साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती
प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धेचे आयोजन
माहितीपत्रक डाऊनलोड करा
नमस्कार,
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारणाच्या विचारांच्या प्रेरणेतून सन १९७२ साली शिवसेना नेते व प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांनी 'प्रबोधन गोरेगाव' या संस्थेची स्थापना केली. ज्ञान, कला, सेवा या त्रिसूत्रीला न्याय देत आज या संस्थेने गोरेगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील जनतेसाठी 'प्रबोधन क्रीडाभवन' हे क्रीडा संकुल, प्रबोधन डायलेसिस सेंटर , मीनाताई ठाकरे रक्तपेढी , प्रबोधनकार ठाकरे वाचनालय यासह अभ्यासिका , जॉगर्सपार्क , ओझोन जलतरण तलाव असे विविध समाजोपयोगी उपक्रम कार्यान्वित केले आहेत. संस्थेला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संस्थेने ग्रामीण भागातील अपूर्ण शिक्षण झालेल्या गरीब मुलामुलींना रोजगार मिळावा यासाठी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य लाभावे या उद्देशाने रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात 'एमजीएल- प्रबोधन कौशल्य निकेतन' ही संस्था सन २०२२ पासून सुरु केली. या संस्थेमध्ये नर्सिंग,आयटी, इलेक्ट्रिशियन, ए.सी दुरुस्ती , गॅस पाईपिंग , ब्युटीशियन , शिवणकाम , मोबाईल दुरुस्ती यासारखे अभ्यासक्रम सुरु केले असून दरवर्षी साधारण ३२० विद्यार्थी प्रशिक्षित होत आहेत.
स्व. वसंत तावडे हे प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक धडाडीचे शिवसैनिक. अखेरच्या श्वासापर्यंत शिवसेना व स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधन गोरेगाव या तीन नावांनी झपाटलेला कार्यकर्ता. या संस्थेचा ते एक प्रमुख आधारस्तंभ होते. शिवसेनेच्या संपूर्ण इतिहासाची व कार्याची विविध वृत्तपत्रांत तसेच मासिकांत छापून आलेली कात्रणे जमा करण्याचा त्यांना छंद होता. त्यांच्याकडे 'उत्तम वाचक आणि चांगला लेखक' हे गुण असल्यामुळे त्यांनी आपले वसंतश्री हा दिवाळी अंक प्रकाशित करण्याचा उपक्रम अनेक वर्षे सातत्याने व यशस्वीपणे चालविला. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्याने व्याकरणशुद्ध मराठी लेखनासाठी त्यांचा प्रचंड आग्रह होता.
१९७७ साली मुंबई उपनगर मराठी साहित्य संमेलन गोरेगाव येथे भरवण्यामध्ये स्व. वसंत तावडे यांचा सिंहाचा वाटा होता. मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव, या संस्थेच्या कार्यात त्यांचा जवळचा संबंध होता. तसेच ज्या ठिकाणी मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जात असे त्या ठिकाणी ते आपल्या मित्रपारिवाराला आग्रहाने सोबत घेऊन जात असत.
त्यांच्या असामान्य योगदानाला विनम्र अभिवादन म्हणून यावर्षी पासून 'साहित्यसेवक वसंत तावडे स्मृती प्रबोधन-मार्मिक कथा स्पर्धा' आयोजित करण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये मराठी कथा लेखकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन 'प्रबोधन गोरेगाव' आणि 'व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिक' तर्फे केले आहे.
या स्पर्धेसाठी मराठी कथेसाठी किमान ३००० ते कमाल ४००० एवढी शब्दमर्यादा आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम,द्वितीय, तृतीय,तसेच प्रथम उत्तेजनार्थ, द्वितीय उत्तेजनार्थ व नियमांनुसार सर्वोकृष्ट विनोदी कथालेखनास प्रोत्साहन म्हणून विनोदी कथा पारितोषिक दिले जाईल.
पारितोषिक विजेत्या कथा ' मार्मिक' मध्ये प्रसिद्ध केल्या जातील. कथालेखकांनी आपली कथा प्रबोधन गोरेगाव,प्रबोधन क्रीडाभवन,प्रबोधन क्रीडाभवन मार्ग,सिद्धार्थ नगर,गोरेगाव (पश्चिम), मुंबई ४०० १०४
या पत्त्यावर किंवा prabodhankridabhavan2014@gmail.com या इ मेल वर दि.३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पाठवावी असे आवाहन प्रबोधन गोरेगावने केले आहे.
या स्पर्धेचे संपूर्ण माहितीपत्रक संस्थेच्या www prabodhan.org या वेबसाइटवर, प्रबोधन क्रीडाभवन, सिद्धार्थ नगर गोरेगाव (प) , प्रबोधनकार ठाकरे वाचनालय (जॉगर्स पार्क संकुल), सिद्धार्थ नगर गोरेगाव (प) येथे व अन्य प्रसिद्धी माध्यमांतून उपलब्ध करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी प्रबोधन क्रीडाभवन येथे भ्रमणध्वनी क्र. ७५०६७६०६७६ यावर रविवार व सार्वजनिक सुट्टया वगळून अन्य दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळात संपर्क साधावा.
माहितीपत्रक डाऊनलोड करा
नमस्कार,
या महिन्यात प्रबोधन गोरेगोव संचालित प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, अंतर्गत प्रबोधन व्यासपीठ या कार्यक्रमाद्वारे घेऊन येत आहोत, महाराष्ट्राचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व साहित्यिक, शिक्षणतज्ञ, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते प्रल्हाद केशव अत्रे यांच्या 13 ऑगस्ट रोजी होणा-या जयंती निमित्त एक वेगळा कार्यक्रम 'बहुआयामी आचार्य अत्रे' आणि व्याख्याते आहेत, ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध लेखक महाराष्ट्र टाईम्सचे सल्लागार संपादक मा. श्री. श्रीकांत बोजेवार.
