Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 
Medicines at subsidised rates Mumbai
 

औषधपेढीमध्ये आपले स्वागत असो. ह्या औषधपेढीचे मुख्य उद्दिष्ठ हे अत्यल्प दरात औषध पुरवणे हे आहे.
प्रबोधन गोरेगाव ही संस्था विना-फायदा या तत्वावर चालते, ह्याचे मुळ उद्दिष्ट हे लोकांच्या स्वास्थ्यासाठी व कल्याणासाठी काम करते. १९७२ पासुन आम्ही क्रीडा, संस्कृती, शिक्षण व आरोग्य अशा क्षेत्रात सुविधा पुरवत आहोत. सौ. मीनाताई ठाकरे रक्‍तपेढी व फिरती रक्‍त संकलन वाहिनी अशा आपत्कालीन सेवा सुरु केल्यावर आम्हाला असे आढळुन आले की, बहुतांशी आपत्कालीन परिस्थिती ही अपुर्‍या उपचारांमुळे निर्माण होते. सदर औषधपेढीत गोरगरिबांना तसेच मध्यमवर्गीय व गरजुंना मोफत औषधे पुरवली जातात. तसेच वृध्द व घरातील गरजुंपर्यंत पोचवण्याचे प्रयत्‍न सुरु आहेत.
प्रबोधन गोरेगावचा असा विश्‍वास आहे की परोपकाराची सुरुवात नेहमी घरातुन होते. या तत्वाप्रमाणे सदर औषधपेढीसाठी आम्ही २५ लक्ष रुपयांचे सहाय्य केले. प्रत्येक व्यक्‍तीने या सद्‍कार्यात मदत करावी अशी आम्हाला आशा आहे.
सदर उपक्रमाला तुमचा पाठिंबा मिळावा ही विनंती. तुमच्या कुठलाही सुचना देण्यासाठी नि:संकोच संपर्क करा.

धन्यवाद,

प्रबोधन औषधपेढी.

 
Prabodhan Medicine Bank
 
 
© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिमिडिया प्रा. लि.