Information Zone  
  Thackeray Utsav Glimpses...  
 
Prabodhan Goregaon
     ’प्रबोधन - गोरेगाव’, ही संस्था १९७२ पासुन ज्ञान, कला, क्रिडा आणि सामजिक सेवेत महाराष्ट्रात अग्रेसर आहे.
     आज संस्थेतर्फ़े कार्यान्वित असलेल्या क्रिडाभवन , जॉगर्सपार्क , अत्याधुनिक उपकरणे असलेली मीनाताई ठाकरे रक्तपेढी तसेच रक्तवाहिनी ( फ़िरते रक्त संकलन), ओझोन जलतरण तलाव आणि एक्टिवीटी सेंटर, वाचनालय , औषधपेढी या सेवांचा गोरेगाव परिसरातीलच नव्हे तर मुंबईतील तसेच महाराष्ट्रातील अनेक लोक लाभ घेत आहेत.
     प्रबोधन गोरेगाव आपल्या मूलभूत तत्वांशी - कला, क्रिडा, ज्ञान, सेवा यांच्याशी कायम कटीबद्ध आहे. आज पर्यंत प्रबोधनने अनेकाविध उपक्रम राबविले.
     क्रिडा क्षेत्रातील प्रबोधनची घोडदौड सर्वश्रुत आहे. भव्य-दिव्य समाजिक- सांस्कॄतिक अनेकाविध कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करुन प्रबोधनने पश्चिम उपनगरातील लोकांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटविला आहे
     ज्ञानामुळे माणूस घडतो. ज्ञानामुळे घडलेला माणुस एक सशक्त सुसंस्कृत समाज घडवतो. माणसं घडविणारे, माणसांच्या विचारांना चालना देणारे कार्यक्रम, उपक्रम प्रबोधन पहिल्यापासून राबवित आहे. जनसेवेच्या मार्गात प्रबोधनच्या यापूढील प्रवासात आपले कुठलेही योगदान स्वागतार्ह आहे.
 
prabodhan kridabhavan ozone swimming pol & activity centre ozone swimming pol & activity centre
Highslide JS Highslide JS Highslide JS
 
 
 
 
  prabodhan   वैद्यकीय साहित्य किरकोळ अनामत रक्कम भरुन उपलब्ध  
वॉकर, व्हील चेअर, वॉटर बेड, एअरबेड व इतर वैद्यकीय साहित्य प्रबोधन औषधपेढी तर्फे गरजुंसाठी किरकोळ अनामत रक्कम देऊन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
अधिक माहिती......

 
 
  Prabodhan Goregaon Medicine Bank panel प्रबोधन गोरेगाव संस्थेतर्फे आजवर अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले गेले असून ते यशस्वी झाले आहेत. समाजाच्या सर्व स्तरावरील आबालवृद्धांसाठी आम्ही औषधपेढी सुरु केली आहे. या अंतर्गत ’प्रबोधन जीवनमित्र’ योजना कार्यान्वित करण्यात आली असून तुम्ही याद्वारे प्रबोधन औषधपेढीचे सभासद होऊन सवलत तसेच अन्य सुविधा प्राप्त करु शकता. तसेच हे सभासदत्व स्विकारुन या समाजकार्यात आपले योगदान देऊ शकता.
 
अधिक माहिती......

 
  रेन वॉटर हार्वेस्टींग हा उपक्रम खर्‍या अर्थाने काळाची गरज म्हणून महत्वाचा आहे. सदर योजना राबविल्यामुळे प्रबोधन संस्थेचे दरवर्षी रु. ५ लाख तर वाचतातच, परंतु महत्वाचे म्हणजे महापालिकेचे अर्थात मुंबईकरांचे बहुमोल असे १ कोटी ३० लाख लिटर्स पाणी वाचते. आमदार सुभाष देसाई यांनी प्रबोधनच्या माध्यमातून दाखविलेली ही दिशा अनेकांना प्रेरणा देईल, असा विश्वास आहे. Rainwater Harvesting Prabodhan Gorgaon  
अधिक माहिती......

 
  Aphaeresis Centre Prabodhan Goregaon   समाजाच्या स्वास्थपूर्ण आयूष्य प्राप्तिसाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध करुन देणे हे प्रबोधनचे ध्येय आहे. याच मार्गावरील पूढचे पाऊल म्हणजे अफेरिसिस सेंटर. सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे रक्‍तातील प्लेटलेस, प्लाझमा, पेशी इतर यांची या अवस्थेतील विभागणी होते. ह्या तंत्रज्ञानामुळे रक्‍त पिशव्यांत गोळा करण्याची गरज भासत नाही. हे सर्व मशीनद्वारेच केले जाते. मशीन रक्‍त गोळा करणे, आवश्यक घटक वेगळे करणे, उरलेले रक्‍त रुग्णांच्या शरीरात ट्रान्सफर करणे (एकही थेबं रक्‍त वाया न जाऊ देता) ही कामे करते.  
अधिक माहिती......
 
 
  प्रबोधन गोरेगाव आपल्या मुलभूत तत्वांशी - कला, क्रिडा, ज्ञान यांचा प्रसार समाजसेवेच्या माध्यमातून करण्यासाठी- कायम कटीबद्ध आहे. समाजाच्या सांस्कृतिक, शारिरीक, बौद्धिक, शैक्षणिक विकासासाठी धर्म - जात - पंथ यांचा विचार न करता संस्थेतर्फे अनेकाविध उपक्रम राबविले जातात.  
श्री. सुभाष देसाई - शिवसेना नेते व आमदार
अधिक माहितीसाठी
 
   
अधिक क्षणचित्रांसाठी क्लिक करा
 
   
   
 
Get the Flash Player to see this player.
 
  अधिक चलचित्रे...  
 
     
© 2009 प्रबोधन गोरेगाव. सर्व हक्क सुरक्षित Best viewed in 1024 x 768 resolution संकेतस्थळ सादरीकरण व व्यवस्थापन : प्रिस्टाईन मल्टिमिडिया प्रा. लि.