कराटे
प्रबोधन क्रीडा भवनात गेली २१ वर्षे कराटे प्रशिक्षणाचे वर्ग नियमित सुरु आहेत. मुख्य प्रशिक्षक श्री. सीताराम चव्हाण, सहाय्यक प्रशिक्षक श्री. विद्यासागर सिंघराजू यांच्या मार्गर्शनाखाली जवळपास १५० पेक्षा जास्त विद्यार्थी कराटे या क्रीडा प्रकारचे प्रशिक्षण घेत आहेत. ४० फूट x ४० फूट या आकाराच्या रबराच्या मॅटवर कराटे प्रशिक्षण दिले जाते. प्रबोधन संस्थेने शोतोकन ग्लोबल जपान कराटे अँकेडमीची संलग्नता स्वीकारुन मागील काही वर्षात अनेक स्पर्धांचे आयोजन केले. संस्थेच्या अनेक खेळाडूंनी स्पर्धांमध्ये भरघोस बक्षिसे मिळवली आजपर्यंत प्रशिक्षण केंद्रातील ६५ खेळाडूंना ब्लॅक बेल्ट मिळाला आहे. कराटेच्या प्रचार व प्रसारासाठी दरवर्षी स्पर्धा आयोजित करण्याचा संस्थेचा मानस आहे.
मल्लखांब
मल्लखांब हा एक साहसी खेळ म्हणून ओळखला जातो. या खेळामुळे मनुष्याच्या सर्वांगाला व्यायाम मिळतो. या क्रीडा प्रकाराच्या प्रचार व प्रसारासाठी प्रबोधन नेहमीच अग्रेसर राहिली आहे. सध्या छत्रपती पुरस्काराने सन्मानित श्री. दत्ताराम दुदम, श्री. मंदार आसेगावकर व राष्ट्रीय खेळाडू कु. नीलम राणे प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळत आहेत. मल्लखांब या खेळाच्या प्रसार व प्रचारासाठी संस्था स्वताः प्रयत्नशील असून त्या निमित्ताने भविष्यात विविध चर्चासत्रे व स्पर्धांचे आयोजन संस्थेतर्फे केले जाणार आहे.
योगाभ्यास वर्ग
आताच्या आधुनिक व धकाधकीच्या जीवनशैलीत योगाभ्यासास फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे. प्रबोधन क्रीडभवनाच्या निर्मितीपासूनच योगाभ्यास वर्ग सुरु केलेले आहेत. प्रबोधन क्रीडाभवनमध्ये सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी ६ ते १०.३० या वेळेत एकूण ४ बॅचमध्ये योग प्रशिक्षणाचे वर्ग सुरु आहेत. श्री. अनिरुध्द कुलकर्णी, श्री. अभिजीत कुलकर्णी व सौ. उषा नागराजन हे प्रशिक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत. जवळपास १०० पेक्षा जास्त नागरिक या प्रशिक्षण वर्गात सहभागी होतात.
क्रिकेट
क्रिकेट हिंदुस्थानातील सर्वात लोकप्रिय खेळ. प्रबोधन क्रिडाभवनाच्या मैदानात १९९२ पासून क्रिकेट या लोकप्रिय खेळाचे प्रशिक्षण मंगळवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ९, दुपारी ३ ते ५ या वेळेत सुरु आहेत. प्रबोधन संस्था मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत. या संस्थेस एमसीएचे मोलाचे सहकार्य मिळते. आतापर्यंत १२५ पेक्षा जास्त खेळाडू सकाळ, संध्याकाळ या दोन सत्रात क्रिकेटचे प्रशिक्षण घेत आहेत. एमसीए मान्यताप्राप्त प्रशिक्षक श्री. नीलेश भोसले (लेवल ‘बी’ कोच) व त्यांचे सहकारी चांगले क्रिकेटपटू घडविण्याचे काम गेली 3 वर्षे करीत आहे.क्रिकेट प्रशिक्षणासाठी चांगल्या सुविधा व उत्तम दर्जाचे क्रीडांगण उपलब्ध व्हावे यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. क्रिकेट प्रशिक्षणार्थींसाठी अनेक सराव सामने आयोजित करण्यात येतात. संस्थेचा संघ मुंबईतील नामांकित क्रिकेट स्पर्धात सहभागी होत असतो.
भरतनाट्यम
पद्मभूषण डाँ. कनक रेळे यांच्या नालंदा नृत्य अँकेडमीशी संलग्नता स्वीकारुन प्रबोधन संस्थेने १९९५ सालापासून वर्ग सुरु केले आहेत. शास्त्रशुध्द नृत्याची आजच्या पिढीला ओळख करुन देणे हाच प्रबोधन क्रीडाभवनाचा उद्देश आहे. सौ. संध्या दामले याच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी जवळपास १७० मुली भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण घेतात. संपूर्ण भरतनाट्यम प्रशिक्षणाचा कालावधी हा ७ वर्षाचा असून प्रशिक्षण कालावधी पूर्ण करणा-या नृत्यांगना आपली कला आरंगत्रम् या कार्यक्रमाच्या माध्यामातून रसिकांसमोर सादर करतात. आतापर्यंत ८० नृत्यांगनांनी आरंगेत्रम हा कार्यक्रम सादर केला. दरवर्षी वार्षिक परीक्षा घेऊन उत्तीर्ण विद्यार्थिनींना नालंदा नृत्य अँकेडमी मुंबई यांचे प्रमाणपत्र दिले जाते. पालकांनी ठराविक कालावधीनंतर प्रशिक्षण वर्गात निमंत्रित करुन त्यांच्यासमोर नृत्यकलेचे सादरीकरण केले जाते. २०१६ पासून दरवर्षी नृत्यदिन कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थी नृत्यांगनांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणे हा मुख्य हेतू आहे.
संपर्क : ०२२-२८७९७५८० / ८१
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.