प्रबोधन क्रीडाभवनामध्ये १९९१ मध्ये ॲथलेटिक प्रशिक्षणाच्या उपक्रमास सुरुवात झाली. ॲथलेटिक या शब्दाचा उगम ‘ऍथ्लो’ या ग्रीक शब्दापासून झाला आहे. धावण्याचा शास्त्रोक्त नियमित सराव प्रशिक्षणार्थीचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक नियमित सरावामुळे स्नायुंची शक्ती वाढवते. धावण्याचा शास्त्रोक्त नियमित सरावामुळे प्रशिक्षणार्थीचा वेग वाढवण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे स्नायुंची लवचिकता आणि शक्ती वाढण्यात मदत होते. प्रबोधन गोरेगावचे प्रमुख खेळाडू अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरिय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात आणि भरघोस पारितोषिके आणि पदके प्राप्त करतात. प्रबोधन गोरेगावच्या वतीने १९७८ पासून बांद्रा ते दहिसर दरम्यानच्या शाळांची आंतरशालेय क्रीडास्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. प्रबोधन आयोजित आंतरशालेय क्रिडा स्पर्धांमध्ये ॲथलेटिक्स या क्रिडा प्रकारात सुमारे १२० शाळांमधून सुमारे २००० विद्यार्थी दरवर्षी सहभागी होतात. उपनगरांतील प्रतिभावान खेळाडूंना शोधून त्यांच्या प्रतिभेला पोषक वातावरण तयार करुन देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्दिष्ट आहे.
प्रबोधनने चार दशकात विशाल सिंह, नवीन फर्नांडीस, रुना पंडित, कविता पांड्ये, दिओनो लोबो, आशिष अग्रवाल, मनिषा गावंडे, आरती मलेकर, विवेक प्रताप सिंह, चारुदत्त जांभेकर, दिपाली इंगळे, दिपाली डोयले, करण कांचन, जोशुआ बरेटो, चैत्रा उचिल, उर्वी तांबे, रिशभ तांबे, धन्वंतरी नाईक, युथिका शेट्टी, प्रिया सावंत आणि नताशा मचाडो अशा अनेक प्रतिभावान राष्ट्रीय ॲथलेटिकचे खेळाडू प्रशिक्षित केले आहेत. नेशनल स्कुल गेम ॲथलेटिक्स या स्पर्धेत लांब उडी या प्रकारात निकोल फ्रॅन्को ला सुवर्ण पदकाचा मान मिळाला. ‘आयसीएससी ॲथलेटिक्स स्पर्धा १०० व ४०० मी. धावणे या स्पर्धेत अनुक्रमे प्रथम व व्दितीय क्रमांक मिळवून ओरिसा येथे होणा-या राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेमध्ये निवड करण्यात आली. मुंबई उपनगर ॲथलेटिक्स संघटनेशी संलग्नता स्वीकारून संस्थेने क्रीडाभवनाच्या स्थापनेपासून ‘ॲथलेटिक्स’ चे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ॲथलेटिक्स या क्रीडाप्रकारात प्रबोधन क्रीडाभवन, गोरेगाव तसेच पश्चिम उपनगरातील एकूण ६० खेळाडू हे प्रशिक्षक श्री. रवि बागडी, मनिषा गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत.
सुविधा | व्यावसायिकांकडून ॲथलेटिक प्रशिक्षण |
---|---|
वेळापत्रक | ६.३० ते ८.०० (संध्याकाळ) सोमवार, बुधवार, गुरुवार. |
नियम | किमान वय ६ वर्षे |
सहभागी व्यक्तींनी प्रशिक्षण सत्रात नियमितपणे हजर रहावे. | |
सहभागी व्यक्तींनी प्रशिक्षणसत्रातील शिस्तीचे पालन करावे. | |
प्रवेशाचे हक्क प्रबोधन गोरेगाव राखून आहे. | |
प्रवेश शुल्क प्रशिक्षणाच्या प्रारंभी भरण्यास यावे. |
संपर्क : ०२२-२८७९७५८० / ८१
© २०१९ प्रबोधन गोरेगाव. All rights reserved. | Design by Dolphin Unisys Pvt Ltd.