रेन वॉटर हार्वेस्‍टिंग म्हणजेच दुसर्‍या शब्दात काळाची गरज. पाण्याचा वाढता तुटवडा लक्षात घेऊन तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी व दर्जेदार सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी लागणार्‍या पाण्याची गरज लक्षात घेऊन ’रेन वॉटर हार्वेस्टिंग’ हा उपक्रम सुरु केला. सदर योजना राबविल्यामुळे प्रबोधन संस्थेचे दरवर्षी रु. ५ लाख वाचतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महापालिकेचे अर्थात मुंबईकरांचे बहुमोल असे १ कोटी ३० लाख लिटर्स पाणी वाचते!
         प्रबोधन गोरेगाव’ संस्थेचे संस्थापक श्री. सुभाष देसाई - शिवसेना नेते व आमदार यांच्या आमदार निधीतून सदर योजना साकार झाली आहे. आमदार निधीतून साकार होणारा अशा स्वरुपाचा हा पहिलाच उपक्रम आहे. आमदार श्री. सुभाष देसाई यांनी दाखवलेली ही दिशा अनेकांना प्रेरणा देईल, असा विश्‍वास आहे.
 
     
  रेन वॉटर हार्वेस्‍टिंगवरील गुंतवणूक व त्यावरील लाभ  
  बोअरवेलचे उपलब्‍ध होणारे पाणी ३ कोटी लिटर्स (वार्षिक)  
  बोअरवेल चालविण्याचा खर्च : रु. ३० हजार (वार्षिक)  
  देखभाल खर्च : रु. ४ हजार (वार्षिक)  
  महापालिकेचे पाणी : रु. ४० हजार (वार्षिक)  
  रेन वॉटर हार्वेस्‍टिंग योजना नसताना पाण्यावरील एकूण खर्च : रु. ५ लाख ७४ हजार (वार्षिक)  
  रेन वॉटर हार्वेस्‍टिंग योजनेनंतर होणारा पाण्यावरील खर्च : रु. ७४ हजार (वार्षिक)  
  दरवर्षी होणारी निव्‍वळ बचत : रु. ५ लाख  
         
  रेन वॉटर हार्वेस्‍टिंग  
  योजनेचा एकूण भांडवली खर्च : रु. ५ लाख  
  दरवर्षी होणारी निव्‍वळ बचत : रु. ५ लाख  
  भांडवल परताव्याचा काळ : १ वर्ष  
  सदर गुंतवणूक स्थानिक विकास कार्यक्रमाअंतर्गत झाली.  
  सध्याच्या बोअरवेलच्या पाण्याचा दर्जा ते उत्तम होईल.  
 
© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिमिडिया प्रा. लि.