प्रबोधन गोरेगाव संचालित, प्रबोधनकार ठाकरे वाचनालयतर्फे कविश्रेष्ठ वि. वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी २०१६ रोजी मराठी भाषा गौरव दिन दिमाखात साजरा करण्यात येतो. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित केले जाते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामधील दिलेले मोलाचे योगदान, मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम व आपल्या मातृभाषेचा गौरव व त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन म्हणून प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातर्फे कुसुमाग्रजांची जन्म तारिख २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतात.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथोत्सव आयोजित करण्यात आला. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन मौज प्रकाशन गृहचे मुकुंद भागवत यांनी केले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक राजू पाध्ये, माजी नगरसेवक राम म्हात्रे उपस्थित होते. प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. मनोहर अद्वानकर यांनी प्रमुख मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रमुख मान्यवरांचे सुनिल वेलणकर यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद येतयेकर यांनी केले. मुकुंद भागवत यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या या उपक्रमाबद्दल प्रशंसा केली.
ग्रंथोत्सवास गोरेगाव परिसरातील नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. तसेच यापुढेही हा उपक्रम असाच सुरु ठेवावा म्हणून सल्लाही दिला. प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातील विविध ग्रंथांच्या खजिन्याचे प्रदर्शन केल्यामुळे वाचकांनी संस्थेचे आभार मानले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रबोधनकार ठाकरे वाचनालयात निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.