दररोज आपणास कोठे तरी अपघात झाल्याचे वृत्त वाचावयास मिळते. एखाद्या ठिकाणी दंगल उसळते, बॉम्बस्फोट होतात, अतिरेकी कारवाया, भूकंप, महापूर, रक्तस्त्रावजन्य व्याधी इत्यादी कारणाने अनेक रुग्ण उपचार घेत असतात. त्यातील काहींना तर अतितातडीने रक्त द्यावे लागते. परंतु अशावेळी त्या रुग्णाचा रक्ततगट माहित नसेल आणि रक्तगट तपासण्यास उशीर झाल्यास अति रक्तस्त्रावाने मृत्यु येण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून प्रत्येकास आपला रक्तगट माहीत असणे ही काळाची गरज आहे.
जर सर्वच माणसांचे रक्त लाल असते तर त्यात फरक का असतो ? तर हा फरक असतो रक्ताच्या गुणधर्मातील फरकामुळे रक्ता्ची चार भागात विभागणी केली आहे. आपले रक्त प्रामुख्याने प्लाझ्मा, प्लेटलेट्स, पांढ-या पेशी व लाल पेशी या घटकांनी मिळून बनलेले आहे. त्याचप्रमाणे रक्तात एक प्रकारचे प्रोटीन (ऍण्टीजन) ही असतात. या ऍण्टीजनच्या भिन्नतेमुळे वेगवेगळ्या माणसांचे रक्त वेगवेगळे असते. या वेगवेगळ्या रक्ताच्या गुणधर्माला ‘रक्तगट वा ब्लडग्रुप’ म्हणतात. ‘ए’, ‘एबी’, ‘बी’, आणि ‘ओ’ असे चार प्रमुख गट असून ‘आर एच’ पॉझिटिव्ह व ‘आर एच’ निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्तगट होतात. ए (प्रोटीन) असलेला ‘ए’ रक्तगट, बी असलेला ‘बी’ रक्तगट, दोन्ही असलेले ‘एबी’ रक्तगट यापैकी एकही प्रोटीन नसलेला ‘ओ’ रक्तगट. रक्तगट हे अनुवंशिक नसतात. त्यामुळे भावा - बहिणींचे रक्तगट एकच असेलच असे नाही. ‘ओ’ रक्तगटाचे रक्त इतर सर्व गटांना चालू शकते म्हणून या रक्तागटाच्या व्यक्तींना ‘युनिव्हर्सल डोनर’ असे म्हणतात. जगामध्ये ‘ओ’ रक्तगटाचे वर्चस्व असून या रक्तगटाची एकूण टक्के्वारी ४६ टक्के आढळून येते. निगेटिव्ह रक्तगट दुर्मिळ असतात, त्यामध्ये ‘एबी’ निगेटिव्ह रक्तगट तर पाच हजार व्यक्तींमध्ये एकाचा असतो. रक्त चढविण्याआधी रुग्णाचा रक्तगट आणि रक्तदात्याचा रक्तगट यांचे क्रॉसमॅच होणे जरुरी असते.
रक्तदानासाठी आलेल्या रक्तदात्याची निवड करताना काही नियमावली घालून दिलेली आहे. त्याचप्रमाणे रक्तदात्याचे वय १८ ते ६० पर्यंत असावे. वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे. हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ ग्रॅम ट्क्यापेक्षा जास्त असावे. हिमोग्लोबिनचे प्रमाण ठरविण्यासाठी निळया रंगाचा कॉपर सल्फेट द्राव वापरतात. रक्तदात्याच्या बोटातून घेतलेला रक्ताचा थेंब बुडाल्यास हिमोग्लोबिन १२.५ पेक्षा जास्त आहे असे ठरते. रक्तदात्याने आधी किमान तीन महिने रक्तदान केलेले नसावे. हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब किंवा इतर आजार व त्यामधील औषधे चालू असतील तर डॉक्टरी सल्ला घ्यावा. उपाशीपोटी किंवा खाऊन झाल्यावर अर्ध्यातासापर्यंत रक्तदान करु नये. रक्तदात्याची निवड झाल्यावर विशेष निर्जंतुक बॅगेमध्ये ३५०/४५० मि.लि. रक्ते घेतले जाते. या बॅगेमध्ये रक्त गोठू नये म्हणून द्रव आधीच मिसळलेला असतो. रक्त घेण्याच्या क्रियेसाठी सुमारे १० ते १५ मिनिटे इतकाच वेळ लागतो. प्रत्येक रक्तदात्यासाठी डिस्पोझेबल सुई व बॅग असल्यामुळे रक्तदात्यास रक्तदानापासून रोग संक्रमण होण्याची अजिबात भीती नसते. अशी ही रक्ताची बॅग विशिष्ट अशा शीतकपाटात २ ते ६ डिग्री अंश सेंटीग्रेड तापमानाला ठेवली जाते. या शीतकपाटात रक्त ३५/४२ दिवस खराब न होता राहू शकते.
