kridabhavan@prabodhan.org
  • आमच्याविषयी
    • संस्थापकांचा संदेश
    • प्रबोधनची वाटचाल
    • प्रबोधनातून प्रगतीकडे
    • संलग्नता
    • पदाधिकारी व कार्यकारी मंडळ
    • वार्षिक अहवाल
  • उपक्रम
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • प्रबोधन जॉगर्स पार्क
    • सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • प्रबोधन टेनिस अकॅडमी
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रन कॉर्नर
    • औषधपेढी
  • कार्यक्रम
    • प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव
    • मौज कट्टा
    • प्रबोधन व्यासपीठ
    • मराठी भाषा गौरव दिन
    • वर्धापन दिन सोहळा
    • २०-२० क्रिकेट सामने
    • दिवाळी पहाट
    • बुद्धिबळ सामना
    • सावरकर उत्सव
    • समर्थ उत्सव
    • मुंबई महोत्सव
    • जाणता राजा
    • हर्बल वर्ल्ड
    • एस. एस. सी. व्याख्यानमाला
  • पुस्तके
  • छायाचित्र संग्रह
  • डाउनलोड अर्ज
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • ओझोन जलतरण तलाव मेडिकल सर्टिफिकेट
    • प्रबोधन रक्तपेढी
    • प्रबोधन लॉन टेनिस
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रेन कॉर्नर
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव माहिती
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव प्रवेश अर्ज
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव स्विमिंग प्रवेश अर्ज
  • संपर्क
  • मीडिया
  • देणगी आव्हान
  • निविदा
  •   ताज्या घडामोडी



सालाबादाप्रमाणे यावर्षी ४१ वा प्रबोधन गोरेगाव आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे गोरेगाव क्रीडाभवनात मोठ्या जल्लोषात शुभारंभ करण्यात आला. आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व उद्योगमंत्री मा. श्री. सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री मा. श्री. सुभाष देसाई यांनी क्रीडा महोत्सवाची सुरुवात झाल्याची घोषणा करुन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संस्थेचे हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सल्लागार समिती आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय अँथलीट रचिता पांडा - मिस्त्री आदि मान्यवरांची उपस्थिती होती. प्रबोधन गोरेगाव क्रीडा महोत्सव दि. ५ ते ८ डिसेंबर २०१८ या कालावधीत घेण्यात आला. पश्र्चिम उपनगरातील वांद्रे ते दहिसर या परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.त्यामध्ये तब्बल २३० शाळांमधील ७००० स्पर्धकांचा सहभाग लाभला असून खो-खो आणि कबड्डी खेळापासून सुरुवात झाली. प्रतीवर्षी वाढणारा खेळाडूंचा सहभाग आणि क्रीडाप्रेमींसाठी वाढता प्रतिसाद हा प्रबोधन आंतरशालेय

Los Angeles
Chicago
New York
New York
New York
New York
New York
Previous Next

क्रीडाभवनासाठी ‘जणु काही मुकाटात मानाचा तुरा रोवल्याचा अप्रतिम आनंद’ आहे. विविध खेळांचा समावेश असलेले प्रबोधन क्रीडाभवन पश्र्चिम उपनगरातील शालेय क्रीडाजीवनात महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे. या स्पर्धेत अँथलेटिक्स, जलतरण, लॉन टेनिस, तिरंदाजी, कबड्डी, बुध्दीबळ, खो – खो, मल्लखांब, कराटे, संचलन आणि लोकनृत्य या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. क्रीडा महोत्सवाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ ८ डिसेंबर २०१८ रोजी क्रीडाभवनात प्रमुख पाहुणे दिपक फर्टिलायझरचे अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

झाला. क्रीडाभवनावर उपस्थित क्रीडाप्रेमींनी टाळ्यांच्या गजरात खेळाडूंना प्रतिसाद दिला. मुलांच्या प्रतिभा उंचवण्यासाठी असे विविध प्रतिभाशाली खेळांचा समावेश या क्रीडा प्रकारात केला जातो. लहान कलाकारांच्या बहारदार लोकनृत्यांनी संपुर्ण व्यासपीठ बहरुन गेले. भारतीय संस्कृतीची विविधांगी ओळख लोकनृत्यामधून प्रेक्षकांना पाहावयास मिळाले. रुस्तमजी इंटरनेशनल स्कूल, दहिसर या संघाने संचालन स्पर्धेमध्ये अव्वल स्थान पटकाविले. महात्मा गांधी विद्यामंदिर या शाळेतील मल्लखांब चमूनेही या यशामध्ये आपले योगदान दिले. जलतरण आणि बुध्दिबळ या खेळांमध्ये वर्चस्व गाजविणा-या गोकुळधाम हायस्कूल गोरेगाव या संघाने ४५ गुणांनिशी सर्वसाधारण उपविजेते पद प्राप्त केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उपविजेत्या आणि विजेत्या खेळाडूंना मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. क्रीडामहोत्सवातील सर्वोत्कृष्ट संघाचे ‘प्रबोधन मानचिन्ह’ महात्मा गांधी विद्यामंदिर (वांद्रे) या शाळेने पटकावले.


© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.