वाचनालयातील नवीन पुस्तकांच्या याद्या
बदलत्या काळानुसार पुस्तक संस्थेत व वाचकांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे वाचनालयातील जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे जॉगर्स पार्क येथे उभारण्यात आलेल्या प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या पुर्नर्निमित वास्तूचे उद्घाटन २२ फेब्रुवारी २००९ रोजी ज्येष्ठ साहित्यिक श्री. मधु मंगेश कर्णीक यांच्या हस्ते करण्यात आले. याची मुळ संकल्पना ही शिवसेना नेते व आमदार श्री. सुभाष देसाई यांची आहे. या प्रकल्पासाठी शिवसेना नेते आमदार डाँ. नीलम गो-हे, लोकभारती अध्यक्ष व आमदार श्री. कपिल पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून अर्थसहाय्य केले. आमदार व शिवसेना नेते श्री. गजानन किर्तीकर आणि प्रसिध्द कवी श्री. अशोक नायगावकर आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकांमध्ये ज्ञानाचा प्रसार करणे हे प्रबोधन गोरेगाव संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. पुस्तक हे सर्वोत्तम शिक्षक असून ही जीवनरुपी समुद्रात दीपगृहाचे काम करतात. लोकांना वाजवी दरात उच्च दर्जाचे साहित्य उपलब्ध करणे, हे ध्येय नजरेसमोर ठेवून प्रबोधन गोरेगावने वाचनालयाची स्थापना केली. बालवाचनालयाच्या स्थापनेमुळे लहान मुलांना बालपणापासून वाचनाची सवय लागावी आणि आवड निर्माण व्हावी हा हेतु होता. आपली भारतीय संस्कृती जोपासण्यासाठी वाचनालयातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये वाचन प्रेरणा दिन, मराठी भाषा दिन, महिला दिन, प्रत्येक महिन्याला आयोजित ‘‘प्रबोधन व्यासपीठ’’, दिवाळी अंक योजना, छोट्या दोस्तांसाठी उन्हाळी सुट्टीतील बालवाचन शिबीर, पुस्तक प्रदर्शन, महिलांसाठी गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात.
वाचनालयात उत्तम कार्यतत्पर असा कर्मचारी वर्ग आणि तप्तर सेवा सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. वाचनालय हे पुर्णपणे संगणीकृत असल्यामुळे पुस्तके शोधण्यासाठी अधिक सोयीचे ठरते. सर्व पुस्तकांचे येथे विषयानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. साहित्य, कविता, आत्मचरित्र, व्यक्तिचित्र, विनोद, निबंध, वैचारिक माहितीपर, बालदोस्तांसाठी, माहिती तंत्रज्ञान, ज्योतिषशास्त्र, मार्गदर्शन - संदर्भ, इतिहास, राजकीय, अर्थशास्त्र, सामाजिक समस्या, कायदा, कथा - कादंबरी, गीतार्थकोश, विश्वकोश, संकीर्ण, ललित, शेती – पर्यावरण, निसर्ग – संवर्धन – संरक्षण अशी विविध विषयावर आधारित पुस्तके वाचनालयात उपलब्ध आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेतील पुस्तकांचा आस्वाद वाचकांना घेता येईल. वर्णनात्मक, प्रसंगाला अनुसरुन पारंपरिक गाणी तसेच भोंडला, हादगा, भुलाबाई अशा विविध विषयावर आधारलेली कविता आणि गाण्यांची पुस्तके येथे उपलब्ध आहेत. कथा कादंबरी पुस्तकातून आयुष्याकडे बघण्याचा नवा बोध, नवा दुष्टिकोन मिळतो. तसेच चरित्रात्मक पुस्तके वाचल्याने अडचणींवर मात करण्याची स्फुर्ती निर्माण होते. कविता वाचल्याने वाचकास एक प्रकारचा विलक्षण आनंद मिळतो. या व्यतिरिक्त धार्मिक पुस्तके वाचल्याने परमेश्वराच्या भेटीची आसक्ती, श्रध्दा, विश्वास, ओढ आणि जीवन जगण्याचा नवा अर्थ प्राप्त होतो. सध्या वाचनालयात विविध विषयांवरील तब्बल २०० दिवाळी अंक आणि २५,००० हून अधिक पुस्तकांचा संग्रह उपलब्ध आहे.
सुविधा
संपर्क : ७७००९२८२८४
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.