अत्रे यांचे वक्तृत्व आणि कर्तृत्व याविषयी आपण जाणताच, बरेच वाचलेलेही असेल, त्यांची विनोदबुद्धी सर्व कर्तृत्वक्षेत्रात आढळते. विनोदकार म्हणूनच ते अधिक लक्षात राहतात. त्यांची लेखनशैली त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची निदर्शक असून तिच्यात एक प्रकारचा अस्सल मराठमोळेपणा जाणवतो. तर अशा या व्यक्तिमत्त्वा विषयी जाणून घ्यायला कोणाला नाही आवडणार तेव्हा दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता आपण सर्वांनी प्रबोधन क्रिडाभवन येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. कार्यक्रम सर्वांकरिता नि:शुल्क आहे, याची नोंद घ्यावी.
प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, गोरेगाव आयोजित कथा लेखन स्पर्धा 2023-24
प्रथम क्रमांक - स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
व्दितीय क्रमांक - स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक - स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ - प्रमाणपत्र व पुस्तक
स्पर्धेचे नियम व अटी खालीलप्रमाणेः-
1. कथेचे लिखाण सुटसुटीत व ठळक असावे. अथवा ते संगणकीय टंकलिखित केलेले असल्यास उत्तम .
2. कथा अनुवादित नसावी.
3. स्पर्धकाने पहिल्या पानावर आपले पूर्ण नाव, पिनकोडसह पोस्टाचा संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल लिहावा.
4. कथेसाठी विषयाचे बंधन नाही.
*5. स्पर्धेसाठी कथा पाठविण्याची अंतिम मुदत 10 जानेवारी, 2024 आहे.
6. कथा स्वतःची असल्याचे प्रतिज्ञापत्र प्रत्येक लेखकाने कथेबरोबर देणे अनिवार्य आहे.
7. वादग्रस्त कथा स्विकारल्या जाणार नाहीत.
8. कथेसाठी किमान शब्दमर्यादा सुमारे 1000 आणि कमाल 1500 इतकी आहे. लिखाण कागदाच्या एकाच बाजूला असावे. कथा संगणक टंकलिखित असल्यास उत्तम, कागद A-4 साइज असावा.
9.स्पर्धकाने आपल्या कथा पोस्टाने किंवा ई-मेलव्दारे खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा लिंकवर मुदतीत पाठवाव्यात.
10. परिक्षकांचा निकाल हा अंतिम राहील. विजेत्यांना निकाल कळविण्यात येईल.
11. कथा पूर्व प्रकाशित झालेली नसावी.
संपर्कासाठीः-
*प्रबोधनकार ठाकरे वाचनालय,
प्रबोधन जॉगर्स पार्क,
सिध्दार्थ नगर, रोड नं.17.
गोरेगाव (प.), मुं. 400 104.
फोन नं. 7700928284.
EMAIL prabodhanvachnalay@gmail.com
प्रकल्प प्रमुख,
(गोविंद येतयेकर)
दिनांक : १३ ते १६ डिसेंबर २०२३
ठिकाण : प्रबोधन क्रीडाभवन, प्रबोधन क्रीडाभवन मार्ग, सिद्धार्थ नगर, गोरेगाव पश्चिम.
अधिक माहितीसाठी संपर्क :
७५०६१६०६१६ , ७५०६७५०६७६
या आंतरशालेय क्रीडा महोत्सवात उपनगरातील २०० हून अधिक शाळेतील ६००० हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेत आहेत. या क्रीडा महोत्सवात खोखो, कबड्डी, धनुर्विद्या, Swimming, Athalatics, Karate, टेनिस, बुद्धिबळ अश्या प्रकारच्या क्रीडा प्रकारात विद्यार्थी सहभागी होणार आहेत. उपनगरातील या सर्वात मोठ्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपणही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे...
प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातर्फे दिनांक ८ मार्च २०२३ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून सायंकाळी ५.३० वाजता वाचनालयाच्या प्रांगणात डॉ. सुनिता चव्हाण यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘मुलांची कथा पालकांची व्यथा’ या विषयावर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत मधुरभाषिणी सौ. मृदुला सावंत.
आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वच पालकांची व्दिधा मनस्थिती झालेली आहे. पाल्यांचे संगोपन कसे करावे, संस्कार, आजच्या पिढीला दोष द्यायचा की आपणच कुठंतरी कमी पडतोय, नेमकं काय घडतय आज पावलोपावली वावरताना इ. विषयी जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आर्वजून या कार्यक्रमाला उपस्थित राहावे.
धन्यवाद.
प्रबोधनकार ठाकरे वाचनालयातर्फे दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या आवारात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रख्यात गीतकार, संगीतकार, कवी, चित्रकार श्री. मिलिंद जोशी ‘माय मराठीचा रंग नवा’ या विषयावर त्यांच्याशी मधुरभाषिणी सौ. स्मिता आपटे संवाद साधणार आहेत. त्याचवेळी वाचनालयातर्फे घेण्यात आलेल्या कथा लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. कथा लेखन स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र ही देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी आर्वजून या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी व श्री. मिलिंद जोशी यांच्या कवितांचा, शब्दफुलांचा आस्वाद घेण्यासाठी शब्दांचे मोती आठवणीत साठविण्यासाठी आपली उपस्थिती हवीच हवी, न याल तर या सोनेरी क्षणांना मुकाल. चला तर मग वाट पाहूयात २७ फेब्रुवारी च्या अविस्मरणीय संध्येची.
धन्यवाद.
प्रबोधन गोरेगावतर्फे उन्हाळी शिबीर २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. उन्हाळी शिबिर १८ एप्रिल पासून सुरु होणार आहे.
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
माहितीपत्रक डाऊनलोड करा'जागतिक महिला दिन' च्या निमित्ताने प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्यातर्फे डॉ. शुभांगी दातार (जनरल फिजिशियन, सौंदर्य तज्ञ, लेखिका) यांची मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. 'स्त्री आरोग्य- तुझी कहाणी' या विषयावर त्यांची मुलाखत होणार आहे.
