प्रबोधन गोरेगाव मध्ये गेल्या चार दशकापासून योगाभ्यास से प्रशिक्षण वर्ग चालविले जात आहेत. भारताच्या प्राचीन काळापासून सुरु असलेल्या योगा ला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी आहे. युनेस्को ने योगअभ्यास ला आंतरराष्ट्रीय दर्जा दिला आहे. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. युज या संस्कृत शब्दापासून ‘योग’ हा शब्द रुढ झाला आहे. योगा ही प्राचीन स्वास्थ्य कला आहे , जी तज्ज्ञांनी अनेक शतकांपासून विकसित केली आहे. योगा केल्यामुळे व्यक्तीविकास, मनःशांती, अनेक व्याधी यांच्यावर उपचार इत्यादी दृष्टींनी अत्यंत लाभदायक ठरले आहे. लोकांचे बिघडते शरीर स्वास्थ्य, अनियोजित खाण्याच्या वेळा आणि धावपळीची जीवनशैली लक्षात घेऊन प्रबोधन गोरेगावने गोरेगावकरांच्या शारिरीक तसेच मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी प्रबोधन क्रीडाभवनामध्ये ‘योगा सेंटर’ सुरु आहे. अत्यंत माफक दरात योगाचे प्रशिक्षण दिले जाते. क्रीडाभवनमध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी ६ ते १०.३० या वेळेत एकूण ४ बॅचमध्ये योग प्रशिक्षणाचे वर्ग सुरु आहेत. यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र अशी बॅचची सोय केली आहे. अनिरुध्द कुलकर्णी आणि अभिजीत कुलकर्णी अशा अनुभवी प्रशिक्षकांद्वारे नागरिकांना उत्तम प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षण वर्गात तब्बल १०० पेक्षा जास्त नागरिक सहभागी होतात. आसनांबरोबर विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचा शास्त्रोक्त दृष्टीकोन देखील समजावून सांगितला जातो, तो त्यांना सुदृढ जीवनशैली व्यतीत करण्यास लाभदायक ठरतो.
सुविधा | व्यावसायिकांकडून योगा प्रशिक्षण |
---|---|
वेळापत्रक | ६.०० ते ८.०० (सकाळी) सोमवार ते शुक्रवार (पुरुष आणि महिला एकत्र) |
७.०० ते ८.०० | |
८.३० ते ९.३० (सकाळी) सोमवार ते शुक्रवार (फक्ति महिला) | |
९.३० ते १०.३० | |
नियम | सहभागी व्यक्तींनी प्रशिक्षण सत्रात नियमितपणे हजर रहावे. |
सहभागी व्यक्तींनी प्रशिक्षणसत्रातील शिस्तीचे पालन करावे. | |
प्रवेशाचे हक्क प्रबोधन गोरेगाव राखून आहे. | |
प्रवेश शुल्क प्रशिक्षणाच्या प्रारंभी भरण्यास यावे. |
संपर्क : ०२२-२८७९७५८० / ८१
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.