‘‘प्रबोधन धर्मादाय डायलिसीस’’ सेंटरचा लोकार्पण सोहळा २६ सप्टेंबर २०१५ रोजी मुंबई महापालिका आयुक्त मा. श्री. अजोय मेहता यांच्या शुभहस्ते झाले. प्रबोधन गोरेगाव या धर्मादाय संस्थेतर्फे मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारतीत ‘प्रबोधन धर्मादाय डायलिसीस सेंटर’ सुरु करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा. श्री. दीपक सावंत व शिवसेना नेते, खासदार मा. श्री. गजानन कीर्तिकर, तसेच शिवसेना विभागप्रमुख व आमदार मा.श्री. सुनिल प्रभू हे सुध्दा विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रबोधन डायलिसीसचे उद्घाटन हे २६ सप्टेंबर २०१५ हा प्रबोधन गोरेगावच्या ट्रस्टच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस मानता येईल. प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व राज्याचे उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली १ ऑक्टोबर २०१५ रोजी ‘प्रबोधन धर्मादाय डायलिसीस सेंटर’ कार्यान्वित झाले. ‘अँपेक्स किडनी केअर’ या संस्थेतर्फे डॉ. राजेश कुमार व श्रीरंग बिच्छू हे नामांकित किडनी तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना डायलिसीस दिले जाते. मुंबईच्या पश्चिम उपनगर परिसरात डायलिसीस सेंटरची असलेली गरज ओळखून ते अत्याधुनिक केंद्र डायलेसीस रुग्णांच्या सेवेसाठी सुरु केले आहे. येथे प्रत्येक डायलिसीस पेशंटला महिन्यातून किमान १२ वेळा डायलिसीस करणे सक्तीचे आहे. दर महिन्याला एका रुग्णाला १२ डायलिसीस देतो त्यामुळे प्रत्येक रुग्णामागे संस्थेचे १२५० x १२ = १५,०००/- इतका खर्च येतो. एकंदर ५० रुग्णांना आपण ही सेवा उपलब्ध करुन देतो म्हणजेच दर महिन्याला प्रबोधन गोरेगाव संस्थेला १५,०००/- x ५० = ७,५०,०००/- इतकी तूट सहन करावी लागते.. जेणेकरुन पेशंटचे किडनी फंक्शनिंग व तब्येत उत्तम राहण्यासाठी मदत होते. डायलिसीस बरोबर पेशंटना ‘Iron व Epo’ चे इंजेक्शन आवश्यकतेनुसार अत्यंत कमी दरात उपलब्ध करुन दिली जातात. प्रबोधन डायलिसीस सेंटरमध्ये डायलिसीसच्यावेळी वापरण्यात येणारे कापुस, स्पिरिट, इंजेक्शनच्या सुया, टिश्यु, नॅपकिन इत्यादींसाठी डिस्पोजेबल किट्स वापरण्यात येते, जेणेकरुन दुस-या पेशंटपासून होणारा संसर्ग रोग टाळण्यास मदत होते.दर महिन्याला, ३ महिन्यांनी आणि ६ महिन्यांनी प्रत्येक रुग्णाच्या विनामुल्य pathaloggy Test
केल्या जातात. त्यामुळे डायलिसीससाठी रु. १५००/- इतका खर्च येतो. संस्था प्रत्येक डायलिसीस साठी संस्थेला रु. १२५०/- ची तूट सहन करावी लागते. या गोष्टींमुळे प्रबोधन डायलिसीस सेंटर हे मुंबईतील एक नामांकित ‘डायलिसीस सेंटर’ म्हणून ओळखले जाते. डायलिसीस चालु असताना पेशंटची तब्येत उत्तम राहवी यासाठी उत्तमप्रतीच्या डायलिसीस बरोबर समतोल आहार व व्यायामाचीही आवश्यकता असते हे जाणून प्रबोधन डायलिसीस सेंटरमध्ये दर दोन महिन्याने आहार तज्ज्ञ, योगा तज्ज्ञ हे पेशंट व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधत असतात. प्रबोधन डायलिसीस सेंटरमध्ये ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य’ योजनेअंतर्गत मोफत डायलिसीस सेवा उपलब्ध करुन दिली जाते. प्रबोधन डायलिसीस सेंटरमध्ये मिळणारी डायलिसीस सेवा ही उच्च दर्जाची असून सन २०१५ – १६ या वर्षात प्रबोधन डायलिसीस सेंटरने ५६ रुग्णांना ५७९७ डायलिसीस सेवा पुरविल्या आहेत. थेंबे थेंबे तळे साचे या ब्रीद वाक्याला अनुसरुन देणगीदारंची एक छोटीशी मदतही काही रुग्णांना सुसह्य आयुष्याची भेट असेल. प्रबोधन डायलिसीस सेंटरमध्ये उत्तम डायलिसीस देऊन पेशंटची सेवा केली जाते. परंतु त्याचबरोबर विविध सणांच्यावेळी पेशंटना आनंदी व उत्साही वाटावे त्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात. उदा. मकर संक्रात, होळी, गणपती, दसरा दिवाळी या निमित्ताने डॉक्टर, टेक्निशियन, कर्मचारी वर्ग व पेशंट तसेच पेशंटचे नातेवाईक सहभागी होऊन उत्सव साजरे करतात. डायलिसीस सेंटरची वास्तू दोन मजल्याची असून तेथे एकूण १५ बेड आणि रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना विरंगुळा म्हणून वाचनालयाची सोय केली आहे. हा उपक्रम राबवित असताना आम्हाला लायन्स क्लब ऑफ मुंबई कार्टर रोड खार, LIC Golden jubilee Foundation, सारस्वत बँक,D – Link, श्री महालक्ष्मी मंदिर न्यास, सुबोध संजिवन ट्रस्ट, श्री. सिध्दीविनायक मंदिर न्यास. प्रबोधन संस्था व हितचिंतकांनी दिलेल्या देणगीतून हा खर्च उभा केला जातो. तरी आपणही सढळ हस्ते या उपक्रमाला मदत करावी ही विनंती.
संपर्क : ००२-२९२७६५०४
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.