प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक मा. श्री. सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून प्रबोधन अभ्यासिका सुरु करण्यात आली. सुसज्ज आणि स्वच्छ अभ्यासिकेमध्ये महिन्याला सुमारे २०० हून अधिक उच्च प्रशिक्षणार्थी विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेतात. विद्यार्थांना एकाग्रतेने अभ्यास करता यावा यासाठी अभ्यासिकेची पुर्वनियोजित उत्तम सोय येथे केलेली आहे. वाचनालयातील संदर्भ पुस्तकांचा व स्पर्धा परीक्षेच्या नियतकालिकांचा उपयोग विद्यार्थी करीत आहेत. अभ्यासिकेतील काही विद्यार्थीनी सी.ए.,सेट, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत यश प्राप्त केले आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पदव्युत्तर स्पर्धात्मक परिक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना अभ्यासिकेत प्रवेश देण्यात येते. एकाग्रचित्ताने व अतिशय शांत वातावरणात विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सुविधा अतिशय माफक दरात उपलब्ध आहे.
नियमावली
क्र. | नियम |
---|---|
१. | अभ्यासिकेचे नियमित बॅचेस सकाळी ६.00 ते रात्रौ ९.00. या वेळेत सुरु आहेत. |
२. | अभ्यासिकेमध्ये शांतता राखावी. |
३. | अभ्यासिकेमध्ये मोबाईलवर बोलू नये, कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट चार्जिंगला लावू नये. |
४. | अभ्यासिकेत खाद्यपदार्थ खाण्यास सक्त मनाई आहे. |
५. | अभ्यासिकेत विद्यार्थ्यांनी प्रवेश दिलेल्या बॅचमध्येच अभ्यासाला बसावे. कोणत्याही कारणास्तव एकदा मंजूर केलेली बॅच बदलून मिळणार नाही. |
६. | अभ्यासिकेचे ओळखपत्र व पावती नेहमी सोबत ठेवावी व सुरक्षारक्षकाकडील रजिस्टर मध्ये येताना व जाताना वेळेची नोंद करावी. |
७. | एकदा भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही. |
८. | अभ्यासिकेत लॅपटॉप, आयपॅड, टॅब वापरण्यासाठी व्यवस्थापकांची लेखी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. |
९. | अभ्यासिकेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासिका व्यतिरिक्त जॉगर्स पार्कच्या आवारात अन्यत्र फिरता किंवा अभ्यास करता येणार नाही. |
१०. | अभ्यासिकेत मौल्यवान वस्तू आणू नये अन्यथा गहाळ झाल्यास त्याची जबाबदारी संस्थेची राहणार नाही. |
११. | अभ्यासिकेतील फर्निचर, इमारत, आवारातील दिवे, संस्थेच्या अन्य वस्तूंची मोडतोड केल्याचे निदर्शनास आल्यास त्याची भरपाई विद्यार्थ्यांनकडून केली जाईल व अभ्यासिकेतील प्रवेश रद्द करण्याचा अधिकार संस्थेला असेल. |
१२. | विद्यार्थांना सूचना अथवा तक्रार करावयाची असल्यास ती लेखी स्वरुपात द्यावी, कार्यालयात येऊन कर्मचा-यांशी हुज्जत घालू नये. |
१३. | स्पर्धा परिक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना नियतकालिक हवे असल्यास आपले अभ्यासिकेचे ओळखपत्र वाचनालयात जमा करुन घेऊन जावे. |
१४. | अभ्यास करताना आपापसात चर्चा करु नये. |
नियमित बॅच
सकाळी ६.०० ते ११.००
सकाळी ११.०० ते दु. ४.००
दुपारी ४.०० ते रात्रौ ९.००
संपर्क : 7700928284
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.