नवं चैतन्य निर्माण करणारी अशी दिवाळीची गुलाबी थंडी,..सप्तरंगात न्हाऊन निघालेली अशी सुगम संगीताची सुमधुर गाणी आणि श्रोत्यांना मनमुराद आस्वाद घेता येईल अशी ‘दिवाळी पहाट’. प्रबोधन गोरेगाव संचालित ओझोन अँक्टिव्हिटी सेंटरच्या सभासदांसाठी ‘दिवाळी पहाट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. ‘स्वरप्रभात’ या कार्यक्रमातून सुरेल आवाजात गाण्याचे सादरीकरण करणा-या गायकांना निमंत्रण दिले जाते. श्रोत्यांच्या पसंतीचा मान राखून मराठी गाण्यांची सुंदर मैफिल रंगते. श्रोते मंत्रमुग्ध होऊन गाण्यांचा मनमुराद आस्वाद घेतात. ‘‘दिवाळी पहाट म्हणजे मनातील सर्व राग, व्देष, मद, मत्सर लोभ यांचा विनाश होऊन दिवाळीच्या उजळत्या दिव्यातून ज्ञानाचा प्रकाश पसरणे.’’ या कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या सर्व पदाधिका-याच्या हस्ते दीपप्रज्वलनाने केली जाते. प्रबोधन दिवाळी पहाट या कार्यक्रमाला १२ वर्षे पुर्ण झाली असून तितक्याच नव्या उमेदिने नवी स्वप्न नजरेसमोर घेऊन प्रेक्षक मोठ्या संख्येने हजर राहतात. प्रबोधन गोरेगावने संस्थारुपात लावलेल्या रोपाचे आता संस्थेच्या विकासकार्याचे एका प्रचंड वटवृक्षात रुपांतर झाले आहे.
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.