॉ.मधुकर वर्तक, द्वितीय क्रमांक विजेते अधोरेखितच्या संपादिका डॉ.पल्लवी बनसोडे, तृतीय क्रमांक विजेते मौजच्या संपादिका डॉ. मोनिका गजेंद्रगडकर यांनी पुरस्काराचा स्वीकार केला.
*मीनाताई ठाकरे रक्तपेढीत आता रक्ताची चाचणी स्वयंचलीत यंत्रणेद्वारे ( fully automation ) सुविधा*
मुंबई : रक्तपेढीचे संस्थापक व शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गोरेगाव पश्चिम ओझोन अॅक्टिव्हिटी सेंटर येथे रक्तपेढी व रक्त सुरक्षा विषयावर मीनाताई ठाकरे रक्तपेढी आयोजित वैज्ञानिक परिसंवादाचे नुकतेच आयोजन केले होते.
यावेळी सुभाष देसाई यांनी आपल्या उदघाटनपर भाषणात गरजू रुग्णांना सुरक्षित रक्त पुरवण्यासाठी बदलत्या काळामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज यावर भर दिला. रक्तपेढीचे कामकाज व्यवस्थापित करण्यासाठी त्यांनी सल्लागारांचे आभार मानले आणि रक्तदानाच्या उदात्त कारणावर जोर दिला आणि स्वेच्छेने रक्तदानाच्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याची विनंती केली. प्रबोधनचे उपाध्यक्ष सतीश वाघ यांच्यासह या परिसंवादाच्या चर्चेत सहभागी झालेल्या पॅनल डॉक्टरांचा त्यांनी सत्कार केला. कोरोना महामारीच्या काळात त्यांच्या कर्मचार्यांनी रक्ताचा पुरेसा साठा कसा ठेवला याचा त्यांनी अभिमानाने उल्लेख करून रक्तपेढीच्या कर्मचार्यांचे त्यांनी कौतुक केले.
या परिसंवादाच्या आयोजनासाठी मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे तांत्रिक संचालक अविनाश शिरोडकर व आणि रक्तपेढी प्रमुख श्री रमेश इस्वलकर यांनी पुढाकार घेतला. थर्मल तपासणी, सॅनिटायझेशन, मास्क घालून या परिसंवादातील उपस्थितांनी कोविड 19 च्या प्रोटोकॉलचे कठोरपणे पालन केले गेले. मीनाताई ठाकरे रक्तपेढीची मालाड व दक्षिण मुंबई येथे दोन स्टोरेज सेंटर आहेत. मीनाताई ठाकरे रक्तपेढीने रक्तगट, क्रॉस मॅचिंग, अँटीबॉडी स्क्रीनिंग आणि टीटीआय रोगांचे परीक्षण करण्यासाठी स्वयंचलित नवीन उपकरणे उपयोगात आणून नवीन बदल केला असल्याची माहिती शिरोडकर यांनी दिली.
रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. आदित्य तरे यांनी मीनाताई ठाकरे रक्तपेढीने आधुनिकतेची कास धरत नव्याने स्थापित स्वयंचलित यंत्रांची तांत्रिक वैशिष्ट्ये, रुग्णांना रक्त सुरक्षा वाढविण्याच्या फायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली. ग्रुपिंग, क्रॉस मॅचिंग, एचआयव्ही सारख्या टीटीआय आजारासाठी विंडो कालावधी कमी करणे आणि प्रक्रियेसाठी लागणार वेळ कमी करणे याविषयीची संवेदनशीलता आणि वैशिष्ट्य या विषयी माहिती दिली. तसेच पुरेसे रक्त पिशव्या ठेवण्यासाठी हे स्टोरेज अद्ययावत रेफ्रिजरेटरने सुसज्ज आहे आणि डेटा लॉगद्वारे सतत तापमान देखरेख करत असल्याचे डॉ. तरे म्हणाले.
बॉम्बे हॉस्पिटलच्या ट्रान्सफ्यूजन मेडिसिनचे विभागप्रमुख डॉ. माया परिहार मल्होत्रा यांनी सुरक्षित रक्त पुरवण्यासाठी सहभागींना मोलाचे मार्गदर्शन केले. रक्तचाचण्या पद्धती, एलायझा , केमी, नॅट इत्यादी तसेच ट्यूब आणि नॅट तंत्रज्ञान, स्वयंचलित उपकरणे आणि एसओपी या विषयावर त्यांनी जोर दिला.
ऑपरेशन दरम्यानची आव्हाने याविषयावरील महत्त्वाच्या परिसंवादात डॉ माया परिहार मल्होत्रा, डॉ. उल्हास कुलकर्णी (एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूट), डॉ. अभय विसपुते (एमडी, एसआरव्ही हॉस्पिटल), डॉ. निखिल दातार (एमडी, क्लाऊडिन हॉस्पिटल), डॉ विशाल निवाडुंगे (मिल्लत हॉस्पिटल) यांनी सहभाग घेतला. डॉक्टर आणि रक्तपेढ्यांची अपेक्षा, वेगवेगळ्या रक्तपेढ्यांमधील तंत्रज्ञानाद्वारे वापरल्या जाणार्या तंत्रज्ञानाच्या आधारे (आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेने परवानगी दिल्याप्रमाणे) चाचणी शुल्कात बदल करण्याची कारणे, रूग्णांमध्ये घटक थेरपीची उपयोगिता, महत्त्व यासारखे अनेक घटक रक्ताच्या सुरक्षिततेमध्ये पूर्वपूर्व विश्लेषणात्मक प्रक्रिया (त्रुटी कमी करण्याचा अविभाज्य भाग आहे), रक्त संक्रमणापूर्वी आणि दरम्यान डॉक्टरांनी घ्यावयाची खबरदारी, रक्तसंक्रमणानंतरची प्रतिक्रिया टाळणे इत्यादी गोष्टीवर या परिसंवादात सविस्तर चर्चा झाली. ऑर्थो क्लिनिकल डायग्नोस्टिक्सचे नेस्लीन सुखाडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सहकार्य केल्याबद्दल ऑर्थो क्लिनिकल डायग्नोस्टिक्स उद्योग व्यवस्थापक रुपेश पेवेकर आणि सर्व मान्यवरांचे मनीषा बनसुडे यांनी आभार मानले. रमेश इस्वलकर यांच्या लीडर शिप खाली मीनाताई ठाकरे रक्तपेढीच्या संपूर्ण टीमने हा कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला
प्रबोधन संचालित प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने 'संवाद वाचकांचा, वाचकांशी'.. लॉकडाऊन नंतरचा हा पहिलाच कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला वाचकांचा उत्तम प्रकारे साथ मिळाली.
