मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने आणि प्रबोधन गोरेगाव संस्थेच्यावतीने प्रबोधन मुंबई टी २० क्रिकेट स्पर्धा दि. ५ ते ८ एप्रिल २०१८ यादरम्यान आयोजित केली होती. प्रबोधन मुंबई टी २० क्रिकेट स्पर्धेची सुरुवात एप्रिल २००८ रोजी झाली असून यंदाचे ११ वे वर्ष आहे. प्रबोधन गोरेगावचे संस्थापक शिवसेना नेते व उद्योमंत्री मा. श्री. सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा प्रबोधन क्रीडा भवनच्या भव्य मैदानावर खेळविण्यात आली. या स्पर्धेचे मुख्य सल्लागार सुप्रसिद्द क्रिकेटपटू श्री. दिलीप वेंगसरकर आहेत. या स्पर्धेत मुंबईतील पय्याडे क्लब, कर्नाटक स्पोर्टस अँकेडमी, एम.आय.जी. क्रिकेट क्लब,न्यू हिंद, सिंद स्पोर्टस क्लब, दादर युनियन स्पोर्टीग क्लब, पार्को फेन क्रिकेटर्स सह आठ नामवंत व्यावसायिक क्रिकेट संघ सहभागी झाले होते. विजेत्या संघास १ लाख व उपविजेत्या संघास ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. तसेच ‘मॅन आँफ दी मॅच’ ला बाईक पारितोषिक स्वरुपात देण्यात आली.
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.