प्रबोधन गोरेगाव प्रकाशित पुस्तके
सदर पुस्तकाचे प्रकाशन शिवसेनाप्रमुख माननीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या वाढदिवसाच्या समयोचित समारंभात बुधवार, दिनांक २३ जानेवारी, २००८ रोजी झाले. सदर पुस्तकास साजेसा भव्यदिव्य प्रकाशन समारंभ गुरूवार, दि. २४ जानेवारी, २००८ रोजी सायंकाळी ६ वाजता रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे संपन्न झाला. सदर प्रकाशन सोहळ्यास शिवसेनेच्या मान्यवरांनी आपली उपस्थिती लावून सदर पुस्तकास आपल्या शुभेच्छा दिल्या. शिवसेना कर्याध्यक्ष श्री. उद्धव ठाकरे, इतिहासकार श्री. बाबासाहेब पुरंदरे, भाजप राष्ट्रीय नेते श्री. गोपीनाथ मुंडे, साहित्यिक डॉ. राम शेवाळकर, कलावंत प्रभाकर पणशीकर, निवृत्त न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते. प्रबोधन गोरेगाव संस्था स्थापने पासून शिवसेनाप्रमुखांनी घालून दिलेल्या तत्वांवर वाटचाल करीत आहे. सदर भावनिक नात्यामुळेच हा प्रकाशन समारंभ व हे पुस्तक प्रबोधन गोरेगाव संस्थेसाठी एक संस्मरणीय घटना म्हणून प्रबोधन गोरेगावच्या कायम आठवणीत राहील.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवन म्हणजे भारताच्या आधुनिक इतिहासातील एक चमत्कारच. या महापुरुषाच्या व्यक्तिमत्वाला इंद्रधनुष्यासारखे अनेक रंग होते. सारेच तेजस्वी नि मोहक! महान देशभक्त, जहाल क्रांतिकारक, ज्वालाग्राही साहित्यिक, कुसुमकोमल कवी, थोर नाटककार, ओजस्वी इतिहासकार, प्रेरक वक्ता, तत्वनिष्ठ राजकारणी, धुरंधर सेनापती आणि खंदा समाज-सुधारक. ’सावरकर’ म्हणजे ’शतपैलू ’ नररत्न! क्रांतिकारकांचे मुकुटमणी, मृत्युंजय सावरकर यांच्या चरित्रावरील या विविधतेची रेखीव मांडणी लेखक श्री. ह. त्र्यं. देसाई यांनी ’शतपैलू सावरकर’ या पुस्तकात केलेली आहे. सावरकर - जन्मशताब्दी-संवत्सरानिमित्त प्रकाशित होणारे सहजसुंदर शैलीतील ’शतपैलू सावरकर’ हे पुस्तक वाचकांना सादर करताना आम्हाला फार धन्यता वाटत आहे. ज्यांच्या जीवनाचा शोध घ्यावा, महत्ता अजमावण्याचा प्रयत्न करावा अशा फार थोड्या लोकोत्तर व्यक्तींपैकीच स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत यात काय संशय?
स्वामी श्रीसमर्थ रामदास यांच्या जन्मोत्सव चतु:शताब्दीनिमित्त प्रबोधन गोरेगाव आणि समर्थ उत्सव समितीने ’समर्थ उत्सवा’ चे दिनांक १४ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २००७ या कालावधीत प्रबोधन क्रीडाभवन, गोरेगाव (पश्चिम) येथे आयोजन केले होते. संत रामदासांनी मनाला वळण लावण्यासाठी सतत मनोबोधाची कास धरली होती. त्यांचे ’मनाचे श्लोक’ वाचले की, या संस्कारांच महत्व कळतं. संस्कारांमुळे मनातील अमंगळ विचार दूर जातात. म्हणून संस्कार हा शुद्ध आचारांचा पाया आहे. श्री समर्थांचे जीवन व कार्य दर्शविणारे भव्य प्रदर्शन, व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम इ. आयोजित करतानाच लहान मुलांना मार्गदर्शक ठरेल अशी संस्कार विषयक एक छोटेखानी पुस्तिका प्रबोधन गोरेगावने प्रकाशित केली. या पुस्तिकेत मुलांचे संगोपन व जोपासना कशी करावी, त्यांच्यावर कसे आणि कोणते संस्कार करावेत या बद्दलची तसेच अन्य उपयुक्त माहिती देण्यात आली आहे.