प्रबोधन गोरेगाव संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमांचे छायाचित्र आणि व्हिडिओ रसिक प्रेक्षकांना इंस्टाग्राम, युटयुब चॅनल आणि फेसबुक पेज या माध्याद्वारे पाहता येतील तसेच आपले मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना देखील लिंक शेअर करू शकता. खालील लिंकवर Like , Subscribe आणि Follow करायला विसरु नका.
आमची वेबसाईट : www.prabodhan.org
वेबसाईट ई- मेल आयडी : kridabhavan@prabodhan.org
युटयुब चॅनल लिंक : https://www.youtube.com/channel/UCqyWcVC3PsGMGIJ4TJb-asA?disable_polymer=true
फेसबुक पेज लिंक : https://www.facebook.com/Prabodhan.Goregaon/
इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/prabodhan_goregaon1972/
‘प्रबोधन धर्मादाय डायलिसीस केंद्र' लॉकडाउन दिवस २६ वा
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाने ४ वर्षांपुर्वी सुरू झालेले हे केंद्र सध्या या केंद्रात ७० पेशंट डायलिसिस सेवेचा लाभ घेत आहेत. Corona मुळे उदभवलेल्या आणीबाणीच्या परिस्थितीत डायलिसीस पेशंटसाठी केंद्र सुरू ठेवणे अत्यावश्यक आहे. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत केंद्र सुरु असते. यामध्ये डॉक्टर, टेक्नीशीअन, इतर मिळून १६ लोक काम करतात तसेच प्रत्येक Dialysis ची प्रक्रिया ही ४ तास चालते इतका वेळ पेशंट संपर्कात असतात अशा गंभीर परिस्थितीतही केंद्र सुरू ठेवण्याचा निर्धार केला...यातील काही टेक्नीशीअन लांब राहत असल्याने त्यांची सोय जवळील हॉटेलात केली असून ते येथेच राहून सेवा देत आहेत.
मुंबईतील अनेक Dialysis केंद्र बंद झाल्याने तेथील रुग्णांची अवस्था गंभीर आहे.... देसाई साहेबांच्या भक्कम पाठिंब्यामुळे येथे कोणत्याही गोष्टीची कमी आम्ही रुग्ण व टेक्नीशीअन यांना पडू देत नाही, मग ते PPE KIT, Sanitizer, Masks वा अन्य काही. या सर्व प्रयत्नांत डॉ. राजेश कुमार, डॉ वीरेंद्र गुप्ता, पूनम, शुक्ला, प्रशांत आणि प्रबोधन कार्यकारिणी या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे शिवधनुष्य पेलणे शक्यच नाही, अर्थात अजूनही लढाई संपली नाही ही अशीच चालू राहील.
सुनील वेलणकर, प्रकल्प प्रमुख
नागरिकांनी रक्तदान मोहिमेला सहकार्य करावे…
नागरिकांनी रक्तर्उदयोगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन
मुंबई : कोरोनाच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व जिल्हा प्रशासकीय यंत्रणा शर्तीचे प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने गोरेगाव येथे केएसके क्रिडा प्रतिष्ठान यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आगामी काळात रक्ताची गरज निर्माण झाल्यास रक्तसाठा कमी पडू नये याकरिता नागरिकांनी रक्तदान करुन सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांनी केले होते. त्यांच्या या आवाहानाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी समाजाप्रती मोलाचे सहकार्य केले.
देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा सप्ताह या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण ३२८ रक्तपिशव्या जमा झाल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शिबिरात योग्य ती खबरदारी बाळगण्यात आली होती. शिवाय सुरक्षित अंतर ठेऊन सर्वांना मास्क लावण्यास बंधनकारक केले होते. प्रबोधन गोरेगाव संस्थेचे अध्यक्ष श्री. नितीन शिंदे व श्री. अनिल देसाई यांच्या हस्ते आयोजकांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी बीजेपी युवा मोर्चा गोरेगाव तर्फे श्री. समीर देसाई, हर्ष पटेल, संदीप पटेल, दीपक ठाकूर, राजुल देसाई, श्रीकला पिल्ले, विक्रम राजपूत, अमेय मोरे, मिलिंद वाडेकर, निलेश सोमजी आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले.
या पार्श्वभूमीवर गोरेगाव येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात केएसके क्रिडा प्रतिष्ठान यांच्यातर्फे तब्बल १३३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. मा. सुभाष देसाई यांनी शिबिरास आवर्जून भेट देऊन आयोजकांसह कार्यकर्त्यांनाही प्रोत्साहित केले. यावेळी त्यांनी गरजू लोकांना या रक्तदानाचा लाभ होईल असे ही ते म्हणाले. त्यांच्यासोबत नगरसेवक श्री. स्वप्नील टेम्बवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान गणेश शिंदे यांनी रक्तदान शिबिरं आयोजित करुन एक चांगलं काम केल्याचं कौतुक करण्यात आलं. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी चित्रपट सेनेचे लक्ष्मण कदम, शाखा प्रमुख संजय जयस्वाल, राजू राजपूत, शशांक कामत, ग्राहक संरक्षण कक्षाचे लल्लेश भगत, अरविंद सावंत, अजय आणि आरती बारी आदी मान्यवरांनी उपस्थित राहून गणेश शिंदे यांच्या टीमला शुभेच्छा दिल्या. या रक्तदान शिबिरास मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे विशेष सहकार्य आणि योगदान लाभले.
कथाकथन स्पर्धा उत्साहात संपन्न
भरारी प्रकाशन आणि विश्वघर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय गिरीजा कीर आणि संयोजन प्रबोधनकार ठाकरे वाचनालय कथाकथन स्पर्धेचे प्रबोधन क्रीडाभवन येथील सभागृहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाचे प्रकल्प प्रमुख गोविंद येतयेकर, लेखक गुरुनाथ तेंडुलकर, तसेच लेखक, कवि, निर्माता भुपेंद्र मेस्त्री, डॉ.निर्मोही फडके आणि लता गुंठे भरारी प्रकाशन आदी मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लता गुंठे यांनी केले. तसेच तेथे उपस्थित पाहुण्यांचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. एकंदरीत या स्पर्धेत २५ महिला स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. कथाकथन म्हटलं की, प्रत्येक व्यक्तीच्या नजरेसमोर प्रथम बालपणी ऐकलेल्या आजीच्या गंमतीशीर गोष्टी स्मरणात येतात. कथाकथनाचे हे प्रकार अलीकडे लोप पावताना दिसत आहेत. त्यामुळे अशा घटकांची रुची समाजात कायम राहावी यासाठी कथाकथनाच्या स्पर्धा होणं गरजेचं आहे.
