प्रबोधन क्रीडाभवनाच्या निर्मितीपासून खो-खो प्रशिक्षण वर्गास सुरुवात झाली. आधुनिक व पारंपारिक खेळांचा प्रसार व प्रचार करणे हे प्रमुख उद्दिष्ट असणा-या प्रबोधन गोरेगावने ‘खो-खो’ प्रशिक्षण देण्याची जबाबदारी घेतली. श्री. शशांक कामत यांनी सुरुवातीपासून खो – खो प्रशिक्षण वर्गाची प्रशिक्षणाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आहे. आज त्यांच्यासोबत त्यांचे सह-प्रशिक्षक खेळाडू श्री. गणेश सावंत व श्री. तुषार मोरे आणि निखिल कासले यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण दिले जाते.
‘प्रबोधन क्रीडाभवन मुंबई उपनगर जिल्हा खो - खो संघटनेशी संलग्न आहे. खो-खो खेळाच्या स्थानिक साखळी स्पर्धा भारतामध्ये आयोजित केल्या जातात. यामध्ये राष्ट्रीय चॅम्पियनशिप, आंतरशालेय चॅम्पियनशिप, जिल्हास्तरीय चॅम्पियनशिप यांचा समावेश होतो. प्रबोधनच्या विद्यार्थ्यांच्या उज्वल यशाबद्दल प्रबोधन गोरेगाव संस्थेला अभिमान आहे. प्रबोधन संस्थेचा खो-खो खेळाडू गणेश सावंत याचा ‘एकलव्य पुरस्कार’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. याचप्रकारे तुषार मोरे, सत्यम चाळके, अभिजित करंजकर, पल्लवी वेंगुर्लेकर, सागर घाग अशा जवळपास अनेक विद्यार्थ्यांनी राज्यशालेय राष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धांत यश प्राप्त केले आहे. तसेच ‘मुंबई महानगरपालिका महापौर चषक’तर्फे तृतीय क्रमांकाचे फिरता चषक आणि रोख रक्कम देऊन खो – खो खेळाडूच्या संघाने यश प्राप्त केले. नुकत्याच झालेल्या CM चषक खो – खो स्पर्धेत प्रबोधन क्रीडाभवनाच्या विजयी संघाला प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. आजपर्यंत प्रबोधन संस्थेचे जवळपास ५० पेक्षा जास्त खेळाडूंची निवड जिल्हा, विद्यापीठ तसेच राज्य संघात झाल्याचे नमुद करताना आनंद वाटतो.
सुविधा | व्यावसायिकांकडून खो-खो प्रशिक्षण |
---|---|
वेळापत्रक | ७.०० ते ९.०० (संध्याकाळ) |
नियम | सहभागी व्यक्तींनी प्रशिक्षण सत्रात नियमितपणे हजर रहावे. |
सहभागी व्यक्तींनी प्रशिक्षणसत्रातील शिस्तीचे पालन करावे. | |
प्रवेशाचे हक्क प्रबोधन गोरेगाव राखून आहे. | |
प्रवेश शुल्क प्रशिक्षणाच्या प्रारंभी भरण्यास यावे. |
संपर्क : ०२२-२८७९७५८० / ८१
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.