प्रबोधन जॉगर्स पार्क व लॉन टेनिस प्रशिक्षण अकॅडमीचे उद्घाटन १२ मे १९९९ रोजी शिवसेना नेते श्री. उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. इको फ्रेडली, जॉगर्स पार्क, शास्त्रीयदृष्ट्या विकसित सुसज्ज टेनिस प्रशिक्षण शाळा आणि उत्कृष्ट योगाभ्यास केंद्र यांचा या वास्तुमध्ये समावेश असल्यामुळे गोरेगावकरांचे जीवन शारिरीक व मानसिकरित्या आनंदी होईल यात शंका नाही. जागेची कमतरता असलेल्या मुंबापुरीत प्रबोधन गोरेगावने सर्व वयोगटातील व्यक्तींना चालण्यासाठी पार्कची सोय करण्यात आली. निखळ सुर्यप्रकाश, थंड स्वच्छ हवा आणि हिरव्या पाना फुलांनी बहरलेल्या जागेत जॉगर्स पार्क विकसित करण्यात आले. जॉगर्स पार्कच्या मध्यभागी टेनिस प्रशिक्षणासाठी जागेची व्यवस्था करण्यात आली असून येथे पथदिवे, बैठक व्यवस्था, सार्वजनिक शौचालय, आणि पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळ व संध्याकाळ जॉगर्स पार्क नागरिकांना खुले असते, त्याचप्रमाणे नागरिकांना विनामूल्य असलेल्या सेवेचा दरदिवशी सुमारे १००० आबालवृध्द लाभ घेतात.