सौ. मृदुला सावंत या त्यांची मुलाखत घेणार आहेत. सदर कार्यक्रम ८ मार्च, सायंकाळी ५.३० वाजता प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, प्रबोधन जॉगर्स पार्क, सिद्धार्थ नगर गोरेगाव (प) येथे होणार आहे. हा कार्यक्रम नि:शुल्क आहे.
प्रबोधन ठाकरे वाचनालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या सहयोगाने 'मराठी भाषा गौरव दिन' कार्यक्रम
प्रबोधन गोरेगाव संचलित, प्रबोधनकार ठाकरे वाचनालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या सहयोगाने मराठी भाषा दिनानिम्मित 'मराठी भाषा गौरव दिन' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम शनिवार २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, प्रबोधन जोगर्स पार्क, सिद्धार्थ नगर, गोरेगाव पश्चिम येथे होणार आहे.
या समारंभाला कोमसाप मुंबई जिल्हा अध्यक्षा माननिय. लता गुठे प्रमुख पाहुण्या उपस्थित राहणार आहेत. तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षा कोमसाप केंद्रीय अध्यक्षा माननिय. नमिता किर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमावेळी सुवर्णा मयेकर लिखीत " स्मृतीगंध दरवळताना" या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
सदर कार्यक्रमात नाटककार वि.वा.शिरवाडकर यांचे गद्य रसस्वाद आणि कविवर्य कुसुमाग्रज, कवयित्री शांता शेळके आणि वसंत बापट यांच्या कवितांचे गायन व वाचन होणार आहे. तसेच कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेचे रसग्रहण होणार आहे. हा कार्यक्रमकोरोनाच्या नियमांचे पालन करून पार पडणार आहे. तसेच प्रवेश नि. शुल्क आहे.
संपर्क- ७७००९२८२८४
'गिरीजा कीर कथास्पर्धेचा' पारितोषिक वितरण समारंभ
गंधाली दिवाळी वार्षिक आयोजित 'गिरीजा कीर कथास्पर्धेचा' पारितोषिक वितरण समारंभ ५ फेब्रुवारी रोजी 'प्रबोधनकार ठाकरे वाचनालय' यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या 'गंधाली दिवाळी वार्षिक' आयोजित सुप्रसिद्ध साहित्यिका 'गिरिजा किर कथास्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कथा स्पर्धेचा सन २०१९, २०२० व २०२१ या तीन वर्षासाठीचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे. सदर कार्यक्रम शनिवार, दि ५ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, प्रबोधन जॉर्गस पार्क, सिध्दार्थ नगर, गोरेगाव पश्चिम येथे होणार आहे. या समारंभाला प्रा. उषा तांबे प्रमुख पाहुण्या उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात कोरोनासंबंधी सर्व नियम व अटींचे पालन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन गंधाली चे संपादक डॉ.मधुकर वर्तक यांनी केली आहे.
प्रबोधनकार ठाकरे वाचनालयच्यावतीने
'कथा लेखन स्पर्धा'
प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, गोरेगाव यांच्यातर्फे 'कथा लेखन स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी आपल्या कथा पोस्टाने किंवा ई- मेलद्वारे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
१ कथेचे लिखाण सुटसुटीत व ठळक असावे. अथवा ते संगणकीय टंकलिखित केलेले असावे.
२ कथा अनुवादित नसावी, कथेसाठी विषयाचे बंधन नाही.
३ स्पर्धकाने पहिल्या पानावर आपले पूर्ण नाव, पिनकोसह पोस्टचा संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल लिहावा.
४ स्पर्धेसाठी कथा पाठविण्याची अंतिम मुदत २० फेब्रुवारी, २०२२ आहे.
५ कथा स्वतःची असल्याने प्रतिज्ञापत्र प्रत्येक लेखकाने कथेबरोबर देणे अनिवार्य आहे.
६ वादग्रस्त कथा स्वीकारल्या जाणार नाहीत.
७ कथेसाठी कमाल शब्दमर्यादा सुमारे २००० आणि किमान १५०० इतकी आहे. लिखाण कागदाच्या एका बाजूला असावे. कागद ऐ-४ साइज असावा.
८ स्पर्धकाने आपल्या कथा पोस्टाने प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, प्रबोधन जोगर्स पार्क, सिद्धार्थ नगर, रोड नं. १७, गोरेगाव (प), मुं. ४०० १०४. या पत्त्यावर पाठवाव्यात.
किंवा prabodhanvachnalay@gmail.com या ई-मेलद्वारे पाठवावे.
या स्पर्धेतील विजेत्यांना खलीलप्रमाणे पारितोषिक देण्यात येणार आहेत.
प्रथम क्रमांक- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र
उत्तेजनार्थ - प्रमाणपत्र व पुस्तक
संपर्कासाठी
फोन नं:- ७७००९२८२८४.
EMAIL- prabodhanvachnalay@gmail.com
जगभरच्या मराठी कलावंतांसाठी एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय व्यासपीठ
संपर्क साधा
ईमेल: hello@prabodhanisff.in
https://www.prabodhanisff.in/. *सहभागी होण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2021*
मुख्य पुरस्कार:
सर्वोत्कृष्ट लघुपट - प्रथम पुरस्कार रू. ७५,०००/-
सर्वोत्कृष्ट लघुपट -द्वितीय पुरस्कार रू. ५०,०००/-
सर्वोत्कृष्ट लघुपट - तृतीय पुरस्कार रू. २५,०००/-
विशेष पुरस्कार:
सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक महाराष्ट्र यापैकी एखाद्या विषयांवरील सर्वोत्तम लघुपट
- रु. २५,०००/-
मराठी नाट्यकृतीवर आधारित सर्वोत्कृष्ट लघुपट - रु. २५,०००/-
फिल्म स्कूल किंवा मास मिडिया इन्स्टिट्यूट्समध्ये फिल्ममेकिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या दिग्दर्शकांपैकी
सर्वोत्कृष्ट लघुपट - रु. २५,०००/-
वैयक्तिक पुरस्कार - सर्वोत्कृष्ट पटकथाकार / छायाचित्रकार / संकलक / अभिनेता / अभिनेत्री
- प्रत्येकी रु. १०,०००/-
दिवाळी अंकांचं सभासद होण्यासाठी संपर्क कराः ७७००९२८२८४
महाराष्ट्राला सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरेचा समृध्द अशी अनुभूती करुन देणारा असा वैभवशाली दिवाळी अंक...
