क्रिकेट भारतातील क्रिकेटप्रेमींचा लोकप्रिय व आवडता असा खेळ म्हणजे ‘क्रिकेट’. क्रिकेटची आवड ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यत सगळ्यांना आहे. क्रिकेट जगतात सर्वांचा आवडता खेळाडू म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर सारखा उत्तम खेळाडू होण्याची मनोकामना ही प्रत्येक क्रिकेटप्रेमीची असते परंतु त्यांची ही इच्छा काही कारणास्तव पुर्ण होऊ शकत नाही. याला कारण म्हणजे क्रिकेट खेळाचे योग्य मार्गदर्शन मिळत नाही. तसेच खेळण्यासाठी लागणारे मैदान नसल्यामुळे मुंलाना गल्लीत खेळावे लागते. मुंबई च नव्हे तर महाराष्ट्रात युवा क्रिकेटपटू निर्माण व्हावेत या ध्येयाने ‘प्रबोधन गोरेगाव’ क्रिकेट खेळाचे व्यावसायिक प्रशिक्षकांकडून उत्तम दर्जाचे प्रशिक्षण सुरु केले. १९९२ मध्ये मुंबई उपनगरातील रहिवाशांना दर्जेदार क्रिकेट प्रशिक्षण देता यावे यासाठी प्रबोधन क्रिडाभवन येथे खास प्रशस्त क्रिकेट मैदान विकसित करण्यात आले. क्रिकेटच्या प्रशिक्षण वर्गात दरवर्षी सुमारे शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील सुमारे १२५ पेक्षा जास्त खेळाडू सकाळ, संध्याकाळ या दोन सत्रात प्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत. गेल्या अनेक वर्षामध्ये प्रबोधन गोरेगावच्या क्रिकेट संघ खेऴाडूंनी विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होऊन अनेक विजय संपादित केले आहेत. तसेच विविध क्रिकेट स्पर्धामध्ये प्रबोधन गोरेगावला अनेक विजेतेपद पटकावून दिले आहेत. येथे खेळाडूंना जे ज्ञान प्राप्त होते ते त्यांच्या क्रिकेट प्रतिभेसाठी नव्हे तर क्रीडा जीवनामध्येही अनेक ध्येय प्राप्त करण्यास उपयुक्त ठरतात.
सुविधा | व्यावसायिकांकडून क्रिकेट प्रशिक्षण |
---|---|
वेळापत्रक | ७.०० ते ९.०० सकाळी ( मंगळवार ते शुक्रवार) |
३.०० ते ५.०० संध्याकाळी ( मंगळवार ते शुक्रवार) | |
नियम | किमान वय ८ वर्षे |
सहभागी व्यक्तींनी प्रशिक्षण सत्रात नियमितपणे हजर रहावे. | |
सहभागी व्यक्तींनी प्रशिक्षणसत्रातील शिस्तीचे पालन करावे. | |
प्रवेशाचे हक्क प्रबोधन गोरेगाव राखून आहे. | |
प्रवेश शुल्क प्रशिक्षणाच्या प्रारंभी भरण्यास यावे. |
संपर्क : ०२२-२८७९७५८० / ८१
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.