प्रबोधन गोरेगाव क्रीडाभवन हे लोकांना दर्जेदार क्रीडाप्रशिक्षण मिळावे याकरता कार्यरत आहे. जागतिक दर्जाच्या क्रीडास्पर्धांसाठी खेळाडू तयार करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असून माफक दरात प्रशिक्षण पुरवणे हे आमचे ध्येय आहे. प्रबोधन टेनिस अकादमीचा शुभारंभ १ जून १९९९ रोजी करण्यात आला. प्रबोधन जॉगर्स पार्क येथील परिसरात लोकांना खेळण्यासाठी ‘लॉन टेनिस’ या खेळासाठी दोन टेनिस कोर्टची निर्मिती केली आहे. या कोर्टवर प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना शास्त्रोक्तरित्या प्रशिक्षण देण्याचे कार्य येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांद्वारे केले जाते. साई टेनिस अँकेडमीशी संलग्नता असलेल्या प्रबोधन टेनिस अकादमी मध्ये टेनिसचे प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत. सर्व वयोगटातील मुलांना या खेळात प्रवेश दिला जातो. सकाळी ६.३० ते ९.३० व सायं. ४ ते ७ या दोन सत्रात ते उपलब्ध केले जाते. या व्यतिरिक्त प्रशिक्षण कालावधीत पर्यायी बॅचेसची सोय केली आहे. टेनिस अकादमी मध्ये केवळ नियमित प्रशिक्षण न देता या ठिकाणी विशेष इन्डिव्हिजुअल बॅचेस, अँडव्हान्स बँचेस तसेच स्पेशस विकेन्ड बॅचेस या विशेष सुविधा दिल्या जातात. ‘पे आणि प्ले’ या कूपनचा वापर करुन टेनिस कोर्टवर खेळाडूंना ठराविक वेळेच्या मर्यादेत खेळता येते.