स्वामी श्रीसमर्थ रामदास यांच्या जन्मोत्सव चतु:शताब्दीनिमित्त प्रबोधन गोरेगाव आणि समर्थ उत्सव समितीने ’समर्थ उत्सवा’ चे दिनांक १४ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २००७ या कालावधीत प्रबोधन क्रीडाभवन, गोरेगाव (पश्चिम) येथे आयोजन केले होते. संत रामदासांनी मनाला वळण लावण्यासाठी सतत मनोबोधाची कास धरली होती. त्यांचे ’मनाचे श्लोक’ वाचले की, या संस्कारांच महत्व कळतं. संस्कारांमुळे मनातील अमंगळ विचार दूर जातात. म्हणून संस्कार हा शुद्ध आचारांचा पाया आहे. श्री समर्थांचे जीवन व कार्य दर्शविणारे भव्य प्रदर्शन, व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम इ. आयोजित करतानाच लहान मुलांना मार्गदर्शक ठरेल अशी संस्कार विषयक एक छोटेखानी पुस्तिका प्रबोधन गोरेगावने प्रकाशित केली. या पुस्तिकेत मुलांचे संगोपन व जोपासना कशी करावी, त्यांच्यावर कसे आणि कोणते संस्कार करावेत या बद्दलची तसेच अन्य उपयुक्त माहिती देण्यात आली आहे.
’आपले गोरेगाव’ ही मार्गदर्शिका आपल्या हाती देताना खूप आनंद होत आहे. गोरेगावचा समतोल व कालबद्ध विकास घडविण्याच्या प्रमुख उद्देशाने गोरेगाव विकास समितीची स्थापना झाली. अनेक समस्यांनी घेरलेल्या गोरेगावातील लोकजीवन सुसह्य व सुखी करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची प्रतिज्ञा करुनच ही समिती उभी राहिली. विकास कार्याला सुरुवात करायची तर गोरेगावची परिपूर्ण व यथार्थ ओळख आपल्याला नको काय? आजच्या गतिमान जीवनात प्रत्येकाचा बहुतेक वेळ घराबाहेर, गावाबाहेर जातो. उपनगरातील माणसांचा बराचसा वेळ प्रवासातच जातो. त्यामुळे गावाची कशाला, शेजार-पाजारची माहितीही आपल्याला नसते. आयुष्यात केव्हां-कोणत्या गोष्टीची किंवा सेवेची गरज भासेल सांगता येत नाही. मग आयत्यावेळी धावपळ उडते.
प्रबोधन गोरेगाव’ या लोकमान्य संस्थेने वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यास सुरूवात केल्यानंतर २४ वर्षांचा कालावधी उलटला. प्रबोधन गोरेगावचे संस्थापक श्री. सुभाष देसाई यांच्या कल्पना सदैव भव्य दिव्य! युवकांचे व्यक्तिमत्व फुलवणारा कोणता उपक्रम राबवावा याची चर्चा त्यांनी सहकर्यांबरोबर केली. त्याचे चपखल उत्तर संस्थेचे संस्थापक सदस्य श्री. विजय नाडकर्णी यांनी दिले. निर्णय घेण्यात आला की राज्य पातळीवर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेस प्रारंभ करावयाचा. शालेय जीवनापासून विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये स्वत: श्री. विजय नाडकर्णी यांनी प्राविण्य संपादन केले होते. त्यामुळे स्पर्धांचा दांडगा अनुभव. संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अखंड परिश्रम घेऊन आज स्पर्धेला महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण वक्तृत्व स्पर्धा हे स्थान प्राप्त करून दिले आहे. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रबोधन गोरेगाव तर्फे ’प्रबोधन दैनिक सामना महावक्तृत्व स्पर्धा’ आयोजित केली व समयोचित ’वक्ता दशसहस्त्रेषु’ ही स्मरणिका प्रकाशित केली.
बोधन गोरेगाव या क्रियाशील संस्थेने मराठी एकांकिका चळवळीला फार मोठ्या प्रमाणावर हातभार लावला आहे. व्यावसायिक रंगभूमीची प्रयोगशाळा म्हणजे एकांकिका स्पर्धा असे जर आपण म्हणणार असू तर ’प्रबोधन’ ने या प्रयोगशाळेला सातत्याने जागृत, जिवंत व अभ्यासशील बनवले आहे असे म्हणता येईल. प्रबोधन संस्था स्थापने पासूनच एका दिशेने वाटचाल करणारी संस्था. उणीव कशाची आहे? कोणत्या उपक्रमाला प्रतिसाद मिळेल आणि तो सातत्याने चालू राहील? या शोधदुर्बिणीतून प्रबोधनला एकांकिका गवसली. १९७२ पासून म्हणजेच स्थापनेच्या पहिल्या वर्षापासूनच प्रबोधनच्या मंडळींनी एकांकिका उत्सवाच्या माध्यमातून एकांकिकेच्या सुप्त सामर्थ्यास हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले. ज्यांना ’वलय’ नाही त्यांना आपले गुण दाखविण्याची आणि इतरांना ते पारखण्याची संधी या उत्सवामुळे मिळाली.
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.