उत्कृष्ट कथालेखन, साहित्य, महिला, ज्योतिष, चुटकुले आरोग्य, रहस्यकथा या वैविध्यपूर्ण प्रकारांसह कांदबरी, मालिका, चित्रपट, देश-परदेशातील अविस्मरणीय भटकंती
आदी माहितीपूर्ण मनोरंजनाचा खजिना...
प्रबोधनकार ठाकरे वाचनालयतर्फे आयोजित
'दिवाळी अंक उत्सव योजना २०२१'
प्रबोधनकार ठाकरे वाचनालयतर्फे आयोजित
'निबंध स्पर्धा २०२१'
प्रबोधनकार ठाकरे वाचनालयतर्फे दि. १५ ऑक्टोबर "वाचन प्रेरणा" दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
निबंध स्पर्धेचे विषय:
* टाळेबंदी काळातील वाचनाचे महत्त्व
* भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्ष
* 'पुस्तक' माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात..!
* प्रबोधन गोरेगाव संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष
निबंध स्पर्धेचे नियम :-
* निबंध मराठी भाषेत लिहिलेला असावा.
* वय वर्ष अठरा पूर्ण झालेली व्यक्ती स्पर्धेत सहभागी होऊ शकते.
* एका व्यक्तीला स्पर्धेसाठी एकच निबंध पाठवता येईल.
* निबंधाची शब्दमर्यादा जास्तीत जास्त ७५० शब्द आहे.
* निबंध पेपरच्या एका बाजूवरच लिहावा.
* निबंध सुवाच्च हस्ताक्षरात किंवा टाईप (टाईपरायटर किंवा संगणक) केलेला असावा.
* निबंध १२ ऑक्टोबर २०२१ पर्यंत वाचनालयात जमा करावेत किंवा वाचनालयाच्या ई- मेल आयडीवर पाठवणे.
* स्पर्धेकाने आपले नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाइल नं., ई- मेल आयडी इ. माहिती देणे आवश्यक आहे.
* कोणतेही कारण न देता निबंध नाकारण्याचा अधिकार व्यवस्थापन समितीला आहे. परिक्षकांचा निकाल अंतिम राहिल.
पत्ता : प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, जॉगर्स पार्क, सिद्धार्थ नगर, रस्ता क्र. १७ , गोरेगाव (प), मुंबई : ४००१०४
भ्रमणध्वनी क्र. : ७७००९२८२८४
ई- मेल आयडी : prabodhanvachnalay@gmail.com
#vachnalay #वाचनालय #mumbaicollages #वाचनप्रेरणा #vachan #essay #निबंध #प्रबोधनकार #ठाकरेवाचनालय #जोगर्स पार्क#goregaon #क्रीडाभवन #वाचकप्रेमी #children #mumbaivachnalay
मुंबई : 'प्रबोधन गोरेगाव' या सामाजिक - सांस्कृतिक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रबोधन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. आले. प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व राज्याचे उद्योगमंत्री मा. श्री. सुभाष देसाई व चित्रपटसृष्टीतील जेष्ठ जाणकार व समीक्षक श्री. अशोक राणे यांच्या उपस्थितीत प्रबोधन गोरेगावतर्फे या नवीन उपक्रमाची घोषणा करण्यात आली. तसेच प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. वेबसाईटची लिंक :https://www.prabodhanisff.in/
प्रबोधन गोरेगाव संस्था आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत असताना प्रबोधनने आजच्या परंपरा आणि माध्यमांच्या अनुषंगाने काही अनोखे उपक्रम हाती घेण्याचे ठरवले आहे. यानुसार प्रबोधन गोरेगावने 'प्रबोधन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल' च्या निमित्ताने मराठी तरुण वर्गाने जगभरात आपली एक वेगळी उंची गाठावी याकरीता नवे व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.
या महोत्सवाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे लघुपटांच्या माध्यमातून देशभरातून आणि जगभरातील मराठी चित्रपट निर्मात्यांना आणि प्रतिभेला व्यासपीठ प्रदान करणे. या व्यतिरिक्त, PISFF चा उद्देश लघुपटांच्या निर्मितीवर तसेच विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये त्याचे विपणन आणि सहभागाबद्दल मार्गदर्शन देऊन मराठी लघुपटांच्या समृद्ध करण्याचा आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत संस्थेचे संस्थापक श्री. सुभाष देसाई साहेब यांनी त्यांच्या वक्तव्यातून प्रबोधनचा ५० वर्षातला जीवनप्रवास उलगडत असताना आजच्या नव्या पिढीसाठी नव्या उपक्रमाची घोषणा करत असल्याचे सांगितले. यावेळी ते असं ही म्हणाले की, प्रबोधनने गेल्या ५० वर्षात अनेक अशा गोष्टी केल्या की त्यावेळी त्या पहिल्याच होत्या आणि म्हणूनच जेव्हा काहीतरी काम करण्याची संधी येते तेव्हा प्रबोधनने नेहमीच नाविन्याचा एक अंगीकार केला आहे. तसेच चित्रपटसृष्टीतील जेष्ठ जाणकार व समीक्षक श्री. अशोक राणे यांच्यामुळे लघुपट महोत्सवाला एक वेगळी उंची प्राप्त झालेली असून तो यशस्वी होईल असा विश्वास ही देसाई साहेबांनी व्यक्त केला. त्यासह अशोक राणे यांनी लघुपटातील प्रवेशाबाबत महत्वाची माहिती देत मराठी तरुणांना स्वतःची अशी एक वेगळी उंची गाठण्याची नामी संधी असून प्रवेश घेण्याचे आवाहन केले आहे.