दरम्यान, प्रबोधन क्रीडाभवन येथे संपन्न झालेल्या कथाकथन स्पर्धेच्या निमित्ताने श्रोत्यांना वैविधपूर्ण अशा कथा ऐकायला मिळणं म्हणजे जणु काही 'दुग्ध शर्करा योगचं'. या स्पर्धेअंतर्गत काही महिलांनी लेखकांच्या स्वरचित कथा जसे.. नातं, आई बाबा, आजी, प्रेम असे विविध आशय - विषय असणाऱ्या धीरगंभीर, हलक्या फुलक्या, प्रेरणादायी कथेचे कथन केले. सभागृहात रंगलेल्या या स्पर्धेला परिक्षक आणि उपस्थित श्रोत्यांनीही उत्तम दाद दिली.
सवाई भीमसेन संगीत संम्मेलन
प्रबोधन गोरेगाव, आर्य संगीत प्रसारक मंडळ आणि इंडियन मॅजिक आय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत ‘‘सवाई भीमसेन संगीत संमेलन’’ प्रबोधन क्रीडाभवन येथे संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या उपस्थित मोठ्या जल्लोषात पार पडला. प्रबोधन गोरेगावच्या प्रबोधन क्रीडाभवनावरील भव्य पटांगणात 22 ते 24 नोव्हेंबर 2019 दरम्यान शास्त्रीय संगीताचा शानदार कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाअंतर्गत स्वरमंचावर उपस्थित कलाकारांचे प्रबोधन गोरेगावच्या कार्यकारिणी सदस्यांमार्फत पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.प्रख्यात शास्त्रीय संगीतकार पं. भीमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा देत शास्त्रीय संगीताची मैफील वाद्यवृंदाच्या संगतीने स्वरमंचावर रंगली होती.
दिग्गज कलाकारांसह नवोदित कलाकारांच्या अभुतपुर्व कलाकारीने वातारण प्रफुल्लित झाले. स्वरमंचावर सुर, लय आणि तालावर उमटलेले गायन, वादन व नृत्य यांच्या तिहेरी संगमातून शास्त्रीय संगीताचे बोल तसेच त्यातील राग, आलाप उलगडताना वाद्यवृंदाचा ठेका रसिक श्रोत्यांना ताल धरण्यास प्रवृत्त करत होते. तबला वादकांची जुगलबंदी पाहताना श्रोत्यांनी तर हातवारे ठेका धरुन कलाकारांना दाद दिली. याप्रसंगी प्रसिध्द शास्त्रीय संगीतकार श्री. श्रीनिवास जोशी, आनंद भाटे, निलाद्री कुमार, अंबी सुब्रमण्यम्, विजय घाटे, रघुनंदन पणशीकर आणि शीतल कोलव्हनकर, विराज जोशी, डॉ. पं. अजय पोहनकर आणि अभिजीत पोहनकर, अभय सोपारी, बेला शेंड सावनी शेंडे तसेच नयन घोष आणि इशान घोष आदी कलाकारांच्या कलाकारीचे रसिक श्रोत्यांनी गायन वाद्याचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या प्रत्येक दिवशी शास्त्रीय संगीताची मैफल ऐकण्यासाठी रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थिती होऊन कलाकारांना दाद देत आपली गायना बद्दलची प्रतिक्रीया दर्शवली. या कार्यक्रमानिमित्ताने शास्त्रीय संगीता बद्दलची आवड श्रोतृ वर्गाच्या उपस्थितीने पाहावयास मिळाली. कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा मराठी अभिनेत्री समिरा गुजर, दिप्ती भागवत आणि पुर्वी भावे यांनी सांभाळली.
'मीनाताई ठाकरे रक्तपेढी मुंबईतील आदर्श रक्तपेढी बनेल'
मुंबई, दि. 13 नोव्हेंबरः मीनाताई ठाकरे रक्तपेढी यांनी गेली 15 वर्षे रक्तदानाच्या क्षेत्रातमध्ये केलेले काम अतिशय उल्लेखनीय आहे. रक्तपेढीच्या सेवेचा उपयोग मीनाताई ठाकरे रक्तपेढी मार्फत समाजातील प्रत्येक घटकांपर्यत पोहचविला आणि आज मीनाताई ठाकरे रक्तपेढी नव्या वास्तूमध्ये स्थलांतरित होत असताना नजीकच्या काळात मीनाताई ठाकरे रक्तपेढी अधिक उत्तम पद्धतीने आपले कार्य करेल आणि मुंबई शहरातील एक आदर्श रक्तपेढी म्हणून ओळखली जाईल असा विश्वास प्रसिद्ध उद्योगपती डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केला.
गोरेगाव पश्चिम येथील सिदधार्थ महानगरपालिका रुग्णालयाला गेली 15 वर्षे सुरु असलेल्या मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे स्थलांतर आज नवीन वास्तूमध्ये समारंभपुर्वक करण्यात आले. डॉ. हिरानंदानी यांच्या हस्ते आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पाडला.
मीनाताई ठाकरे रक्तपेढी गरजूंना मोठा दिलासा देणारी अशी एकमेव रक्तपेढी ठरली आहे. अशा या जीवनदायिनी रक्तपेढीचे रुग्णांना सुलभपणे सोईस्कर रित्या लाभ व्हवा याकरिता मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे नवीन वास्तूत रूपांतर करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे डॉ. निरंजन हिरानंदानी यांच्या हस्ते वास्तूच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच अनेक मान्यवर मंडळांनी ही आपली उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.मृण्मयी हर्षल यांनी केलं. दरम्यान प्रबोधन गोरेगावचे संस्थापक श्री. सुभाष देसाई यांच्या हस्ते डॉ. निरंजन हिरानंदानी यांना पुष्प गुच्छ, शाल, पुस्तक आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याशिवाय रक्तपेढीत सतत न थकता आनंदाने आपले कर्तव्य बजावणाऱ्या स्टाफ ला तेथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता उपस्थित पाहुण्यांचे आणि मान्यवरांचे आभार मानून केले.
'रक्तदान शिबीर'
'महारक्तदानाला उदंड प्रतिसाद'
मुंबई : शिवसेना कलिना विधानसभा आणि सुप्रिमो फाउंडेशन वाकोला येथे आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.या शिबिरात १२१ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.
शिवसेना आमदार विभागप्रमुख संजय पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली पाठक टेक्निकल हायस्कुलच्या वातानुकूलित हॉलमध्ये रक्तदान शिबिर झाले. सौ.मीनाताई ठाकरे रक्तपेढी आणि जे. जे रुग्णालयात रक्तपेढीच्या सहकार्याने झालेल्या या रक्तदानासाठी सकाळपासून गर्दी होती. त्यामुळे सात तासात तब्बल ७२१ युनिट्स रक्त जमा झाले.
