मल्लखांब या भारतीय क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण प्रबोधन क्रीडाभवनाच्या माध्यमातून गेली २४ वर्षे सातत्याने सुरु आहे. वर्षभर सुरु असणा-या प्रशिक्षण वर्गास जवळपास ६० – ७० विद्यार्थी सहभागी होतात. सध्या छत्रपती पुरस्काराने सन्मानित श्री. दत्ताराम दुदम, श्री. मंदार आसेगावकर, श्री. तन्मय आसेगावकर व राष्ट्रीय खेळाडू कुमारी निलम राणे हे प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळत आहेत. मल्लखांब या खेळाच्या प्रसार व प्रचारासाठी संस्था स्वतः प्रयत्नशील असून त्या निमित्ताने भविष्यात विविध चर्चासत्र व स्पर्धांचे आयोजन संस्थेतर्फे केले जाणार आहे. गेली अनेक वर्षे संस्था उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रशिक्षण शिबिर आयोजित करते. आज संस्थेच्यावतीने कार्यकारिणी सदस्य श्री. महेश करमरकर हे उपक्रम प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. संस्था दर महीन्याला प्रशिक्षक व पालकांसोबत बैठक घेऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न करीत आहे. कुमारी भक्ती मटकर, मिहीरा लोहकरे, संस्कार ठाकूर, निमिष लोहकरे, स्वराज प्रधान यासारखे नवोदित खेळाडू प्रशिकांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यात नक्कीच उठावदार कामगिरी करतील. कु. भक्ती मटकर हिला भाऊसाहेभ रानडे नवोदित मल्लखांब स्पर्धेमध्ये तृतीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रबोधन गोरेगाव मुंबई उपनगर जिल्हा मल्लखाब संघटनेशी गेली २५ वर्षे संलग्न आहे.
सुविधा | व्यावसायिकांकडून मल्लखांब प्रशिक्षण |
---|---|
वेळापत्रक | ७.०० ते ८.३० (संध्याकाळ) सोमवार, बुधवार, शुक्रवार |
नियम | किमान वय ६ वर्षे |
सहभागी व्यक्तींनी प्रशिक्षण सत्रात नियमितपणे हजर रहावे. | |
सहभागी व्यक्तींनी प्रशिक्षणसत्रातील शिस्तीचे पालन करावे. | |
प्रवेशाचे हक्क प्रबोधन गोरेगाव राखून आहे. | |
प्रवेश शुल्क प्रशिक्षणाच्या प्रारंभी भरण्यास यावे. |
संपर्क : ०२२-२८७९७५८० / ८१
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.