याप्रसंगी प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितिन शिंदे, कार्याध्यक्ष गोविंद गावडे, कोषाध्यक्ष खजिनदार रमेश ईस्वलकर, सह कार्यवाह कैलाश शिंदे, कार्यकारिणी सदस्य गोविंद येतयेकर, महेश करमरकर,अरविंग सावंत, पद्माकर सावंत, तसेच ज्येष्ठ सल्लागार सदस्य डॉ. मनोहर अद्वानकर,पांडुरंग पोखरकर,श्रीनिवास शिरसेकर, बापू नाडकर्णी, अण्णा देऊलकर, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक डॉ. मृण्मयी भजक यांनी प्रबोधन गोरेगावतर्फे नव्या पिढीने या लघुपट महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करत कार्यक्रमाची सांगता केली.
★काव्यलेखन स्पर्धेचे निकाल जाहीर★
भावना आणि कल्पनांना अभिव्यक्त करणारे माध्यम म्हणजे कवीमनाचे काव्य..!
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत प्रबोधनकार ठाकरे वाचनालय तर्फे 'काव्यलेखन स्पर्धेचे' आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकरिता स्वरचित कविता पाठवायच्या होत्या. दरम्यान या काव्यलेखन स्पर्धेत सहभागी स्पर्धकांची निवड करण्यात येत असून परिक्षकांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक देण्यात आले आहेत.
खालीलप्रमाणे विजेत्या स्पर्धकांची नावे:
प्रथम क्रमांक : श्री. शरद यशवंत सबनिस
द्वितीय क्रमांक : सौ . कांचन कल्मेश सरोळकर
तृतीय क्रमांक : श्री. देवदत्त जोशी
बक्षीस वितरण समारंभाची तारीख लवकरच कळविण्यात येईल. विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन..
तसेच सर्व स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद
कार्यालयाचा पत्ता : प्रबोधनकार ठाकरे वाचनालय, जॉगर्स पार्क रोड नंबर . १७, गोरेगाव पश्चिम मुंबई : ४००१०४.
* मोबाइल क्रमांक : ७७००९२८२८४
* कार्यालयीन वेळ : सकाळी ८: ३० ते सायंकाळी ७:३०
* E- mail : prabodhanvachnalay@gmail.com
* आमची वेबसाईट : www.prabodhan.org
अमृतकलश
कार्यक्रम: अमृतकलश
२३ जून २०२१
वेळ: रात्री 10 वाजता
विषय: मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मुलुंड विभाग ह्यांच्या उपक्रमांबद्दल माहितीपर मुलाखत.
सहभाग: शंकर पेंडसे, डॉ.भरती निरगुडकर, भाग्यश्री नुलकर
मुलाखतकार:पूर्वा कर्वे-बापट
जरुर ऐका आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वहिनी(मध्यम लहरी ५३७.६मीटर्स)वर.आणि AIR MARATHI ह्या D.T.H.उपग्रह वाहिनीवर Live Streaming वर
पुन:प्रसारण गुरुवारी संध्याकाळी ४:३०वाजता.
Download Prasar Bharati's NewsOnAir App from
https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews
to stay updated with latest news as well as All India Radio and Doordarshan Programs.
दिवाळी अंक उत्सव योजना २०२०
आर्थिक नियोजन बदलायला हवे !
इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव प्रस्तुत "प्रबोधन संवाद - दिशा उद्याची" या कार्यक्रमाच्या तिस-या भागाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. भरत फाटक हे सनदी लेखापाल आणि गुंतवणूक सल्लागार, सी. ए. व टॅक्स प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट एक्स्पर्ट आहेत . 'प्रबोधन संवाद' या तिस-या भागात भरत फाटक हे 'आर्थिक नियोजन बदलायला हवे!' या विषयाला अनुसरुन मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम २६ मे २०२० रोजी, संध्याकाळी ५ः०० वाजता YouTube वर IME WORLD ह्या channel वर live दिसेल. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम आवर्जून पहावा अशी विनंती..
प्रबोधन संवाद भाग १३ । अभिनेता हृषिकेश जोशी
इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव प्रस्तुत "प्रबोधन संवाद - दिशा उद्याची" या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी आपल्या भेटीस येणार आहेत. या कार्यक्रमाचे संवादक प्रतिमा कुलकर्णी आहेत.
'Online नाटक? छे. नाटक असं नसतं राजा!' या विषयाला अनुसरून ते उत्तम मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम २५ जुलै २०२० रोजी, संध्याकाळी ७:३० वाजता IME WORLD ह्या youtube channel वर live दिसेल..
प्रबोधन संवाद भाग १४ । अमित वाईकर यांच्यासोबत..
इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव प्रस्तुत "प्रबोधन संवाद - दिशा उद्याची" या कार्यक्रमाच्या निमित्ताने चीनमधील भारतीय समूहाचे प्रतिनिधी अमित वाईकर आपल्या भेटीस येणार आहेत. या कार्यक्रमाचे संवादक राजेश देशमुख आहेत.
'थेट ड्रॅगनच्या भूमीतून ' या विषयाला अनुसरून ते उत्तम मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम दि. १ ऑगस्ट २०२० रोजी, संध्याकाळी ७:३० वाजता IME WORLD ह्या youtube channel वर live दिसेल.
प्रबोधन संवाद । डॉ. मिलिंद वाटवे यांच्यासोबत..
प्रबोधन संवाद । डॉ. नितीन करमळकर यांच्यासोबत..
इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव प्रस्तुत "प्रबोधन संवाद - दिशा उद्याची" या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची क्षितिज पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत .
'नवे शैक्षणिक धोरण' या विषयाला अनुसरून ते उत्तम मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम २२ ऑगस्ट २०२० रोजी, संध्याकाळी ७:३० वाजता IME WORLD ह्या youtube channel वर live दिसेल.
प्रबोधन संवाद भाग १८ । मकरंद गद्रे यांच्यासोबत..
इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव प्रस्तुत "प्रबोधन संवाद - दिशा उद्याची" या कार्यक्रमाच्या निमित्ताने सॉफ्टवेअर इंजिनियर आणि आर्किटेक्ट मकरंद गद्रे यांची वसंत लिमये यांनी घेतलेली मुलाखत .
'सायबर सिक्युरिटी काळाची गरज ' या विषयाला अनुसरून ते उत्तम मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम २८ ऑगस्ट २०२० रोजी, संध्याकाळी ७:३० वाजता IME WORLD ह्या youtube channel वर live दिसेल.
वाचन प्रेरणा दिनाच्या उपक्रमासाठी साहित्यिक,
कवी व कवियत्रींना आवाहन
राज्य मराठी विकास संस्था यांच्या विदयमाने आणि प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या सहकार्यांने भारताचे माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा स्मृतीदिन म्हणून 15 ऑक्टोबर 2020 हा दिन 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या परिस्थितीत हा दिवस ऑनलाईनच्या माध्यमातून साजरा होणार आहे. यानिमित्तीने आम्ही साहित्यक्षेत्रातील मान्यवरांना विनंती करीत आहोत की, आपण या ऑनलाईन उपक्रमात सहभागी व्हावे. लेखकांनी साहित्यामधील विशिष्ट भागाचे साधारण 15 ते 20 मिनिटांच्या वेळ मर्यादेचे अभिवाचन मोबाईल व्हिडीओच्या मार्फत प्रबोधनकार ठाकरे वाचनालायकडे पाठवावे. त्याचप्रमाणे कवी व कवियत्री यांनीही आपल्या कविता ठराविक कालमर्यादेत आमच्याकडे मोबाईल व्हिडीओ मार्फत पाठवाव्यात.
15 ऑक्टोबर 2020 या वाचन प्रेरणा दिनी आपले सादरीकरण आमची वेबसाईट www.prabodhan.org वर प्रसारित करण्यात येतील. आपले सादरीकरण कृपया मोबाईल क्र. 9920947765 येथे ग्रंथालय प्रमुख सौ.सुधा पाटील यांच्याकडे लवकरात लवकर पाठवावे ही विनंती.
प्रबोधन संवाद भाग २० । 'सोलर एनर्जी'चे अध्यक्ष श्री.प्रफुल्ल पाठक यांच्यासोबत, विषय : सौरऊर्जा
इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव प्रस्तुत "प्रबोधन संवाद - दिशा उद्याची" या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'सोलर एनर्जी' चे अध्यक्ष श्री. प्रफुल्ल पाठक आपल्या भेटीस येत आहेत.या कार्यक्रमाचे संवादक सारंग भिडे आहेत .
'सौरऊर्जा : उद्याचा विश्वासार्ह व प्रमुख ऊर्जा स्त्रोत ' या विषयाला अनुसरून ते उत्तम मार्गदर्शन करणार आहेत. श्रोत्यांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमाअंतर्गत प्रफुल्ल पाठक देणार आहेत. तरी सर्व रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम २६ सप्टेंबर २०२० रोजी, संध्याकाळी ७:३० वाजता IME WORLD ह्या youtube channel वर live दिसेल.
प्रबोधन संवाद भाग १९ । पोलिस आयुक्त सदानंद दाते
इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव प्रस्तुत "प्रबोधन संवाद - दिशा उद्याची" या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलिस आयुक्त सदानंद दाते प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. वसई - विरार, मीरा - भाईंदर या प्रस्तावित आयुक्तालयाचे पहिले आयुक्त सदानंद दाते हे शिस्तीचे कडक, धाडसी वृत्तीचे अधिकारी आहेत. संवादक श्रीरंग गोडबोले यांनी घेतलेली मुलाखत .
'पोलिस दलासमोरील आव्हाने ' या विषयाला अनुसरून ते उत्तम मार्गदर्शन करणार आहेत. कायदा सुव्यवस्था सांभाळत असताना भविष्यात वाढत्या आणि बदलत्या आव्हानांना कशाप्रकारे सामोरे जायचे आदी सर्व प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमाअंतर्गत सदानंद दाते देणार आहेत.
तरी सर्व रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम १२ सप्टेंबर २०२० रोजी, संध्याकाळी ७:३० वाजता IME WORLD ह्या youtube channel वर live दिसेल.
प्रबोधन संवाद भाग ८ । डॉ. धनंजय केळकर
प्रबोधन संवाद भाग ९। सलील चिंचोरे यांच्यासोबत..
इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव प्रस्तुत "प्रबोधन संवाद - दिशा उद्याची" या कार्यक्रमाच्या निमित्ताने सलील चिंचोरे हे आपल्या भेटीला 'प्रबोधन संवाद भाग ९' च्या माध्यमातून येणार आहेत.
'वर्क फ्रॉम होम - चांगले की वाईट ?' या विषयाला अनुसरून ते उत्तम मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम २७ जून २०२० रोजी, संध्याकाळी ७:३० वाजता IME WORLD ह्या youtube channel वर live दिसेल.
प्रबोधन संवाद भाग ११ । डॉ. राजेंद्र बर्वे यांच्यासोबत...
चीफ एडिटर ABP माझा - राजीव खांडेकर
प्रबोधन संवाद भाग १०। दीपक घैसास यांच्यासोबत..
इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव प्रस्तुत "प्रबोधन संवाद - दिशा उद्याची" या कार्यक्रमाच्या निमित्ताने दीपक घैसास हे आपल्या भेटीला 'प्रबोधन संवाद भाग १०' च्या माध्यमातून येणार आहेत.