यावेळी शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, ऍड. लीलाधर डाके, परिवहनमंत्री ऍड. अनिल परब, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई आमदार मंगेश कुडाळकर, विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, सुधाकर सुर्वे, सुधार समिती अध्यक्ष सदा परब, विभाग संघटक संजना मुणगेकर आदी उपस्थित होते. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी रक्तपेढीचे रमेश इस्वलकर, गजा सावंत यांच्यासह सर्व पदाधिकारी,उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुखांनी मेहनत घेतली.
'मौ़ज कट्टा'
'मौज कट्टयाच्या मंचावर सुधीर गाडगीळ यांच्याशी दिलखुलास गप्पा'
मौज प्रकाशन गृह आणि प्रबोधन गोरेगांव आयोजित मौज कट्टा पुष्प ८वे 'मुलाखत मुलाखतकाराची' या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सुधीर गाडगीळ यांना आमंत्रित केले होते. सुधीर गाडगीळ यांनी ४००० हून अधिक मुलाखती घेतल्या आहेत.
अशा या अवलियाने अगणित किस्से प्रेक्षकांना सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला. जसे दूरदर्शनवरील चैत्रबन, मुलखावेगळी माणसं, पं. भीमसेन जोशी यांच्या संतवाणी कार्यक्रमात केलेले निवेदन, दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम, बाळासाहेब ठाकरे, इंदिरा गांधी, बाबुजी, गदिमा अशा अनेक जुन्या आठवणी जागवल्या.
त्याचबरोबर लता बाई, आशा ताई यांचे किस्से ऐकताना ६०० हून अधिक रसिक 2 तास मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. सुधीर गाडगीळ यांची स्वाती दिवेकर यांनी मुलाखत घेतली.
'जागतिक पुस्तकदिन'
'प्रबोधनकार ठाकरे आयोजित जागतिक पुस्तक दिन बालवाचकांसोबत साजरा'
मुंबई, २३ एप्रिलः बालवाचकांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी याकरिता जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पाहुणे उर्वशी नांगिया यांना निमंत्रित करण्यात आले होते. प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. सुधा पाटील यांच्या हस्ते पुस्तक देऊन उर्वशी नांगिया यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उर्वशी नांगिया यांनी लहान मुलांना पुस्तकांचा परिचय करुन दिला. प्रबोधनकार ठाकरे वाचनालयात लहान मुलांसाठी विविध विषयांवरील मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेतील पुस्तकांचा खजिना उपलब्ध असून वाचनाचा लाभ घेऊन आपल्या ज्ञानात वाढ करण्यास मुलांना सांगितले. तसेच कथाकथनाच्या तासाला तर मुलांनी कथेचा यथेच्छ आनंद घेतला. या व्यतिरिक्त उर्वशी नांगिया यांनी मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, याकरिता पुस्तकांशी संबंधित खेळांचे आयोजन केले. जसेः एखाद्या पुस्तकाच्या शिर्षकावरुन पुस्तक शोधणे व प्रत्येकांनी उभे राहून स्वतःचा परिचय देऊन गोष्टी, जोक्स आणि साधी सोपी अशी कोडी घालणे आदी खेळांचा समावेश या कार्यक्रमात करण्यात आला. या खेळांद्वारे व्यक्त होणारा मुलांच्या चेह-यावरचा आनंद हा जणूकाही उत्तम ज्ञान अवगत झाल्याची पावती !
'प्रबोधन गोरेगाव ४७ वा वर्धापनदिन'
‘प्रबोधन गोरेगाव’ संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
संगीत – नाट्यप्रवेश व २० वादकांसोबत एक अविस्मरणीय सायंकाळ
मुंबई, दि. ६ एप्रिलः पु.ल – गदिमा – बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व प्रबोधन गोरेगाव आयोजित दि. ६ एप्रिल २०१९, रोजी सायंकाळी प्रबोधन गोरेगाव संस्थेचा ४७ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला मराठी नाट्यसृष्टीतील कलाकार व संगीतकारांनी २० वादकांसोबत पु.ल – गदिमा – बाबूजी यांच्या आठवणींना उजाळा देणारी अभिनय आणि सुरेल संगीतातून उत्तम सादरीकरण करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक श्री. सुभाष देसाई यांनी प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या स्थापनेपासूनच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे सारस्वत बँकेचे अध्यक्ष श्री. गौतम ठाकुर यांना संस्थेचे अध्यक्ष श्री. नितिन शिंदे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये संस्थेचे संस्थापक श्री. सुभाष देसाई, अध्यक्ष श्री. नितिन शिंदे, उपाध्यक्ष श्री. पुष्कराज कोले, सह कार्यवाह श्री. समीर त्रैलोक्य, कार्याध्यक्ष श्री. गोविंद गावडे, प्रमुख कार्यवाह श्री. सुनिल वेलणकर, सह कार्यवाह श्री. पद्याकर सावंत, खजिनदार श्री. रमेश इस्वलकर तसेच आदि उपस्थित मान्यवरांनी संस्थेला पुढच्या वाटचालीस स्नेहाकिंत शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला मराठी सृष्टीतील नामवंत कलाकार पुष्कर श्रोत्री व हेमांगी कवी तसेच गायक रविंद्र साठे, अजित परब, ऋषिकेश रानडे, मुग्धा वैश्यंपायन व अमृता नातू अशा संगीतकारांद्वारे स्वर - ताल – लयीला साजेसे असे विविध गाण्यांचा नजराणा म्हणजे जणू काही, श्रोत्यांसाठी एकप्रकारचा सुखद आनंद अनुभवायला मिळाला.
'मुंबई टी-२० क्रिकेट सामने २०१९'
साळवीच्या तुफान फटकेबाजीने एम. आय. जी. ला विजेतेपद
मुंबई: दि. २८ मार्च, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने आणि प्रबोधन गोरेगाव संस्थेच्यावतीने ‘१२ वी मुंबई टी – २० क्रिकेट सामना’ दि. ११ ते १४ एप्रिल, २०१९ या कालावधीत प्रबोधन क्रिडाभवनाच्या मैदानात खेळविण्यात आली होती. प्रबोधन गोरेगावचे संस्थापक मा. श्री. सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेतून मुंबई शहरातील तरुण खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी प्राप्त झाली आहे. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रबोधन गोरेगावचे संस्थापक मा. श्री. सुभाष देसाई यांच्या हस्ते (एम. आय.जी.) च्या विजेत्या खेळाडूंना चषक व रोख रक्कम १,००,००० रु. आणि उपविजेता खेळाडूंना चषक व रोख रक्कम ५०,००० रु. देऊन सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी हिंदुस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णाधार श्री. दिलीप वेंगसरकर, श्री. रवी मांद्रेकर, दीपक जाधव, तुकाराम सुर्वे, श्री. विलास गोडबोले, आदि मान्यवर क्रिकेटपटू उपस्थित होते.
