माननीय श्री. सुभाष देसाई
प्रबोधन गोरेगावचा समतोल व कालबध्द विकास घडविण्याच्या प्रमुख उद्देशाने प्रबोधन गोरेगावची स्थापना करण्यात आली. गोरेगावच्या इतिहासातील हा पहिलावहिला प्रयत्न ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातही प्रबोधन गोरेगावची ख्याती पसरली आहे. गेल्या ४६ वर्षाच्या कालावधीत लोकोपयोगी उपक्रम राबवण्याचे कार्य आजही मोठया उमेदिने चालू ठेवले आहेत. चार दशकाच्या कालखंडात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रबोधन गोरेगावने अनेक महत्वाच्या कार्यांचा टप्पा सुकरपणे पार पाडला.
युवा कार्यकर्त्यांचे योगदान, संस्थेच्या ज्येष्ठ सदस्यांचे मार्गदर्शन तसेच संस्थेच्या सर्वच सदस्यांनी वेळोवेळी दिलेली सक्रीय पाठींबा या भक्कम जोरावरच संस्था विकासाची शिखरे पादक्रांत करीत आहे. या प्रगतिशाली आधुनिक जगात ‘आधुनिकतेची कास धरा’! या उक्तीप्रमाणे प्रबोधन गोरेगाव संस्थेने विविधांगी नविन उपक्रमात मजबूत पायंडा रोवला आहे.
संस्थेमार्फत राबवण्यात आलेल्या उपक्रमासह कार्यक्रमाद्वारे नव्या पिढीचा वैयक्तिक आणि बौध्दिक विकास होण्यासाठी खेळाडूंना अनमोल संधी पुरवल्या जातात. सध्या कार्यरत असलेले क्रीडाभवन, ओझोन जलतरण तलाव, रक्तपेढी, जॉर्गस पार्क, वाचनालय, अभ्यासिका, डायलिसीस सेंटर यामधील यंत्रसामग्रीमध्ये सुधारणा करताना नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे त्यात बदल करणे गरजेचे आहे.प्रबोधनने विविधांगी सांस्कृतिक कला – क्रीडा प्रांतातही आपले स्थान निर्माण केले आहे.त्याचप्रमाणे दरवर्षी महोत्सवीवर्षाच्या निमित्ताने भव्यदिव्य सोहळे आणि समारंभाच्यानिमित्ताने संस्थेने प्रश्चिम उपनगरातील शालेय विद्यार्थांना सांघिक क्रीडाप्रकारामार्फत खेळाडूंना नामी संधी उपलब्ध करुन दिली.प्रबोधन गोरेगाव संस्थेची उत्तरोत्तर वाढणारी यशस्वी वाटचाल ही मुंबई नव्हे तर महाराष्ट्रातही पसरली आहे. प्रबोधनचे सर्वच उपक्रम जोमाने यापुढेही कार्यरत होतील आणि त्याच दृष्टीने सुवर्णमहोत्सवी वाटचाल होईल याची मला खात्री आहे, विश्वास वाटतो .
प्रबोधन गोरेगावच्या आगामी वाटचालीस माझ्या शुभेच्छा !
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.