kridabhavan@prabodhan.org
  • आमच्याविषयी
    • संस्थापकांचा संदेश
    • प्रबोधनची वाटचाल
    • प्रबोधनातून प्रगतीकडे
    • संलग्नता
    • पदाधिकारी व कार्यकारी मंडळ
    • वार्षिक अहवाल
  • उपक्रम
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • प्रबोधन जॉगर्स पार्क
    • सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • प्रबोधन टेनिस अकॅडमी
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रन कॉर्नर
    • औषधपेढी
  • कार्यक्रम
    • प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव
    • मौज कट्टा
    • प्रबोधन व्यासपीठ
    • मराठी भाषा गौरव दिन
    • वर्धापन दिन सोहळा
    • २०-२० क्रिकेट सामने
    • दिवाळी पहाट
    • बुद्धिबळ सामना
    • सावरकर उत्सव
    • समर्थ उत्सव
    • मुंबई महोत्सव
    • जाणता राजा
    • हर्बल वर्ल्ड
    • एस. एस. सी. व्याख्यानमाला
  • पुस्तके
  • छायाचित्र संग्रह
  • डाउनलोड अर्ज
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • ओझोन जलतरण तलाव मेडिकल सर्टिफिकेट
    • प्रबोधन रक्तपेढी
    • प्रबोधन लॉन टेनिस
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रेन कॉर्नर
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव माहिती
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव प्रवेश अर्ज
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव स्विमिंग प्रवेश अर्ज
  • संपर्क
  • मीडिया
  • देणगी आव्हान
  • निविदा
  •   ताज्या घडामोडी




प्रबोधन गोरेगावने गोरेगावकरांसाठी मौज प्रकाशन गृह यांच्या संयुक्त विद्यमाने मौज कट्टा या नवीन उपक्रमाची सुरुवात दि. २७ डिसेंबर २०१८ रोजी केली. मौज कट्टाचा प्रारंभ करण्याचा मुख्य हेतु म्हणजे रसिक प्रेक्षकांना क्षणभर का होईना सुखद आनंद मिळाल्याचा अनुभव. नव्या रंगात – नव्या ढंगात, नव्या लयीत – नव्या सुरात अनाकलनीय असा विविध विषयावरील माहितीचा खजिना प्रेक्षकांना घेऊन आला आहे ‘मौज कट्टा’. मौज प्रकाशन गृह आणि प्रबोधन गोरेगाव आयोजित मौज कट्टावर कार्यक्रमाचे उत्तमरित्या सादरीकरण झाले. ‘भाई’, व्यक्ति आणि वल्ली’ या मराठी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी सहभागी असामी कलाकारांची गप्पांची मैफिल रंगली होती. रसिक प्रेक्षकांचा वाढता सहभाग पाहून प्रबोधन गोरेगावची लोकप्रियता वाढत असल्याचा प्रत्यय या मौज कट्टयाच्या निमित्ताने अनुभवयास मिळाला. गोरेगावकर आणि पश्चिम उपनगरातील रसिक प्रेक्षकांसाठी दर महिन्याच्या तिस-या शुक्रवारी वा शनिवारी सायंकाळी मौज कट्ट्याचे नियमित आयोजन करण्यात येणार आहे.


मौज प्रकाशन गृह आणि प्रबोधन गोरेगाव आयोजित गुरुवार दि. २७ डिसेंबर, २०१८ रोजी गोरेगाव पुर्व येथे मौज कट्टावर ‘भाई’ चित्रपटाच्या कलाकारांशी खास गप्पांचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र भूषण पु. ल. देशपांडे या अलौकिक व्यक्तिमत्वाचे पैलू ‘भाई’ व्यक्ती आणि वल्ली, या चित्रपटाद्वारे उलगडून दाखविणारे असामी कलाकारांनी मौज कट्ट्यावर रसिक प्रेक्षकांसोबत मनमुराद गप्पांचा आस्वाद घेतला. प्रबोधन गोरेगावतर्फे मौज कट्टा या नवीन उपक्रमाची सुरुवात झाल्याचे संस्थेचे प्रमुख कार्यवाहक श्री. सुनिल वेलणकर यांनी घोषित केले. सुत्रसंचालकाची धुरा सांभाळणारे मराठी कलाकार श्री. अतुल परचुरे यांनी दिलखुलास अंदाजात प्रेक्षकांच्या नजरा खिळवून घेतल्या. मौज प्रकाशन गृह आणि प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष श्री. नितिन शिंदे यांच्या हस्ते ‘भाई’ या मराठी चित्रपटाच्या सर्व कलाकारांचे पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. ४ जानेवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणा-या ‘भाई’ व्यक्ती आणि वल्ली, चित्रपटाचे निर्माते वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि महेश मांजरेकर मुव्हीज प्रस्तुतकर्ता आहे. या चित्रपटाच्या पुर्वार्धाप्रमाणेच उत्तरार्धही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवुडप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीत आगामी चित्रपटांचे प्रमोशन जोरदार सुरु असल्याचे भाई चित्रपटातील असामी कलाकारांच्या गप्पांच्या मैफिलीतून प्रेक्षकांना अनुभवायला मिळाले.या कार्यक्रमाची वाढती लोकप्रियता लक्षात घेता यावेळी असंख्य लोकांची उपस्थिती मौज

क्ट्टयावर लाभली. कलाकारांनी ‘भाई’ या चित्रपटाद्वारे आलेला अनुभव व्यक्त करताना रसिक प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळला. पु. ल. देशपांडे यांचा संपुर्ण जीवनपट हा चित्रपटातील सहभागी कलाकारांची झलक पाहताना प्रेक्षकांनाही नवा अनुभव येणार आहे. निर्माता महेश मांजरेकर यांनी पु. ल. देशपांडेच्या जीवनावर अभ्यास करताना त्यांच्या सवयी आदी बाबींचा अभ्यास करताना आलेला अनुभव रसिक प्रक्षेकांसमोर व्यक्त केला. पुल्यांची भुमिका साकारणारे श्री. सागर देशमुख यांनी पुल्यांची भुमिका प्रत्यक्षात साकारणे हे त्यांच्यासाठी चॅंलेज होते. पु. ल. यांची श्री. विजय केंकरे यांनी साकारलेली वार्धक्याची भुमिका करताना नव्याने आलेला अनोखा अनुभव तसेच पु. ल. देशपांडे यांचे पुतण्या श्री. जयंत देशपांडे यांनी पु. ल. यांच्यासह अनुभवलेले मजेदार किस्से रसिकांसमोर व्यक्त केले. वायकॉम १८ मोशन पिक्चर्स प्रस्तुत बिजनेस हेड श्री. निखिल साने यांनीही मराठी चित्रपटांबाबत आपले मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे श्री. रत्नाकर मतकरी यांनी पु.ल. देशपांडे यांच्यासोबत घालवलेले दिवस प्रेक्षकांसमोर व्यक्त केले. संगीतकार श्री. स्वानंद किरकिरे यांनी गीत सादर करुन प्रेक्षकांना खुश केले. कार्यक्रमाची सांगता प्रेक्षकांच्या समाधानकारक प्रश्नोत्तरांनी झाली. अशाप्रकारे गोरेगावकारांचा मौज कट्ट्यावराचा दिवस उपस्थित दिग्गज कलाकारांसोबत मौजेत गेला.

© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.