प्रबोधन क्रिडाभवनाच्या मैदानावर खेळल्या जाणा-या चार दिवसीय मुंबई टी – २० क्रिकेट सामन्यात मुंबई शहरातील आठ नामवंत व्यावसायिक संघानी सहभाग घेतला होता. स्वप्नील साळवीच्या २८ चेंडूवरील तुफानी नाबाद ७१ धावांच्या खेळीमुळे एम.आय.जी. क्रिकेट क्लबला एका स्वप्नवत विजयासह १२ व्या प्रबोधन मुंबई टी – २० क्रिकेट स्पर्धेतले हातून निसटू पाहणारे विजेतेपद काबीज करता आले. शिवाजी पार्क जिमाखान्याने उभे केलेले २३५ धावांचे डोंगराएवढे आव्हान मग हाती १० चेंडू राखून विजेत्यांनी पार केले. या स्पर्धेतल्या तिन्ही सामन्यांमध्ये एम. आय. जी. ने आपल्या श्रेष्ठ फलंदाजीचे प्रदर्शन केले. आजच्या विजयामध्ये त्यांच्या सर्वच फलंदाजांनी योगदान दिले. त्या तुलनेत शिवाजी पार्ककडून आकाश आनंद (९६) आणि निनाद कदम (८४) यांनीच काय ती ठळक कामगिरी बजावली. अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून स्वप्नील साळवी याची तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून शम्स मुलांनी (एम.आय.जी) याला गौरविण्यात आले. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा.
प्रबोधन गोरेगाव आयोजित प्रबोधनकार ठाकरे वाचनालय 'जागतिक महिला दिन' साजरा करण्यात आला. डॉ. शुभांगी पारकर यांनी 'स्त्रिया आणि त्यांचे आरोग्य' या विषयावर उत्तम मार्गदर्शन केले.
महिला दिन म्हटलं की, सर्व थरातून महिलांचे 'कोड कौतुक' केलं जातं. परंतु खरे पाहता भारतासारख्या प्रगतीशील देशात स्त्रियांनी स्वतःला एका कक्षेत बांधून घेतले आहे , ज्यामध्ये त्या स्वतःला विसरून इतरांच्या सुखाचा अधिक विचार करतात. अशावेळी स्वतःच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रियांना त्यांच्या आरोग्यविषयक हक्क आणि जाणिवा जागृत करण्याची गरज आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात शिर्मिला कलगुटकर यांनी डॉ. पारकर यांच्या परिचयाने केली.दरम्यान, डॉ. पारकर यांनी वैद्यकीय क्षेत्रातील स्वानुभवातील असा एक प्रसंग सांगितला की, काळजाचा ठोका चुकवणारा.. खेड्यातील एका घरात २५ वर्ष एका स्त्रीला डांबून ठेवले होते . तिला भुताने झपाटले म्हणून दर अमावस्येला लिंबू व काळी बाहुली घरात बांधून ठेवायचे असा प्रकार सलग २५ वर्ष चालू होता. जेव्हा डॉ. पारकर त्या भागात गेल्या त्यावेळी त्यांना ती केस समजली तेव्हा त्यांनी त्या स्त्रीला हॉस्पिटलमध्ये आणण्यास सांगितले. त्यानंतर तिच्यावर वैदकीयदृष्ट्या उपचार केल्यास असं आढळलं की, ती स्त्री मानसिकदृष्ट्या आजारी आहे तिला चांगल्या उपचाराची गरज आहे , त्यानुसार डॉक्टरांनी त्या स्त्रीला नर्सच्या निगराणीखाली शारीरिक दृष्ट्या स्वच्छ करून मानसिकरित्या उत्तम उपचार केले. यावरून असं दिसून येतं की, आज ही समाज अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आयुष्याशी खेळत असतो. असे अनेक प्रसंग डॉ. पारकर यांनी श्रोत्यांपुढे व्यक्त केले. या कार्यक्रमाअंतर्गत आजच्या आधुनिक जगात सामोरे येणाऱ्या आव्हनांना तोंड देत असताना आरोग्यविषयक भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे डॉ. शुभांगी पारकर यांनी मुलाखतीतून दिली.
कार्यक्रमाची सांगता स्त्रीयांच्या आरोग्यदृष्ट्या प्रश्नांकडे सामाजिक पातळीवर आणि कौटुंबिक पातळीवर काळजीपूर्वक पाहिले तरच स्त्रियांचे आरोग्य उत्तम राहिल असा मोलाचा संदेश ही डॉ. पारकर यांनी कार्यक्रमा अखेर दिला.
'प्रबोधन व्यासपीठ (निसर्गोपचार तज्ञ)'
निसर्गोपचार तज्ञ डॉ. पदमाकर सिताराम देसाई यांचे व्याख्यान
प्रबोधन गोरेगाव संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आयोजित प्रबोधन व्यासपीठावर निसर्गोपचार तज्ञ डॉ. पदमाकर सिताराम देसाई यांना निमंत्रित करण्यात आले होते. प्रबोधन व्यासपीठ या कार्यक्रमाची सुरुवात अँड. विकास रेळे यांच्या सुत्रसंचालनाने झाले. सल्लागार सदस्य श्री. सुरेश चव्हाण यांच्या हस्ते पुस्तक देऊन पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला. निसर्गोपचार या विषयाच्या अनुषंगाने मानवी शरिरात होणारे बदल आणि त्यावरील होमिओपॅथिक पद्धतीने एखाद्या आजाराचे निवारण कशाप्रकारे केले जाते यासंदर्भातील उपाय त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले. वैद्यकिय उपचाराने जर एखादा आजार बरा होत नसेल तर आयुर्वेदिक (निसर्गोपचार) पद्धतीचा उपयोग केला पाहिजे. त्याचप्रमाणे दिवसातून नियमित अर्धातास तरी बाहेर मोकळ्या हवेत फिरायला जाणे आवश्यक आहे. त्यामुळे मन पसन्न राहण्यास मदत होते. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. पदमाकर सिताराम देसाई यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देऊन शंका निरसन करण्यात आले. या कार्यक्रमाचा श्रोत्यांनी मनमुराद आस्वाद घेतला.
'जागतिक महिला दिवस संपन्न'
प्रबोधनकार ठाकरे वाचनालयात रंगले कवयत्रींचे संम्मेलन.