रक्तदात्याच्या रक्तावर व्ही.डी.आर.एल(VDRL), एच. आय. व्ही.(HIV), हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी, मलेरिया आदी चाचण्या केल्या जातात. या सर्व चाचणीद्वारा योग्य ठरवलेले रक्त रुग्णासाठी वापरले जाते. निरोगी रक्तदात्याचे समगटाचे रक्त व रुग्णाचे रक्त यांच्यामध्ये क्रॉस मॅचिंगच्या चाचण्या केल्या जातात. मेजर क्रॉसमॅचिंगमध्ये रक्तगदात्याच्या लालपेशी रुग्णाच्या सिरम (रक्तागतील द्रव) सह, तर मायनर क्रॉसमॅचिंगमध्ये रक्तदात्याचा सिरम रुग्णाच्या लालपेशींबरोबर मिसळला जातो. क्रॉसमॅचिंगमधील दोन्ही नमुने सूक्ष्मदर्शकाखाली तपासले जातात.
सुदृढ मनुष्याच्या शरीरात साधारणपणे ५ ते ६ लीटर रक्त वहात असते. रक्तदानाच्यावेळी त्यातील ३५०/ ४५०मि. ली. एवढेच रक्त घेतले जाते. पुढील ४८ तासात संपूर्ण रक्त व रक्तघटक पूर्ववत शरीरात तयार होते. रक्तदानानंतर ताबडतोब नेहमीचे कामकाज करु शकतो. त्यामुळे रक्तदानाविषयी कोणताही भयगंड न बाळगता प्रत्येक निरोगी व्यक्तीने निरपेक्ष रक्तदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे. निरोगी रक्तदाता दर तीन महिन्यांनी रक्तदान करु शकतो. मात्र एका व्यक्तीने १०० वेळा रक्तदान करण्यापेक्षा १०० व्यक्तींनी दरवर्षी एकदा रक्तदान केले तर जास्त उपयुक्त ठरते. कारण या १०० व्यक्तीं त्यांच्या आयुष्यात (त्यांनी २५ ते ४० वेळा रक्त्दान केले तर) २५०० ते ४००० बाटल्या रक्त देऊ शकतील. वाढदिवसाला रक्तदान करायला हवे हा संदेश समाजात रुजला तर आपल्या देशात कधीही रक्ताची चणचण भासणार नाही. ज्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता असेल अशा रुग्णाला सौ. मीनाताई रक्तपेढीतून योग्य चाचणीद्वारे ICE PACK च्या मदतीने रक्तपिशवीचे संकलन केले जाते. त्याचप्रमाणे रक्तपेढीत उत्तम दर्जाची शासनमान्यता प्राप्त (TRIMA ACCELL MACHINE) SDP – SINGLE DONOR PLATELET या मशीनची व्यवस्था असून ऑटो टेक्निकलचाही वापर केला जातो.
NO | TYPES | DAYS |
---|---|---|
1 | RBC | 35 TO 42 DAYS |
2 | FFP | 1 YEARS |
3 | PLATELETS | 5 DAYS |
4 | CRYO | 1YEARS |
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.