'कोरोनानंतर उद्योग व्यवसायातील संधी!' या विषयाला अनुसरून ते उत्तम मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम ४ जुलै २०२० रोजी, संध्याकाळी ७:३० वाजता IME WORLD ह्या youtube channel वर live दिसेल.
'अर्थतज्ञ : नरेंद्र जाधव '
डॉ. विठ्ठल कामत, विषय | उद्याचा हॉटेल व्यवसाय
इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव प्रस्तुत "प्रबोधन संवाद - दिशा उद्याची" या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतातच नाहीतर जगभरातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायामध्ये ज्यांचे नाव घेतले जाते असे डॉ. विठ्ठल कामत हे आपल्या भेटीला 'प्रबोधन संवाद' च्या माध्यमातून येणार आहेत. 'उद्याचा हॉटेल व्यवसाय' या विषयाला अनुसरून ते उत्तम मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम ५ जून २०२० रोजी, संध्याकाळी ७:३० वाजता IME WORLD ह्या youtube channel वर live दिसेल.
प्रबोधन संवाद भाग ७ । डॉ. श्रीकांत परांजपे
इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव प्रस्तुत "प्रबोधन संवाद - दिशा उद्याची" या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. श्रीकांत परांजपे हे आपल्या भेटीला 'प्रबोधन संवाद भाग ७' च्या माध्यमातून येणार आहेत. 'आंतरराष्ट्रीय राजकारणातील बदल आणि त्यानुसार भारताचे स्थान ' या विषयाला अनुसरून ते उत्तम मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम १३ जून २०२० रोजी, संध्याकाळी ७:३० वाजता IME WORLD ह्या youtube channel वर live दिसेल.
'आता ग्राहक कसा विचार करेल?'
इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव प्रस्तुत "प्रबोधन संवाद - दिशा उद्याची" या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री. भरत दाभोळकर आहेत. भरत दाभोळकर एक लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक, प्रसिध्द जाहिरात तज्ञ आणि बॅंक ऑफ इंडिया, व्हिडिओकॉन, फ्रूटी, टाटाच्या ब-याच उत्पादनासारख्या असंख्य नामांकित ब्रॅंडसाठी त्यांनी काम केले आहे. 'प्रबोधन संवाद' या तिस-या भागात भरत दाभोळकर 'आता ग्राहक कसा विचार करेल?' या विषयाला अनुसरुन मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम २९ मे २०२० रोजी, संध्याकाळी ५ः०० वाजता YouTube वर IME WORLD ह्या channel वर live दिसेल. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम आवर्जून पहावा अशी विनंती..
कोरोना : शाप की इशारा ?
इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव प्रस्तुत "प्रबोधन संवाद - दिशा उद्याची" या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. मोहन आगाशे यांनी कोरोना : शाप की इशारा? या विषयावर आधारित Covid 19 च्या साथीच्या सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीबद्दल भाष्य आणि मार्गदर्शन करणार आहेत. ही व्याख्यानमाला शुक्रवारी २२ मे रोजी संध्याकाळी ५:०० वाजता YouTube वर IME WORLD ह्या channel वर live दिसेल. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम आवर्जून पहावा अशी विनंती..
व्याख्यानमालेचे मुद्दे :
1. लॉकडाऊन आणि त्यानंतर घडत असलेले बदल.. व्यक्तिगत आणि सामाजिक आयुष्यातले.
2. हे बदल माध्यमांच्या दृष्टीतून कसे दिसत आहेत? ही लढाई आहे का?
3. कोरोनाने आत्तापर्यंत झालेली प्रगती थांबेल का ?
4. ह्यापुढील काळात समाज आणि निसर्ग ह्यांतील संबंध कसे रहातील? कसे असावेत?
5. आरोग्य ही वैयक्तिक जबाबदारी आहे की शासकीय ?
6. वैयक्तिक आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य ह्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे का ?
'प्रबोधन संवाद - दिशा उद्याची'
इंडियन मॅजिक आय आणि प्रबोधन गोरेगाव प्रस्तुत "प्रबोधन संवाद - दिशा उद्याची" ही व्याख्यानमाला मंगळवार दिनांक १९ मे पासून आपण सुरु करत आहोत. लॉक डाउनच्या काळात दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी ५.०० वाजता ही मालिका असेल. ही YouTube वर IME WORLD ह्या channel वर live दिसेल. लॉक डाउन नंतर आपण सर्वजण कार्यालयात अथवा व्यवसायात रुजू व्हाल तेव्हा दिवस आणि वेळ बदलली जाईल. एका तासाच्या कार्यक्रमात ४५ मिनिटे वक्त्याचे भाषण (अथवा presentation) आणि पुढील १५ मिनिटे प्रश्नोत्तरे अशी वेळेची विभागणी असेल.
व्याख्यानांचा विषय - Covid 19 च्या साथीच्या सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीबद्दल भाष्य आणि मार्गदर्शन. पहिल्या चार वक्त्यांच्या विषयांवरून आपल्याला अंदाज येईल.
दिनांक १९ मे - अच्युत गोडबोले - नवे वास्तव (New Normal)
दिनांक २२ मे - डॉ. मोहन आगाशे- कोरोना- शाप की इशारा ?
दिनांक २६ मे - भरत फाटक- आर्थिक नियोजन बदलायला हवे !
दिनांक २९ मे - भरत दाभोळकर - आता ग्राहक कसा विचार करेल ?
**गोरेगावकर बंधू भगिनीनो* -
*'करोनाशी* लढायला आपण सारे सज्ज झालो आहोत. गरजू रुग्णांना *'*रक्त*' मिळाले पाहिजे यासाठी मीनाताई ठाकरे रक्तपेढीने सर्व तयारी पूर्ण केली आहे .
गर्दी टाळण्यासाठी रक्तदान शिबिरे घेता येत नाहीत , परंतु रक्तपेढीत तुमचे रक्तदान स्वीकारता येते . २० मिनिटात तुमचे रक्तदान पूर्ण होते.
