प्रबोधन गोरेगाव ही विना-फायदा तत्त्वावर चालणारी संस्था असून समाजाच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी व कल्याणासाठी ती अविरत कार्यरत आहे. ओझोन प्रक्रीया असणारा हा एकमेव ऑलिंम्पिक जलतरण तलाव आहे. ऑलिंम्पिक दर्जाचा जलतरण तलाव उपनगरातील रहिवाश्यांना उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ओझोन जलतरण तलावाची निर्मिती करण्यात आली. मुंबईतील हा एकमेव ओझोन ट्रीटेड जलतरण तलाव आहे. ओझोनच्या सदस्यांना सदर क्लबद्वारे अत्याधुनिक आणि प्रगत अनेकाविध दर्जेदार सुविधा पुरविल्या जातात. आरोग्य, मनोरंजन आणि खेळ यांच्या सुविधा सोबतच ओझोन, सौना / स्टीम / जकुझी, इनडोअर खेळ, शाही खाना, रेस्टॉरंट कॅफेटेरिआ आदि दर्जेदार सुविधांमुळे ओझोन जलतरण तलाव गोरेगावच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरला आहे. याच वाटचालीतील एक दमदार पाऊल म्हणजे ओझोन जलतरण तलाव व ऍक्टिव्हिटी सेंटर.
स्वस्थ व सुदृढ जीवनशैली ही आजच्या बदलत्या काळाच्या प्रवाहात अत्यंत आवश्यक आहे. पोहोण्याचा व्यायाम हा फक्त शरीराला फायदेशीर नसून मन उल्हासित करण्यासाठी उपयुक्त आहे. खुप वर्षापासून बंद असलेला निरलॉन स्विमिंगपुल सुरु होणे ही प्रत्येक गोरेगावकरांची सुप्त इच्छा होती. ही सुप्त इच्छा प्रबोधन गोरेगावने ‘ओझोन स्विमिंग पुल’च्या स्वरुपात पुर्ण केली आहे. ओझोनायझेशनचे तंत्रज्ञान आमच्याकडे असल्याचे आम्हाला अभिमान आहे. इतर जलतरण तलावांच्या तुलनेत ओझोन स्विमिंग पूल खुप अधिक सुविधा पुरवतो. (५० मी x २०.५० मी साईज व १ मी x ३.६५ मी) खोली असणारा ऑलिंम्पिक साईज स्विमिंग पुल, लार्जर्स पुल, ( साईजः १५.५ मी x ८.००, खोलीः ५०० मिमी x ७०० मिमी) स्विमिंग स्पोर्ट सुविधा, उच्च दर्जाची रचना, निष्णांत प्रशिक्षक आदी. ओझोन स्विमिंग पुलासह ओझोन ऍक्टिव्हिटी सेंटर या वास्तुत वाजवी दरात उपलब्ध करुन देण्यात आले. सदर ऍक्टिव्हिटी सेंटरमध्ये सुसज्ज जिम्नॅशियम, सौना, जॅकुझी धर्नुविदया प्रशिक्षण, बैठे खेळ. बॅक्वेट हॉल, रेस्टॉरंट, कॅफेटेरिया आदी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याशिवाय येथे उपलब्ध असलेली जिम सुप्रसिध्द तळवळकर यांच्यामार्फत चालवली जाते.
संपर्क : 9136363121
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.