kridabhavan@prabodhan.org
  • आमच्याविषयी
    • संस्थापकांचा संदेश
    • प्रबोधनची वाटचाल
    • प्रबोधनातून प्रगतीकडे
    • संलग्नता
    • पदाधिकारी व कार्यकारी मंडळ
    • वार्षिक अहवाल
  • उपक्रम
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • प्रबोधन जॉगर्स पार्क
    • सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • प्रबोधन टेनिस अकॅडमी
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रन कॉर्नर
    • औषधपेढी
  • कार्यक्रम
    • प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव
    • मौज कट्टा
    • प्रबोधन व्यासपीठ
    • मराठी भाषा गौरव दिन
    • वर्धापन दिन सोहळा
    • २०-२० क्रिकेट सामने
    • दिवाळी पहाट
    • बुद्धिबळ सामना
    • सावरकर उत्सव
    • समर्थ उत्सव
    • मुंबई महोत्सव
    • जाणता राजा
    • हर्बल वर्ल्ड
    • एस. एस. सी. व्याख्यानमाला
  • पुस्तके
  • छायाचित्र संग्रह
  • डाउनलोड अर्ज
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • ओझोन जलतरण तलाव मेडिकल सर्टिफिकेट
    • प्रबोधन रक्तपेढी
    • प्रबोधन लॉन टेनिस
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रेन कॉर्नर
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव माहिती
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव प्रवेश अर्ज
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव स्विमिंग प्रवेश अर्ज
  • संपर्क
  • मीडिया
  • देणगी आव्हान
  • निविदा
  •   ताज्या घडामोडी

रक्तदानामुळे होणारे फायदे


  1. रक्तदान हे सर्वात महान दान मानले गेले आहे. रक्त‍ प्राप्त करणा-या व्यक्तीलाच त्याचा लाभ होतो असे नाही तर रक्तदान करणा-यालाही अनेक बाबतीत फायदा होतो.
    रक्तदानामुळे तुमच्या रक्ताची नियमितपणे तपासणी होते.
  2. रक्तदानामुळे तुम्हाला तुमचा रक्तगट कळू शकतो. कारण रक्तदानाचे कार्डवर रक्तगट लिहिलेला असतो.
  3. रक्तदानामुळे मनुष्याचे हृदय आरोग्यपूर्ण बनते. कारण शरीरातील अतिरिक्त लवण (मीठ) रक्तदानाद्वारे निघून जाते.
  4. रक्तदान करणाऱ्यांना जे रक्तदाता कार्ड मिळते, त्यामुळे तुम्हाला कधीही आपत्कालीन गरज पडल्यास रक्त मिळु शकतॆ.

रक्तदानासंबंधी माहिती खालीलप्रमाणे....

१) स्वत:चे रक्त स्वत:साठी वापरता येते हे खरे का ?

होय.   ही बाब १००% खरी आहे. ज्या व्यक्तीची शस्त्रक्रिया पूर्वनियोजित असते व ती व्यक्ती या आजारा व्यतिरिक्त निरोगी असते त्यांच्यासाठी स्वत:चे रक्त स्वत:साठी वापरता येते.

२) स्वत:चे रक्त स्वत:साठी वापरण्याची पध्दत कशी आहे ? ही पद्धत दोन प्रकारे वापरता येते.

१) शस्त्रक्रिया ठरलेल्या तारखेच्या १ महिना अगोदरपासून रक्त घेण्यास सुरुवात करतात.एका आठवड्याच्या अंतराने ४ बाटल्या जमा करण्यात येतात व शस्त्रक्रियेच्या दरम्यान त्या     वापरतात. दर तीन महिन्याच्या अंतराने रक्तदान करावे हा सर्वसाधारण नियम या रक्तदात्यांना लागू होत नाही. या कालावधीत लोहतत्त्वाच्या गोळ्या सुरु करणे आवश्यक असते.

२) शस्त्रक्रियेच्या थोड्यावेळापुर्वी शरीरातून २ बाटल्या रक्त काढण्यात येते. त्याऐवजी सलाईन भरण्यात येऊन शस्त्रक्रियेस सुरुवात केली जाते. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या दरम्यान वाहून     जाणारे रक्त पातळ होते. शस्त्रक्रिया संपल्यावर पूर्वी काढलेले रक्त रुग्णास परत भरण्यात येते.

३) स्वत:चे रक्त स्वत:साठी वापरण्याचे फायदे कोणते ?

१) मुख्य म्हणजे क्रॉस मॅचिंगची चिंता नसते. दुस-र्याच्या रक्ताच्या माध्यमातून एडस्‌, कावीळ, गुप्तरोग, मलेरिया इत्यादी रोग होण्याची श्क्यता असते. परंतु स्वत:चे रक्त स्वत:साठी     वापरल्यास हा धोका टळतो.

२) त्याशिवाय इतरांचे रक्त वापरल्यास कधी कधी रिऍक्शन येण्याची भिती असते. कधी कधी ही रिऍक्शन प्राणघातक ठरू शकते. त्यामुळे स्वत:साठी वापरल्यामुळे हा धोका टळतो.

४) रक्तपेढीतून रुग्णांसाठी रक्त आणताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या

१) रुग्णाचा रक्तगट माहिती असेल तर त्या गटाचे रक्त रक्तपेढीत आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी.आर एच निगेटिव्ह रक्तगट दुर्मिळ असल्यामुळे रक्तपेढीत असेलच हे सांगता येत     नाही.