*गरजवंताना रक्तदान हेच जीवदान*
रक्त देण्यासाठी अवश्य या. इतरांनाही सूचवा ही विनंती .
आपला नम्र
सुभाष देसाई.
संस्थापक -
प्रबोधन गोरेगाव,
उद्योग मंत्री , महाराष्ट्र राज्य .
*पत्ता* -
Meenatai Thackeray Bloodbank ,
CTS 899/C ,1st Flr,
opp Jain Mandir galli , Nr Tripathi bhuvan, back side road of Mahindra Garden .
Goregaon west,
Mumbai 400104
फोन नंबर - 02228797586
02228797587/02228722929
Contact Persons -
9833208083. - Anuradha
9029066087. - Dr Aditya
9820313855 - Ramesh
9821138954. - Avinash
'प्रबोधन डायलेसिस सेंटर'
'प्रबोधन डायलेसिस सेंटर'
प्रबोधन गोरेगाव चे संस्थापक श्री. सुभाष देसाई यांचा अत्यंत महत्वाकांक्षी व समाज उपयोगी प्रकल्प म्हणजे 'प्रबोधन डायलेसिस सेंटर' 1 ऑक्टोबर २०१९ रोजी ५ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
या निमित्ताने एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. डायलिसिस सेंटरच्या पेशंटसाठी अन्नकोट स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी हितचिंतक, देणगीदार यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडणार आहे. तरी आपणही आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती.
दिनांक : 1 ऑक्टोबर, सायंकाळी 4 वाजता
स्थळ: प्रबोधन डायलेसिस सेंटर
'सवाई भीमसेन संगीत संम्मेलन'
संगीताने भारलेला आणि कानांना तृप्त करणारा संगीत महोत्सव गोरेगावात आर्य संगीत प्रसारक मंडळ, इंडियन मॅजिक आय व प्रबोधन गोरेगांव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधन क्रीडाभवन येथे २२ ते २४ नोव्हेंबर,२०१९ रोजी संपन्न होणार आहे.
पुण्यात होणार्या. सवाई गंधर्व कार्यक्रमाप्रमाणेच मुंबईत या वर्षीपासून हा संगीत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होणार याची घोषणा भारतरत्न पं .भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी केली.
या महोत्सवात दिग्गज कलाकारांबरोबर नवीन उदयोन्मुख कलाकारांना आपली कला पेश करण्याची संधी मिळेल, ज्यायोगे तरुण पिढी या महोत्सवात सहभागी होईल. शुक्रवार, शनिवार रात्री व रविवारी सकाळ आणि रात्र अशा 4 भागांमध्ये हा कार्यक्रम संपन्न होईल याच बरोबर सकाळी लेक्चर प्रात्यक्षिका होईल. तर दुपारी शास्त्रीय संगीत विषयक फिल्मस दाखवल्या जातील. भारतरत्न पं भीमसेन जोशी यांच्या दुर्मिळ फोटोंचे प्रदर्शन असेल, संगीत विषयक पुस्तके व CD येथे उपलब्ध असतील. या पत्रकार परिषदेस श्रीनिवास जोशी, श्रीरंग गोडबोले व सुनील वेलणकर यांनी संबोधित केले यावेळी प्रबोधनचे अध्यक्ष नितीन शिंदे व खजिनदार रमेश इसवलकर उपस्थित होते.
'ओझोन जलतरण तलावाची स्पर्धक अनन्या व त्रीशा ह्या जीएमएएए एज एक्वाटिक चॅम्पियनशिपची विजेती'
मुंबईः ग्रेटर मुंबई अमेतुर एक्वाटिक असोशिएशन चॅम्पियनशिप ही १० ते १२ मे, २०१९ रोजी टाटा पॉवर कॉलनी पूल, चेंबूर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये वयोगट १० आणि ११ वर्षाखालील मुलींचा सहभाग करण्यात आला होता. या चॅम्पियनशिपमध्ये ओझोन जलतरण तलावाची जलतरणपट्टू अनन्या नायक व त्रीशा मेनन या स्पर्धकांनी आपले कौशल्य सिदध केले.
या स्पर्धेअंतर्गत १० वर्षाखालील मुलींच्या गटातून अनन्या नायक या जलतरणपटूला वैयक्तिक चॅम्पियनशिपमध्ये विजेती घोषित करण्यात आले. तसेच २/६ सोने, २/६ चांदी आणि १/६ ब्राँझ, M ५० मीटर बटरफ्लाय – गोल्ड, M ५० मीटर बॅकस्ट्रोक – गोल्ड, M २०० मीटर व्यक्तिगत मेडले – सिलवर, M ५० मीटर फ्रीस्टाइल – सिलवर, M १०० मीटर फ्रीस्टाइल – ब्रोनझ आदि मेडल व चॅम्पियनशिप ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या दरम्यान, ११ वर्षाखालील मुलींच्या गटातून त्रीशा मेनन या जलतरणपटूला विजेती घोषित करण्यात आले असून ४/४ ब्रोनझ, ५० मीटर स्तन – कांस्य, १०० मीटर स्तन – कांस्य, M १०० मीटर बॅकस्ट्रोक – कांस्य, २०० मीटर विनामूल्य शैली – कांस्य, M ५० मीटर फ्रीस्टाइल रिले आदि मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. राज्य चॅम्पियनशिपमधील ६ पैकी ५ स्पर्धांमध्ये मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्यांची निवड झाली आहे. तसेच जून २०१९ च्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रकुलसाठी राज्य विजेतेपद राजकोट येथे होणार आहे.
प्रबोधन गोरेगाव ४७वा वर्धापन दिन
ओझोन जलतरण तलाव उन्हाळी शिबीर
जागतिक महिला दिन
मराठी भाषा गौरव दिन
मौज कट्टा २०१९
प्रबोधन व्यासपीठ १६ मार्च २०१९
प्रबोधन व्यासपीठ २०१९
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.