kridabhavan@prabodhan.org
  • आमच्याविषयी
    • संस्थापकांचा संदेश
    • प्रबोधनची वाटचाल
    • प्रबोधनातून प्रगतीकडे
    • संलग्नता
    • पदाधिकारी व कार्यकारी मंडळ
    • वार्षिक अहवाल
  • उपक्रम
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • प्रबोधन जॉगर्स पार्क
    • सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • प्रबोधन टेनिस अकॅडमी
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रन कॉर्नर
    • औषधपेढी
  • कार्यक्रम
    • प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव
    • मौज कट्टा
    • प्रबोधन व्यासपीठ
    • मराठी भाषा गौरव दिन
    • वर्धापन दिन सोहळा
    • २०-२० क्रिकेट सामने
    • दिवाळी पहाट
    • बुद्धिबळ सामना
    • सावरकर उत्सव
    • समर्थ उत्सव
    • मुंबई महोत्सव
    • जाणता राजा
    • हर्बल वर्ल्ड
    • एस. एस. सी. व्याख्यानमाला
  • पुस्तके
  • छायाचित्र संग्रह
  • डाउनलोड अर्ज
    • प्रबोधन क्रीडाभवन
    • ओझोन जलतरण तलाव
    • ओझोन जलतरण तलाव मेडिकल सर्टिफिकेट
    • प्रबोधन रक्तपेढी
    • प्रबोधन लॉन टेनिस
    • प्रबोधनकार ठाकरे वाचनालय
    • प्रबोधन अभ्यासिका
    • प्रबोधन चिल्ड्रेन कॉर्नर
    • प्रबोधन डायलिसिस सेंटर
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव माहिती
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव प्रवेश अर्ज
    • ४३वा आंतरशालेय क्रिडामहोत्सव स्विमिंग प्रवेश अर्ज
  • संपर्क
  • मीडिया
  • देणगी आव्हान
  • निविदा
  •   ताज्या घडामोडी

Nature

भरतनाट्यम

आजकालच्या पाश्चात्य संस्कृतीची अनेक लोक भारताच्या प्राचीन नृत्य कलांचे ज्ञान मिळवण्यास उत्सुक आहेत. सध्याच्या धावपळीच्या युगात आपली कला जोपासून करिअर करणे हे स्त्रियांसाठी खूप अवघड आहे. त्यातून जर भरतनाट्यमची आवड असेल तर सुनियोजन, नियमित सराव, ताल, लय, शास्त्रीय संगीताची आवड हे नियम सुयोग्यरित्या पाळले तर भरतनाट्यम नृत्यशैलीत यश मिळणे शक्य होते. भरतनाट्यम् शास्त्रात अभिनयदर्पणामध्ये वर्णन केलेले हस्तमुद्राकार, पादभेद, दृष्टिभेद, शिरोभेद, ग्रीवाभेद, मंडलभेद इत्यादी ह्या सर्वांचा वापर नृत्त आणि नृत्यात पूर्णतः नाट्यधर्मी पध्दतीने केला जातो. भारतीय कला व संस्कृती यांचा प्रसार करणे हा प्रबोधन गोरेगावचा मुळ उद्देशांपैकी एक असून १९९५ साली नालंदा नृत्य अँकेडमीच्या सहकार्याने प्रबोधन गोरेगाव संस्थेने प्रबोधन भरतनाट्यम अँकेडमी सुरु केली. भरतनाट्यमचे वर्ग सुरु होऊन जवळपास २३ वर्ष पुर्ण झाले असून सुमारे २८ पेक्षा अधिक आरंगेत्रम् या कार्यक्रमाचे आयोजन केले. सौ. संध्या दामले यांच्या मार्गदर्शनाखाली येथे दरवर्षी १७० हून जास्त मुली या नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण घेतात. भरतनाट्यम प्रशिक्षणाचा कालावधी ७ वर्षाचा असून आठवड्यातून शुक्रवार व शनिवार या दिवशी नृत्य प्रशिक्षण दिले जाते. दरवर्षी विद्यार्थींनींची वार्षिक परिक्षा घेऊन उत्तीर्ण विद्यार्थींना प्रमाणपत्र दिले जातात. प्रबोधन गोरेगावच्या भरतनाट्यम् केंद्रात व्यावसायिक पातळीवर कार्यक्रम शास्त्रोक्त सादरीकरण्यापर्यंत विद्यार्थ्यांस प्रशिक्षण दिले जाते. जसे गीतगोविंद, गीतरामायण, वीर सावरकर महोत्सव आदी कार्यक्रमामध्ये प्रबोधनच्या विद्यार्थांनी उत्तम यश प्राप्त केले आहे. अखिल भारतीय सांस्कृतिक (पुणे) संघातर्फे २०१५ च्या कालावधीत प्रियंका तावडे या विद्यार्थीनीने भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्यप्रकार स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केले. दरवर्षी नृत्यांगनांना कार्यक्रमाअंतर्गत व्यासपीठ उपलब्ध करुन द्यावे हा प्रबोधन गोरेगावचा मुख्य हेतु आहे.

प्रशिक्षण तपशील

सुविधा व्यावसायिकांकडून भरतनाट्यम प्रशिक्षण
वेळापत्रक ५.०० ते ६.०० (संध्याकाळ) सोमवार ते शनिवार
नियम किमान वय ६ वर्षे
सहभागी व्यक्तींनी प्रशिक्षण सत्रात नियमितपणे हजर रहावे.
सहभागी व्यक्तींनी प्रशिक्षणसत्रातील शिस्तीचे पालन करावे.
प्रवेशाचे हक्क प्रबोधन गोरेगाव राखून आहे.
प्रवेश शुल्क प्रशिक्षणाच्या प्रारंभी भरण्यास यावे.

संपर्क : ०२२-२८७९७५८० / ८१


© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.