२) रुग्णाच्या रक्ताचा नुकताच काढलेला नमुना रक्तपेढीत क्रॉसमॅचिंगसाठी घेऊन जावा. त्यावर रुग्णाचे नाव लिहिलेले असावे. सहा महिन्यापर्यंतच्या छोट्या बाळासाठी रक्ताची गरज     लागल्यावर बाळाबरोबर आईचाही रक्ताचा नमुना न्यावा. रक्तपेढीतून रक्त मिळविण्यासाठी रक्तसंबंधीत डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक असते. त्याशिवाय रक्त दिले जात नाही.

३) रक्तपेढीच्या नावे लिहिलेली डॉक्टरांची चिठ्ठी नेण्यास विसरु नये. त्यामध्ये रुग्णाचे नाव, किती प्रमाणात रक्त हवे किंवा रक्ताचा कोणता घटक हवा हे नमूद केलेले असते.

४) व्हॉलेंटरी डोनेशन कार्ड देऊन रक्त हवे असेल तर शक्यतो ज्या रक्तपेढीचे कार्ड असेल तेथे जाऊन रक्त घ्यावे. असे कार्ड फार जुने नसावे. वर्षा - दोन वर्षाचे असावे.

५) रक्तपेढीतून रक्ताची बॅग रुग्णालयात नेताना बर्फात घालून न्यावी, नाहीतर रक्त खराब होऊ शकते. रक्ताची पिशवी रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर ताबडतोब डॉक्टर किंवा जबाबदार     स्टाफच्या हातात द्यावी.

रक्तदान शिबीर आयोजनासाठी (रक्तपेढी)

१) प्रत्येक शिबिरात किमान ५० ते १०० रक्तदाते उपलब्ध होणे आवश्यक आहे.

२) रक्तदात्यांची शिबिरपूर्व नोंदणी एक आठवडापुर्वी करुन रक्तपेढीच्या कर्यालयात यादी द्यावी. नोंदणी अर्ज रक्तपेढीत मिळतील.

३) रक्तदानाचा दिवस व स्थळ ‘रक्तपेढी’ संचालकांशी चर्चा करुन ठरवावा.

४) रविवार किंवा सार्वत्रिक सुट्टीचा दिवस सर्वोतम असावा.

संयोजकांनी उपलब्ध करावयाच्या सुविधा

१) शाळा, महाविद्यालयाच्या ४ खोल्या / सभागृह किंवा समाजमंदीर असावे.

२) पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, दिवे, पंखे, २० खुर्च्या, ४ टेबले आणि १० कर्यकर्त्यांची सोय असावी.

रक्तदात्यांसाठी / कार्यकर्त्यांसाठी चहा / कॉफी

प्रबोधन रक्तपेढीतर्फ़े उपलब्ध होणाऱ्या सुविधाः रक्तदात्यांसाठी कॉट्स,बेड्स,बेडशीट्स,उशा रक्तदानासाठी आवश्यक अधिकारी व कर्मचारी डॉक्टर,तंत्रज्ञ व कर्मचारी वर्ग.

थॅलेसेमिया

सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढीच्यावतीने सिध्दार्थ महापालिका रुग्णालयात ८ ते १४ वर्षाच्या मुलांसाठी थॅलेसेमिया केंद्र उभारले आहे. सध्या संस्थेने रक्तसंक्रमणासाठी १० मुलांना दत्तक घेतले आहे. त्यासाठी सुसज्ज असे पूर्णतः वातानुकूलित रुमच्या सुविधासह रक्तसंक्रमणासाठी एकाचवेळी दोन मुलांसाठी अत्यंत आरामदायक खुर्चांची सोय केली आहे. ही सुविधा आठवड्यातून तीन दिवस उपलब्ध आहे. ही सेवा विनामूल्य स्वरुपात रुग्णांना पुरविली जाते.

उपनगरातून प्रत्येकवेळी रुग्णांना रुग्णालयात नेणे विशेषतः लहान मुलांना व विद्यार्थी दशेतील रुग्णांना फारच गैरसोयीचे होते. त्यांचा पुर्ण दिवस त्यासाठी घालवल्यामुळे शाळेत अनुपस्थिती लागते. पण जवळ केंद्र असेल तर ही गैरसोय होणार नाही. महानगरपालिकेने सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढीला दिलेल्या जागेत सुरुवातीस जोगेश्वरी ते बोरिवली या विभागातील फक्त ८ ते १४ वर्षाच्या रुग्णांसाठी थॅलेसेमिया केंद्र सुरु केले आहे. या केंद्रात एकाचवेळी २ रुग्णांना रक्तसंक्रमण करण्याची सोय केली आहे. अत्यंत आरामदायी आसनावर प्रशस्त वातानूकुलित कक्षामध्ये दुरचित्रवाणी संचाच्यासमोर बसून या रुग्णांमध्ये रक्तसंक्रमण केले जाईल. आठवड्यातून २ ते ३ वेळा ही सोय त्यांना देण्यात येणा-या रक्ताची योग्य जुळणी होते की नाही यांच्या चाचण्या घेतल्या जातील. थॅलेसेमिया केंद्र हे उपनगरातील लहान रुग्णांना अत्यंत सोयीचे ठरणार आहे.

संपर्क : ०२२-२८७९७५८६ / ८७

© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.