प्रबोधन गोरेगावने सुरुवातीपासूनच गोरेगाव व मुंबई उपनगरातील रहिवाशांना कराटे प्रशिक्षण मिळावे या उद्दीष्टाने प्रबोधन क्रीडाभवनात प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. कराटे या खेळाचा प्रसार करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. विद्यार्थी क्रियाशील राहण्यासाठी कराटे हा क्रीडाप्रकार स्व संरक्षण करण्यास उपयुक्त आहे. आजच्या काळात विद्यार्थांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्या संपूर्ण भावी आयुष्यात यशस्वी होण्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे, जेणेकरुन उद्याचा भारत अधिक सक्षम बनेल. प्रबोधन गोरेगाव ‘शोटोकान ग्लोबल जपान कराटे अकादमी’ शी संलग्न आहे. कराटे चे प्रशिक्षण श्री. सिताराम चव्हाण (सिक्स डिगरी ब्लॅक बेल्ट) हे जपान कराटे संस्थेचे तांत्रिक व्यवस्थापक आहेत. त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शन व प्रात्यक्षिक प्रशिक्षणामुळे अनेक विद्यार्थांनी कराटे क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त केले आहे. दरवर्षी जवळपास ५० विद्यार्थी जपान कराटे संस्थेकडून आयोजित आंतरराज्य स्पर्धेत यश प्राप्त करतात. संस्थेच्या विद्यार्थांना राष्ट्रीय कराटे कॅम्पमधून श्री. नोरीओ कावासाकी यांच्याकडून दर्जेदार प्रशिक्षण लाभले आहे. त्याशिवाय प्रबोधन गोरेगावतर्फे विद्यार्थांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी दिली जाते. जपान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, मलेशिया, दुबई, मॉरिशस इत्यादि देशातून खेळाडूंना स्पर्धा आणि ट्रेनिंगसाठी पाठवले जाते.
प्रबोधन गोरेगाव संस्थेचा कराटे चॅम्पियन मास्टर साहिल देसाई ‘महापौर चषक’ मध्ये प्रबोधनच्या विद्यार्थ्यांनी ३२ पदके मिळवली आहेत. श्रीलंका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत इंद्रजीत मोकाशी, विदयासागर सिंग राजू, साहिल बिजूर या मुलांनी ५ सुवर्ण पदक व १ कास्य पदक पटकावले. दिव्या रेवणकर या विद्यार्थीने सॅप गेम कराटे स्पर्धेत कास्य पदक, दिक्षा शेट्टीला नॅशनल गेम कराटे स्पर्धेमधून कास्य पदक, भार्गवी संखेला पाच वेळा सुवर्ण पदक अशाप्रकारे कराटे चॅम्पियन विद्यार्थांनी मेहनतीच्या आणि उत्तम प्रशिक्षणाच्या जोरावर यश मिळाले आहे. येथे विद्यार्थांना माफक दरात दर्जेदार कराटे प्रशिक्षण दिले जाते. कराटेची ४ महिन्यांनी परिक्षा घेतली जाते तर ब्लॅक बेल्टची परिक्षा वर्षातून एकदाच घेऊन शोटोकान ग्लोबल जपान कराटे अकादमीतर्फे प्रमाणपत्र दिले जाते. त्याचप्रमाणे कराटे प्रशिक्षणासाठी श्री. सुभाष देसाई यांच्या आमदार फंडातून मुलांना कराटे प्रशिक्षण सोयीस्कररित्या सराव करता यावा याकरिता ४० mm, १ बाय १ चे मॅटची सुविधा केली आहे. सर्व वयोगटातील मुला – मुलींचा वाढता सहभाग तसेच त्यांची जिंकण्याची जिद्द हीच प्रबोधन गोरेगावच्या यशाचा झेंडा आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकत आहे.
सुविधा | व्यावसायिकांकडून कराटे प्रशिक्षण |
---|---|
वेळापत्रक | ७.०० ते ९.०० (संध्याकाळ) मंगळवार, गुरुवार, शनिवार. |
नियम | किमान वय ६ वर्षे |
सहभागी व्यक्तींनी प्रशिक्षण सत्रात नियमितपणे हजर रहावे. | |
सहभागी व्यक्तींनी प्रशिक्षणसत्रातील शिस्तीचे पालन करावे. | |
प्रवेशाचे हक्क प्रबोधन गोरेगाव राखून आहे. | |
प्रवेश शुल्क प्रशिक्षणाच्या प्रारंभी भरण्यास यावे. |
संपर्क : ०२२-२८७९७५८० / ८१
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.