उद्दिष्टे
१९७२ साली कला, क्रीडा, ज्ञान व समाजसेवा या सुत्रांचा स्वीकार करीत ‘प्रबोधन गोरेगाव’ संस्थेची स्थापना झाली. आजवरच्या वाटचालीत प्रबोधनने प्रत्येक क्षेत्रात यशस्वी वाटचाल करताना मुंबईसह महाराष्ट्रात आपल्या कार्याचा अनोखा ठसा उमटविला. प्रत्येकवेळी नवीन व आगळा वेगळा उपक्रम देण्याचा प्रयत्न संस्थेने केला व त्यामध्ये उज्ज्वल यश प्राप्त केले.
आज संस्थेचे प्रबोधन क्रीडाभवन, ओझोन जलतरण तलाव, एक्टिव्हीटी सेंटर, जॉगर्स पार्क, सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी, प्रबोधन रक्तवाहिनी, प्रबोधनकार ठाकरे वाचनालय व अभ्यासिका, प्रबोधन डायलिसीस सेंटर, लॉन टेनिस, प्रबोधन औषधपेढी यासारखे अनेक उपक्रम यशस्वीरित्या सुरु असून पश्चिम उपनगरवासीयांना या सुविधांचा सातत्याने लाभ होत आहे.
धर्म, पंथ, भाषा अगर जातीचा विचार न करता समाजातील सर्व थरातील लोकांची सांस्कृतिक, शारिरीक, शैक्षणिक व बौद्धिक प्रगती साधणे. याकरिता प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे.....
क्र. | विवेचन |
---|---|
१. | शारिरीक उन्नती घडवून आणण्याकरीता क्रीडासामने, क्रीडामहोत्सव आयोजित करणे व व्यायामशाळा स्थापणे. |
२. | गरजू होतकरू शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आर्थिक मदत उपलब्ध करून देणे. |
३. | अर्थिकदृष्ट्यात दुर्बल व्यक्तींना शस्त्रक्रिया अथवा औषधोपचारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे. |
४. | ग्रंथ व वाङमय विषयक चर्चा घडवून आणणे आणि लेखन व वक्तृत्वाच्या स्पर्धा आयोजित करणे. |
५. | विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहाय्य उपलब्ध करुन देणे आणि संदर्भ ग्रंथालये स्थापणे व चालविणे. |
६. | नाट्य, संगीत व नृत्य इत्यादी कलांना उत्तेजन देण्याकरीता कार्यक्रम आयोजित करणे. |
७. | व्याख्याने व्याख्यानमाला आयोजित करणे. |
८. | संमेलने, प्रदर्शने व शैक्षणिक सहली आयोजित करणे. |
१९७२ पासून सदर उद्दिष्टांना नजरेसमोर ठेवून संस्थेची अविरत वाटचाल सुरु आहे. अशाप्रकारे अनेक लोकोपयोगी प्रकल्प उभे राहिले असून त्याव्यतिरिक्त अनेक विविध प्रकल्प उभारण्याचा मानस आहे. प्रबोधनच्या सुवर्णमहोत्सवाच्या दिशेने सुरु झालेली वाटचाल सर्वांना सुखकारक होवो व जनसेवेच्या मार्गात संस्थेला असेच उत्तरोत्तर यश मिळत जावो हीच प्रार्थना..
प्रबोधन एका दृष्टीक्षेपात
१९७२ पासून सुरु झालेल्या प्रबोधनने अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले आहेत. या प्रकल्पांद्वारे हजारो लोकांची गरज भागवली गेली आहे. प्रबोधन गोरेगावचे काही उपक्रम खालीलप्रमाणे...
प्रबोधन क्रीडाभवन
प्रबोधन जॉगर्स पार्क आणि टेनिस प्रशिक्षण केंद्र
ओझोन जलतरण तलाव व एक्टिव्हिटी सेंटर
सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी
फिरती रक्तससंकलन वाहिनी
ऍफेरेसिस केंद्र
प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
प्रबोधन औषधपेढी
प्रबोधन गोरेगावचे उपक्रम
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.