प्रबोधन गोरेगाव संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालय यांच्यावतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ‘अंतरंग स्त्री मनाचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ९ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता जागतिक महिला दिन अनोख्या पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षणाच्या प्रशासकीय अधिकारी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचे वैदिक काळापासून आजच्या काळापर्यत स्त्रीचा प्रवास व मनोगत या विषयाला अनुसरुन अत्यंत मार्मिकपणे सरळ सोप्या भाषेत व्याख्यान केले. तसेच कवयित्रींचे काव्यसंमेलन भरवण्यात आले. दरम्यान, ग्राहकोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
महिला दिनाच्या कार्यक्रमाची प्रमुख अतिथी डॉ. मंजुषा कुलकर्णी आणि कवयित्रींच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रबोधन गोरेगावचे सल्लागार समिती सदस्यांनी कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थिती दर्शवली. प्रबोधन गोरेगावचे सल्लागार सदस्य अँड. विकास रेळे, प्रकल्प प्रमुख श्री. गोविंद येतयेकर आणि कार्यकारिणी सदस्य श्री. महेश करमरकर यांच्या हस्ते पाहुण्यांना पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पल्लवी बनसोडे यांनी सुंदर कविता गाऊन केले.
‘वैदिक काळापासून आजच्या काळापर्यत स्त्रीचा प्रवास व मनोगत’ या विषयाला अनुसरुन प्रमुख पाहुणे ज्येष्ठ साहित्यिका डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी ऋगवेदातून स्त्रीच्या मानवी मनोवृत्तीचे विश्लेषण व्यक्त केले. स्त्रीची मानसिकता बदलणे ही जरी काळाची गरज असली तरी प्रत्यक्षात स्त्रीच्या सुरक्षितेचा आणि आरोग्याबाबत निर्माण होणारे प्रश्न सोडवणे ही खरी काळाची गरज झाली आहे. समाजातील प्रत्येक स्तरातील स्त्रिया या सामाजिक, राजकीय, आर्थिक व धार्मिक क्षेत्रात सहभागी होऊ लागल्या असल्यातरी प्राचीन काळापासून समाजाने घातलेल्या मर्यादांचे पालन कशोसीने करावे लागते. जसे अरुंधती, विश्पला, अपाला, गुप्तहेर इंद्रसेना, सुर्यकन्या, जुहू, झबाला, इतरा, उर्वशी आणि मैत्री या स्त्रियांच्या गाथा त्यांनी कथेमधून अप्रतिम साध्या सरळ भाषेत श्रोत्यांपुढे मांडल्या. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कवयित्री लता गुठे, ज्योत्स्ना राजपूत, अँड. छाया गोवारी, गौरी कुलकर्णी, वृक्षाली विनायक, पल्लवी बनसोडे आणि कविता राजपूत आदि कवयित्रींनी स्त्रीच्या भावनिक विश्वाचे काव्यरुपी शब्दात व्यक्त केले. श्रोत्यांनीही या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला. कार्यक्रमाची सांगता निवेदिकेच्या सुंदर कवितेच्या ओळीने झाली.
'मराठी भाषा गौरव दिन' उत्साहात संपन्न.
मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून प्रबोधन गोरेगाव संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आयोजित 'मराठी भाषा गौरव दिन' गुरुवारी २७ फेब्रुवारी २०२० रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांना आमंत्रित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात मृदुला सावंत यांनी डॉ.खांडगे यांच्या परिचयाने केली. प्रबोधन गोरेगावचे सल्लागार सदस्य भाऊ खानोलकर यांच्या हस्ते डॉ. खांडगे यांचा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रबोधन गोरेगावचे सल्लागार समितीने आवर्जून उपस्थिती दर्शवली.
डॉ. प्रकाश खांडगे हे लोककलेचा चालता बोलता इतिहास आहेत. या कार्यक्रमादरम्यान खांडगे यांना लोकसाहित्याचे प्रगल्भ ज्ञान असल्याचे व्याख्याण्यातून प्रकर्षाने जाणवले. तसेच खांडगे यांनी लोकसाहित्य म्हणजे काय? याचा अर्थ स्पष्ट करून सांगितला. दरम्यान, मराठी भाषेला लोकसाहित्याची परंपरा लाभलेली असून या पारंपरिक लोकसाहित्याची जागा ही आजच्या काळातील नवनिर्मित संगीताने घेतल्याने लोककलेचे महत्त्व ही कमी होऊ लागल्याची खंत व्यक्त केली . त्याशिवाय या आधुनिक प्रगतिशाली युगात वाढते महिलांवरच्या अत्याचाराला आळा घालायचा असेल तर पालकांनी लहान वयातच मुलांना संत जनाबाई , बहिणाबाई आदी संतांच्या ओव्या आणि अभंग वाचायला दिले पाहिजे.त्यामुळे स्त्रियांविषयी आदराची भावना वृद्धिंगत होईल. असे ही डॉ. खांडगे यांनी आपले विचार श्रोत्यांपुढे व्यक्त केले. याप्रसंगी खांडगे यांनी मराठी भाषा ही लुप्त होत असून ती अविरतपणे जपण्याचा मोलाचा संदेश श्रोत्यांना देत कार्यक्रमाची सांगता केली.
'चिल्ड्रन कॉर्नरचे उदघाटन'
प्रबोधन गोरेगावचे संस्थापक आणि राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रबोधन गोरेगाव संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या वतीने नव्याने सुरु करण्यात आलेल्या प्रबोधन चिल्ड्रन कॉर्नरचे उदघाटन करण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक खात्याच्या राजा राममोहन रॉय प्रतिष्ठान, कोलकत्ता यांच्या अर्थ सहाय्यातून प्रबोधन चिल्ड्रन कॉर्नरची उभारणी करण्यात आली आहे. राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये मुंबईमध्ये सुरु करण्याचा बहुमान प्रथमच प्रबोधन चिल्ड्रन कॉर्नरला मिळाला आहे. लहान मुलांच्या वैयक्तिक विकासासाठी व त्यांची बौध्दिक क्षमता अधिक प्रगल्भता अधिक वृध्दींगत करण्याच्या दृष्टीने प्रबोधन गोरेगाव चिल्ड्रन कॉर्नर सुरु करण्यात आला. मुलांच्या बौध्दिक क्षमतेचा विचार करुन भविष्यात येणारे यश अपय़श पचविण्याचे सामर्थ्य निर्माण व्हावे तसेच भविष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन या विचाराने चिल्ड्रन कॉर्नरची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी श्री. सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रबोधन वेबसाईटचे (www.prabodhan.org) उद्घाटन करण्यात आले. प्रबोधन गोरेगाव चिल्ड्रन कॉर्नरच्या आकर्षक लोगोचे अनावरणही याप्रसंगी करण्यात आले. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानचे क्षेत्रीय अधिकारी पश्चिम विभाग श्री. अनंत वाघ, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष श्री. नितिन शिंदे, उपाध्यक्ष सतीश वाघ, कार्याध्यक्ष गोविंद गावडे, प्रमुख कार्यवाह सुनिल वेलणकर, उपक्रम प्रमुख गोविंद येतेयकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई:दि.12 डिसेंबर: सालाबादाप्रमाणे यावर्षी ४2 वा प्रबोधन गोरेगाव आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे गोरेगाव क्रीडाभवनात मोठ्या जल्लोषात शुभारंभ करण्यात आला. आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व कॅबिनेटमंत्री मा. श्री. सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मा. श्री. सुभाष देसाई यांनी क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाल्याची घोषणा करुन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संस्थेचे हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सल्लागार समिती आदि मान्यवरांची उपस्थिती होती. प्रबोधन गोरेगाव क्रीडा महोत्सव दि. 12 ते 15 डिसेंबर २०१9 या कालावधीत घेण्यात येईल.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 42 वा प्रबोधन गोरेगाव आंतरशालेय क्रीडामहोत्सवाचे गोरेगाव क्रीडाभवनात मोठया उत्साहात साजरा झाला. प्रबोधन क्रीडामहोत्सव दि. 12 ते 15 डिसेंबर 2019 या कालावधीत घेण्यात आला. पश्चिम उपनगरातील वांद्रे ते दहिसर या भागातील शालेय विद्यार्थांसाठी हा क्रीडामहोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रतिवर्षी वाढणारा शालेय विद्यार्थांचा सहभाग तसेच क्रीडाप्रेमींकडून मिळणारा वाढता प्रतिसाद हा प्रबोधन आंतरशालेय क्रीडाभवनासाठी गौरवाची बाब ठरली आहे. या स्पर्धेअंतर्गत कबड्डी, बुध्दीबळ, खो-खो, मल्लखांब, जलतरण, लॉन टेनिस, तिरंदाजी, कराटे, संचलन, गोळा फेक, थाळीफेक आणि लोकनृत्य आदी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
क्रीडा महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ 15 डिसेंबर 2019 रोजी क्रीडाभवनात प्रमुख पाहुणे श्री. नितिन सावंत, प्रबोधन गोरेगावचे उपाध्यक्ष श्री. सतीश वाघ, संदिप सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तर शाळेतील विद्यार्थांनी आपल्या नृत्यशैलीतून सांस्कृतिक परंपरेवर आधारलेले बहारदार लोकनृत्ये सादर करत उपस्थित श्रोत्यांची मनं जिंकली. याशिवाय येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. क्रीडामहोत्सवातील सर्वोत्कृष्ट संघाचे ‘प्रबोधन मानचिन्ह’ महात्मा गांधी विद्यामंदिर, वांद्रे या शाळेने पटकाविला.
प्रबोधन गोरेगाव संचालित प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आयोजित प्रबोधन व्यासपीठावर प्रमुख पाहुणे श्री. प्रबंध राऊळ आणि सामना मराठी पेपरच्या उपसंपादिका नमिता वारणकर यांना निमंत्रित केले होते. कार्यक्रमाचे निवेदन निरंजन पुरव यांनी केलं. तसेच प्रबोधन व्यासपीठाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. विकास रेळे यांनी पाहुण्यांच्या परिचयाने केलं. या कार्यक्रमाअंतर्गत प्रबोधन गोरेगावचे सल्लागार सदस्य श्री. सुरेश चव्हाण यांच्या हस्ते पाहुण्यांचा पुस्तकरूपी भेट देऊन सत्कार करण्यात आला.
नमिता वारणकर आणि प्रबंध राऊळ यांनी 'हे सगळं असंय'..कविता म्हणाल तर' या आगळ्या वेगळ्या कवितेतील भावबंधाला जोडणाऱ्या शब्दांची काव्यरचनात्मक मांडणी अत्यंत सुरेखपणे मांडली. जसे पावसाच्या थेंबातून अलगद हळुवारपणे नजरेसमोर येणाऱ्या आठवणींचा ओलावा, स्त्रियांच्या ह्रदयातील होणारी परिस्थितीजन्य चलबिचल, प्रेमाचा ओलावासह विरह आदी संदर्भासहित कविता शब्दशः काव्यरचनेतून मांडल्या. कवितेच्या प्रत्येक ओळींचा भावार्थ उमगल्याचा श्रोत्यांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादेतून अनुभवयास मिळाला.
मुंबई,दि.12 डिसेंबर: सालाबादाप्रमाणे यावर्षी ४2 वा प्रबोधन गोरेगाव आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे गोरेगाव क्रीडाभवनात मोठ्या जल्लोषात शुभारंभ करण्यात आला. आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व कॅबिनेटमंत्री मा. श्री. सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मा. श्री. सुभाष देसाई यांनी क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाल्याची घोषणा करुन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संस्थेचे हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सल्लागार समिती आदि मान्यवरांची उपस्थिती होती. प्रबोधन गोरेगाव क्रीडा महोत्सव दि. 12 ते 15 डिसेंबर २०१9 या कालावधीत घेण्यात येईल.
'प्रबोधन टेनिस अकॅडमीचा स्पर्धक वेद ठाकुर ने विजेतेपद पटकावले.'
मुंबई स्कुल स्पोर्ट असोसिएशनतर्फे आंतरशालेय आयोजित टेनिस स्पर्धेत प्रबोधन टेनिस अकॅडमी व साई टेनिस अकॅडमीचा प्रतिनिधी कु. वेद विकास ठाकुर याने उत्तम यश संपादित केले. या स्पर्धेअंतर्गत 14 वर्षाखालील मुलांच्या गटातून कु. वेद विकास ठाकुर याला विजेता घोषित करण्यात आले. तसेच या विजेत्या स्पर्धकाला गोल्ड मेडल आणि ट्रॅाफी देऊन गौरविण्यात आले.
४१ वा प्रबोधन गोरेगाव आंतरशालेय क्रीडा महोत्सव
सालाबादाप्रमाणे यावर्षी ४१ वा प्रबोधन गोरेगाव आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे गोरेगाव क्रीडाभवनात मोठ्या जल्लोषात शुभारंभ करण्यात आला. आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व उद्योगमंत्री मा. श्री. सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मा. श्री. सुभाष देसाई यांनी क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाल्याची घोषणा करुन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संस्थेचे हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सल्लागार समिती आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय अँथलीट रचिता पांडा - मिस्त्री आदि मान्यवरांची उपस्थिती होती. प्रबोधन गोरेगाव क्रीडा महोत्सव दि. ५ ते ८ डिसेंबर २०१८ या कालावधीत घेण्यात आला.
प्रबोधन व्यासपीठ
'प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आयोजित प्रबोधन व्यासपीठ व्याख्यान ‘मला भावलेले कलावंत’'
मुंबई, दि. २० जुलैः प्रबोधन गोरेगाव संचालित प्रबोधनकार ठाकरे आयोजित प्रबोधन व्यासपीठावर ‘मला भावलेले कलावंत’ या विषयाला अनुसरुन व्याख्यान देण्यासाठी श्री. प्रदिप देसाई यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची सुरुवात प्रबोधन गोरेगावचे सल्लागार ऍड. श्री. विकास रेळे यांनी पाहुण्यांच्या परिचयाने केला. प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष श्री. नितिन शिंदे यांच्या हस्ते श्री. प्रदिप देसाई यांना पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
‘मला भावलेले कलावंत’ या विषयावर श्री. प्रदिप देसाई यांनी त्यांना भावलेले कलावंतांचे अत्यंत साध्या सोप्या भाषेत वर्णन केले. या नाट्यसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवलेल्या कलाकारांची जीवनशैली त्यांचे आचारविचार, राहणीमान आदी बाबींचा उल्लेख देसाई यांनी आपल्या व्याख्यानातून प्रेक्षकांना सांगितले. आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे व प्रभाकर पणशीकर यासारखे दिग्गज नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते आदी क्षेत्रात ठसा उमटवणारे अशा कलावंतांचा जीवनक्रम देसाई यांनी प्रक्षेकांसमोर मांडला. कार्यक्रम चालू असताना श्री. प्रदिप देसाई यांनी प्रक्षेकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली. रसिक प्रक्षेकांनी या कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
महापौर चषक खो–खो स्पर्धा
मुंबई महापालिका संघाने पटकाविले विजेतेपद
प्रबोधन गोरेगाव आयोजित मुंबई महापौर चषक खो – खो स्पर्धेचे प्रबोधन क्रीडाभवनात यशस्वी आयोजन
मुंबई दि. 8 महाराष्ट्र खो – खो असोसिएशनच्या मान्यतेने व मुंबई उपनगर खो – खो संघटनेच्या विद्यमाने मुंबई महानगरपालिका आयोजित ‘३२ वी मुंबई महापौर चषक खो – खो स्पर्धेचे’ ५ ते ८ मार्च दरम्यान प्रबोधन क्रीडाभवन येथे आयोजित करण्यात आले. प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या पुढाकाराने ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये महिला – पुरुष व व्यावसायिक गटाच्या स्पर्धकांना प्राधान्य देण्यात आले होते. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक, शिवसेना नेते व उदयोग मंत्री मा. श्री. सुभाष देसाई यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके आणि चषक व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आले. तसेच विशेष अतिथी महाराष्ट्र राज्य खो – खो संघटनेचे सरचिटणीस श्री. संदिप तावडे, अँड. अरुण देशमुख, प्रबोधन गोरेगावचे कोषाध्यक्ष श्री. रमेश इस्वलकर, तुषार सुर्वे, बालाजी राणे, प्रशांत पाटणकर, नारायण सावंत व अनेक माजी खेळाडू, पंच आदि मान्यवर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
मुंबई महापौर खो – खो स्पर्धेत व्यावसायिक गटात मुंबई महापालिका संघाने विजेतेपद पटकावले. पुरुष गटात महात्मा गांधी स्पोर्टस अँकडमी आणि ओम समर्थ भारत व्यायाम मंदिर संघ यांनी अंतिम फेरी गाठली. मुंबई महापालिकेने निर्णायक लढतीत पश्चिम रेल्वेचा १० – ९ असा एक गुण आणि ६.३० मिनिटे राखून पराभव केला. लक्ष्मण गवस, महेश शिंदे यांचा बचाव आणि श्रेयस राऊळचा अष्टपैलू खेळ उल्लेखनीय ठरला. महिलांच्या उपात्य फेरीत श्री समर्थने महात्मा गांधी संघाचा, तर परांजपेने शिवनेरीचा पराभव केला. पुरुषांच्या उपांत्य फेरीत महात्मा गांधी अकादमीने अमरहिंदला तर ओम समर्थने सरस्वतीचा पराभव केला.
सलग चालणा-या चार दिवसीय खो – खो स्पर्धेत खेळपटूंचा रंगतदार खेळ पाहण्यासाठी खेळप्रेमींकडून उत्साही प्रतिसाद मिळाला. अशा अटातटीच्या खेळात विजयी स्पर्धकांसह पराभुत खेळाडूंनीही आपले नैपुण्य दाखवले. अशाप्रकारे या स्पर्धांद्वारे नवनवीन खेळाडू घडविण्यात मोलाचे योगदान ठरले आहे.
प्रबोधन क्रीडाभवनात तिस-यांदा खेळण्यात येणा-या मुंबई महापौर चषक खो – खो स्पर्धेचे उद्घाटन माजी राष्ट्रीय खो – खो खेळाडू व प्रबोधन गोरेगावचे कार्यकारिणी सदस्य श्री. शशांक कामत यांच्या शुभहस्ते झाले. महाराष्ट्र मान्यता प्राप्त असलेल्या या खो – खो संघटनेत १६ पुरुष, ८ महिला व ८ व्यवसायिक संघ सहभागी असून राष्ट्रीय खेळाडू सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे अनेक हे सामने बाद पद्धतीने सायंकाळच्या सत्रात भव्य दिव्य विदयुत झोतात खेळवण्यात आले.
ओझोनचे विजेते स्पर्धक
'स्पीडो इनव्हिटेशनल स्विमींग चॅम्पियनशिप मुंबई 2019'
मुंबईः स्पीडो इनव्हिटेशनल स्विमींग चॅम्पियनशिप मुंबई तर्फे जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चॅम्पियनशिपमध्ये प्रबोधन ओझोन जलतरण तलावाचे जलतरण पट्टूंनी उत्तम यश संपादित केले. तसेच या स्पर्धेअंतर्गत विजेत्या खेळाडूंचे मेडल आणि चॅम्पियनशिप ट्रॅाफी देऊन गौरविण्यात आले.
'प्रबोधनच्या खेळाडूंची यशस्वी कामगिरी'
१६-१७ फेब्रुवारी २०१९ रोजी, शिवाजी पार्क दादर येथे झालेल्या प्रथम विश्वचषक आंतरराष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारा मुंबई उपनगर विभागातील खेळाडू *कुमार दिपक शिंदे* हा सदर स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला व सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. या स्पर्धेत १५ देशातील १०० हून अधिक मल्लखांबपट्टू स्पर्धक सहभागी झाले होते.
दिपक शिंदे हा कांदिवली येथे समता क्रीडा भवन येथे नियमित सराव करतो. शिवछत्रपती पुरस्कार विजेते दत्ताराम दुदम सर व राष्ट्रीय पंच उमेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक मल्लखांब प्रशिक्षण घेत आहे. बोरिवली तालुका मल्लखांब संघटनेच्या विवीध संस्थांमध्ये देखील तो सराव करतो. उ. प्रबोधन क्रीडा भवन, बोरिवली स्पोर्ट्स कल्चरल सेंटर, दहिसर स्पोर्ट्स फाउंडेशन ई
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.